Skip to main content

पुन्हा केव्हातरी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 16/09/2009 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद काही राहिले, साधू पुन्हा केव्हातरी काही तराणेही नवे, छेडू पुन्हा केव्हातरी! "सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या, सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी झाले कधी हाराकिरीचे वाद; केली भांडणे, तेव्हा असे का वागलो, बोलू पुन्हा केव्हातरी दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे, आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी! सांगून नाही भेटलो तेव्हा; कधी भेटूनही हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी" आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!
लेखनविषय:

वाचने 2864
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

हाराकिरीत काय झालं? बाकी रचना चांगली.

"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या, सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी फारच छान शेर! भेटू पुन्हा वाला शेर मात्र काहीशी याचीच पुनरावृत्ती झाल्यासारखे; हे टाळता आल्यास बरे वाटेल. गझल एकंदर चांगली झालीये. हाराकिरीबाबत श्रामोंशी सहमत आहे. (बोलका)बेसनलाडू

वा! शाब्बास!! आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी! क्या बात है! आताच पाहू नक्षी काचेची, नको केव्हातरी साकारलेले दृश्य पाहू, ते नको केव्हातरी

वा, छान. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे, आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी! "सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या, सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी रोज भेटूनही वाटतं गं असं कधीकधी...

फॅन्टास्टिक! छान जमलीय गझल. आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी! हे तर खूपच छान. असेच लिहीत राहावे. आहे प्रवाही शायरी, काव्यातली क्रान्ती जणू, येईल जे काही नवे, पाहेन आनंदात मी! - अजिंक्य.

सांगून नाही भेटलो तेव्हा; कधी भेटूनही हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी" व्वा. छान :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. ऑपरेशन अलर्ट:--- http://timesofindia.indiatimes.com/news/india/Indian-army-on-Operation-…

आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे, काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!
सही!

:) आपला हृषी !!

नेहेमीप्रमाणे उत्तम !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)