Skip to main content

जहाल व मादक

लेखक सहज यांनी बुधवार, 09/09/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
तिखट खायला आवडते तसे तिखट प्यायला आवडणार्‍यांसाठी हे स्पायसी कॉकटेल! ह्या कॉकटेलचे नाव आहे "शिवास बीच" (Chivas B*tch) साहीत्य एक काकडी एक किंवा दोन तुमच्या जवळच्या बाजारात मिळणार्‍या जहाल मिरच्या (लवंगी मिरची) ३० मिली शिवास रीगल ग्रेपफ्रुट ज्युस - एकदम गारेगार (पर्याय म्हणून ऑरेंज-लिंबू मिश्र पण जादा साखर नसलेले) सजावटी करता काकडीचा काप शेकर बनवायची कृती अगदी सोपी आहे. काकडी व मिरचीचे बारीक काप करुन एकत्र करा. ते शेकर मधे टाका व त्यात ३० मिली शिवास रीगल व्हिस्की घाला. शेकर मस्तपैकी घुसळा. मग ग्लासमधे गाळून तो रस भरा. त्यात एकदम गार ग्रेपफ्रुट ज्युस घाला. सजावटीसाठी काकडीचा काप ग्लासच्या कडेला लावा. पहीला घोट घशात उतरताना जहाल व मादक चीज असल्याची जाणीव करुन देतो. एन्जॉय! मिपाचे साकीया आद्यगुरू नाटक्या यांना समर्पित!

वाचने 15200
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

चिअर्स ............... चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

कट्टर व्होडकाप्रेमी दिसतायत चुचुतै! ;-)

सहजरावांच्या लेखनाबद्दल शुभेच्चा!!! बाकी प्रतिसाद, इतर प्रतिसाद कसे आहेत ते पाहुन दिला जाईल हा प्रतिसाद सहजरावांना अर्पण --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

सुरेख ! अजुन येवु द्या असेच सुंदर सुंदर प्रकार ! आणि हो, तुमची प्रतिभा एकाच विषयात गुंतवुन ठेवु नका. आपला व्यासंग आणि अभ्यास भरपुर आहे. मिपाकरांना त्याचा लाभ होवु द्या !! लिहिते रहा !!! :) (बोलीप्रमाणे दोन प्रतिसाद दिले आहेत. जास्त हवे असतील खरड करा) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अरे काय हे सकाळी सकाळी ???? जहाल निषेध !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे काय हे सकाळी सकाळी ???? रात्रीची तयारी :P

पाककृतीत 'मादक' शब्द वाचून अर्थबोध होईना. चित्र पाहिल्यावर त्याची सत्यता पटली. शिवाज रिगलच का बरे? दुसरी चालेल का? (मला वाटते कॉकटेल मध्ये तरी चालावी.) मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

In reply to by प्रभाकर पेठकर

शिवास रिगलने प्रसिद्ध केलेले कॉकटेल असल्याने शिवास. तरी दुसरे अवश्य करुन पहा, चालू शकेल.

संघाच्या "जहाल" विचारसारणीवर एक तितकाच "जहाल" पण थोडासा "मादक" प्रतिसाद लिहावा असा विचार होता. असे काही खळबळजनक लिहताना २ पेग मारुन मगच लिहायला बसण्याची आंतरजालीय परंपरा पाळणेही आवश्यक होते ... ;) सहजरावांना धन्यवाद ...!!! आमची जहाल आणि मादक सोय झाली. अगदी "ग्नेन फिडीच" नसली म्हणुन काय झाल ? शिवास रिगल तरी आहे ना ? झाले तर मग ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

मस्त दिसते आहे कॉकटेल, स्वाती

रेशिपी मस्त आहे, सहजकाका :). एकदा ट्राय करून पहायला हवी. नाटक्या यांनी मागे दिलेली स्पायसी मार्गारिटाची रेसिपी आठवली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


भन्नाट कॉकटेल रेशिपी टाकल्याबद्दल सहजकाकांना मनःपुर्वक धन्यवाद. फोटोही छान आहे. गुलाबी रंगामुळे मादकता वाटत असावी. घरी नेमकी शि.रि. आहेच, त्यामुळे करून बघावी म्हणतो विकेंडला. आणि, ही भन्नाट रेशिपि सगळ्यांना व्यनिमधून न टाकता डायरेक्ट बोर्डावर टाकल्याबद्दल हा प्रतिसाद सहजकाकांना समर्पित बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

घरी नेमकी शि.रि. आहेच ह्या वाक्याचं अंमळ हसू आलं! अहो 'पुजार्‍याच्या घरी तीर्थ' असणारच त्यात सांगण्यासारखं काय आहे? ;) (मार्मिक)चतुरंग

In reply to by चतुरंग

:):) उत्तम कॉकटेल रेसिपी _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

In reply to by भडकमकर मास्तर

रेसिपी उत्तम. चतुरंगांशी सहमत!!!

अरे वा!!! मस्तच रिसिपी आहे हो सहज काका... एकदा करुन बघावी लागेलच निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

लय भारी रे सहज ! हाबानेरो घालतो त्यात. म्ह्णजे मिरजेवर लिहायला प्रेरणा मिळेल. कसे ? -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

त्यापेक्षा नागा जोलोकिया टाकून पाहा. अजून जहाल होईल तुम्ही जे काही लिहिणार असाल ते.

In reply to by घाटावरचे भट

संडासात बसून लेख लिहिणे आवडत नाही मला :-) (अधिक माहिती साठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा लेख वाचावा.) -- मिसळभोक्ता

द्रव्य घेतल्यावर जहालता आणि मादकता वाढते का?

'जहाल', 'मादक' आणि 'सहज' हे तीन शब्द एकाच ओळीत वाचून खरंतर मला झीटच येणार होती. पण सुबक, डान्राव आणि बिकाच्या प्रतिसादांमुळे मी वाचले. ;-) मग सहजकाका, शिवास रिगलची बाटली तुम्ही आणणार असं सोयीस्करपणे गृहीत धरू ना? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आयला शॉल्लेट गल्लत झाली की हो माझीच ... सहजकाका स्वतः शिवास रिगल आणणार हे माहिन नव्हतेच की. असो. >>सहजकाका, शिवास रिगलची बाटली तुम्ही आणणार वा वा, अभिनंदन ...!!! हा प्रतिसाद मग तुम्हालाच अर्पण ...!!! आशुन आशुन !!! ( अधिक माहितीसाठी नंदनशी संपर्क साधावा ) ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'जहाल', 'मादक' आणि 'सहज' हे तीन शब्द एकाच ओळीत वाचून खरंतर मला झीटच येणार होती.
हा हा हा .. हे मस्त ! सहजराव, छान आहे पाकृ.. कधी करुन प्यावेसे वाटते आहे :) --(बिअर, वाईन प्रेमी) लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'जहाल', 'मादक' आणि 'सहज' हे तीन शब्द एकाच ओळीत वाचून खरंतर मला झीटच येणार होती. सहज, मादक, जहाल ह्या तीन्ही शब्दातील प्रथम अ़क्षर घेउन शब्द तयार केला तर "समाज" होतो. ह्या विचाराने अंमळ काळजी वाटली. :)

In reply to by विकास

काय पण डोकं चालतं... धन्य. आता काही दिवसात मादक आणि जहाल हे दोन आयडी तयार होतील अशी अपेक्षा धरावी काय? ;)

In reply to by विकास

मादक आणि जहाल ह्यातली आद्याक्षरे घेतली तर 'माज' होते. इथेही 'माज'च अपेक्षित दिसतोय. ;) विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

आम्ही यातले नसल्यामुळे प्रतिसाद देउ शकत नाही.

In reply to by युयुत्सु

(निदान) छायाचित्राचे कौतुक करण्यासाठी 'त्यातले' असावे लागत नाही.

आम्ही "मादक' नसलेले 'जहाल' पदार्थ 'सहज' म्हणून घेतो! ;) परवाची गोष्ट - तैपेय एअरपोर्टवर भटकताना ड्यूटी फ्री शॉपमध्ये गेलो. चॉकॉलेट्स, दारवा असे एकत्रच असलेले शॉप होते. तिथल्या 'मादक' ललनेने आग्रहाने मला 'जहाल' वारुणी विभागात 'सहज' नेले आणी ग्लेनमोरांजी च्या ३ वर्षे आणि १२ वर्षे जुन्या बाटल्या दाखवल्या. दोन्हीचे दोन अत्यंत छोटे कप्स (अर्धा चमचाच असेल) तिने मला आग्रहाने प्राशन करायला लावले. आणी फरक विचारला. माझे ह्यातले ज्ञान फारसे नाही पण एक टेस्ट जास्त 'स्मूथ' आहे असे सांगून वेळ मारुन नेली. तात्या, ग्लेनमोरांजी बघून तुझी फार आठवण आली रे. बाटल्यांचे फोटू काढू का म्हणून विचारले पण तशी परवानगी नव्हती त्यामुळे राहिले नाहीतर किमान फोटू तरी डकवता आले असते! ;) (बॉटम्स अप)चतुरंग

In reply to by चतुरंग

आम्ही "मादक' नसलेले 'जहाल' पदार्थ 'सहज' म्हणून घेतो! +१ हेच म्हणते. पण फोटो देखणा आहे.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मस्तच. करून बघायला हवीच. शिरि नाही तेव्हा टीचर्स झिंदाबाद! सहजराव, असेच लिहिते रहा. वाचनमात्र राहू नका. पुलेशु. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहजा, भारी पाकृती दिसत आहे. फोटो मादक आहेत याच्याशी सहमत ! :) -दिलीप बिरुटे

वाह ! क्या बात है... लै भारी राव :)

नाटक्याने मागच्या कट्ट्याला केलं होतं. त्यात टकिला होता असं वाटतं. (करणं हे त्यांचं काम आणि पिणं आमचं. आम्ही त्यांच्या क्षेत्रात लुडबूड करत नाही ;))

अहाहा.. साले ह्या कॉकटेलांचे रंग बघुन एकदा ओठ टेकवावे याच्यापुढे असं वाटु लागतं.. थोडा औरभी आने दो (फोटो! ;) ) (ह्यातला-म्हणजे त्यातला नसणारा)ऋषिकेश ------------------ रात्रीचे १० वाजून ४९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "जरासा झूम लू मै...."

In reply to by ऋषिकेश

जबर्‍या कॉकटेल... येउद्या आजुन... अवांतरः बघुन एकदा ओठ टेकवावे याच्यापुढे असं वाटु लागतं.. तुम्ही तात्याच्या खवत जपून जावा हो... कवटी

आयला सहजराव तुम्हीसुद्धा? लाय भारी रेशीपी. तेवढी शिवास रिगल घेउन या म्हंजे झालं

सहजराव, फारच छान. या विकेंडला नवीन कॉकटेल तुम्हाला समर्पित... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

फोटो वरून आणि रेसिपी वरून नुसरत फतेह अली खान च्या कव्वालीचा हा मुखडा आठवला.. आग दामन में लग जायेगी, दिल में शोला मचल जायेगा! मेरा साग़र ना छूना कभी, साकिया हाथ जल जायेगा! इथे साग़र म्हणजे दारूचा प्याला... ... सुहास

छान. भरलेले चषक चांगले दिसतायत. काकडी का घातली आहे? व्हॉल्युम वाढवायला काय?

In reply to by चित्रा

काकडीला जरासा रस सुटून मिरचीचा तिखटपणा त्यात उतरावा म्हणून असु शकेल. व्हॉल्युम वाढवायला नाही कारण कापलेली काकडी, मिरची, बिया इ सगळे त्या शेकर मधेच आहे. भरलेल्या चषकात कुठलाही चोथा नाही. मिरचीचा तिखटपणा उतरलेली शिवास रिगल व ग्रेपफ्रुट ज्युस!

झकास ! पुढच्या वीकेंडला हे करणार ! :-)