Skip to main content

आणि त्यावर म्हणा..

लेखक शाहरुख यांनी बुधवार, 09/09/2009 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
मरा मारा आणि त्यावर म्हणा भारत माझा देश प्यारा खा खिलवा आणि त्यावर म्हणा या भ्रष्टाचाराला घालवा थुंका पचका आणि त्यावर म्हणा सगळ्यांनी स्वच्छता राखा पाडा ढकला आणि त्यावर म्हणा सगळ्यांनी रांगेतनं चला मी तर म्हणतोयच आणि त्यावर तुम्हीही म्हणा.. -- कवी शाहरुख
लेखनविषय:

वाचने 3284
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

डोळे उघडणारी कविता. अवांतर- "आणि त्यावर तुम्हीही म्हणा.. -- कवी शाहरुख" म्हटले "कवी शाहरुख!"

थोडक्यात छान विवेचन केले सद्य स्थितीचे. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

मस्त !!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

मस्त!

In reply to by सहज

समयोचित आणि मस्त! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

+३

In reply to by श्रावण मोडक

+४ बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

+५ :)

मारा जाळा पेटवा आणि त्यावर म्हणा इतरांनी शांतता राखा -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

थोडक्यात आणि प्रभावी.

In reply to by चतुरंग

असेच म्हणतो ------ (आत्मना)छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

शहारुखभाई, आदाब अर्ज है, जनाब! बहोत खूब. देर आये, दुरुस्त आये..... खूप आवडली आपली कविता. असेच लिहीत जा. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

कविता आवडली. विं.दा. करंदीकरांच्या कवितेची आठवण झाली/ आपला, (वाचक) प्रशांत --------- विल पॉवर कमी झाली की विल्स पॉवर वाढते :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

जे गद्याने सांगुन होणार नाही ते एका कवितेतुन व्यक्त करता येते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मस्तच

कविता आवडली ऋषिकेश ------------------ रात्रीचे ९ वाजून १२ मिनीटे झालेली आहेत. आता वेळ आहे जाहिरातीची "जागो जागो जागो जागो .. जागो रेऽऽ...."

सही जगाह पर ... सही निशाना !! हमारे मुल्क में, ऐसे देशप्रेमी बहोत मिलेंगे .. (मिरज मध्ये दंगल झाली लागलीच मिपावर पण लोण आणा ..) जो कर रहें तिजारत ( व्यवसाय / Business /trade) लडाई दंगों की .. :-( ऐसे सियासती लोगोंसे परहेज रखना, यह हमारी छोटीसी गु़जारीश ... ~ वाहीदा था कहां नसीब, दिल को येह सुरूर बेखुदी का तेरे तीरे नीमकश ( half - drawn arrow) ने दिखा दिया आईना जिंदगी का ....

थुंका पचका आणि त्यावर म्हणा सगळ्यांनी स्वच्छता राखा
हम्म! पण कविता आवडली! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

>>पण कविता आवडली! Smile :-) मला केर टाकणे, घाण करणे यासाठी शब्द सुचला नाही, म्हणून मग 'थुंका' आणि 'पचका' असे दोनदा वापरावे लागले.कोणी असा शब्द सुचवेल का ? सर्वांचे आभार..