Skip to main content

कोल्हापूर आणि आंबोली..

लेखक दिपक यांनी मंगळवार, 08/09/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
महालक्ष्मी मंदीर लोणी डोसा नवा राजवाडा पद्मा गेस्ट हाउस इथे मटन थाळी खाल्ली.. चव मात्र जेमतेम होती. आंबोलीकडे कुच सावंतवाडीत सुरमई थाळी हादडली. भन्नाट होती. मोती तलाव अजुन काही इथे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13691
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

पावसाळ्यात आंबोलीचा खरंच नाद खूळा !! कधी कधी धुकं इतकं दाट असतं की काही फुटांवरचं पण दिसत नाही. माझ्या माहितीप्रमाणे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस आंबोलीला पडतो.

In reply to by शाहरुख

गगनबावड्याला सर्वात जास्त पाऊस पडतो. माझ्या माहीतीप्रमाणे 'भारतातील' दुसर्‍या क्रमांकाचा पाऊस गगनबावड्याला पडतो. आता कदाचित तिसरा क्रमांक असेल (चेरापुंजीच दुसर्‍या क्रमांकावर आल्याने)

मला फक्त हेच छायाचित्र दिसत आहे. बाकिची दिसत नाहीत. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

अजुन काही इथे. हे पाहिलच नव्हतं मी... :P मस्त आलेत सगळे फोटो.. बेण्णे डोश्याचा फोटो पाहुन जीव कळवळला हो...

छायाचित्र गायब झाल्याने प्र. का. टा. आ. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

फोटो मस्त आहेत. पिकासा वर सगळे फोटो बघितले. खाद्यपदार्थांचे फोटो बघुन भुक लागली आहे ;) - शशांक

दिपकभाऊ, पेठकर काकांनी दिलाय तो एकच फोटु मलापण दिसतोय रे. आणी हो पिकासावर जाउन बघितली. एकदम नादखुळा रे भावा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

इथे काही फोटो दिसत नाहीत, पण पिकासावर पाहिले. सगळेच फोटो सुरेख आहेत, त्यातला हा फॅमिली फोटो सगळ्यात जास्त आवडला. :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

मस्त आहे पावसाळलेली आंबोली. लई भारी. एकदम आठवणी ताज्या झाल्या. बाकी, मत्स्याहारात आपल्याला काही गमक नाही. त्यामुळे त्यावर आपली अळी मिळी गूप चिळी.

दिपकजी तुमचा फोटो चढवायचा अनूभव दांडगा असतांना असे कसे झाले हो? फक्त एकच फोटो दिसतोय येथे. पिकासाचा बहूतेक पिकासो झालेला दिसतोय. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

आता सर्व छायाचित्रे दिसत आहेत. धन्यवाद. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

मागच्याच रविवारी पन्हाळ्याला जायचा योग आला. वेगळा धागा न काढता पन्हाळ्याचे काही फोटो. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by अमोल केळकर

मस्त फोटो अमोलजी. पन्हाळ्याला जायचे होते पण वेळेअभावी रद्द करण्यात आले. तुम्ही दिलेल्या फोटोने कसर भरुन काढली.

In reply to by अमोल केळकर

पन्हाळ्याची छायाचित्रे भन्नाट आहेत. त्यातले सर्वात पहिले फारच आकर्षक आहे. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

मस्त आलेत फोटो सगळेच. आंबोली घाट तर पावसाळ्यात नक्की जावं असा. लोणी डोसा, पांढरा रस्सा आणि सुरमई ताट - खल्लास!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by पर्नल नेने मराठे

तु कधी गेली नाय काय कोल्हापुरला :? पांढरा रस्सा माहीत नाहि म्हणजे कसे शक्य आहे यार...

तांबडा रस्सा काय, पांढरा रस्सा काय, आंबोली घाट काय आयला तुम्ही लोक्स मज्जा करताय राव! वा वा ज ह ब ह र्‍या हा!! :) (असूयाग्रस्त)चतुरंग

फोटो आणि लेख आधीच वाचला होता. उशीर झाला तरी मुद्दाम लिहावेसे वाटले -मस्त फोटो आलेत. आणि सुरमईचे ताटही झकास दिसते आहे :(

लोणी डोसा.. नवा राजवाडा मटन थाळी हिरवी गार शाल पांखरलेले डोंगरे धबधबा.. त्यात पुन्हा सुरमई थाळी...... सर्वच फोटो एक नंबर...

ह्यो धागा बघायचा राहिलाच कसा म्हंतो मी! :) खल्लास खल्लास खल्लास! >>पद्मा गेस्ट हाउस इथे मटन थाळी खाल्ली.. चव मात्र जेमतेम होती. काय द्येवा..असं नाय करायचं! 'नाव मोठं, लक्षण खोटं' म्हणतात ते काय उग्गाच? आता ओपलचंच उदाहरण घ्या ना..कोल्हापूरी खायचंय, तांबडा-पांढरा खास कोल्हापूरी चवीचाच हवा म्हणुन पुण्याफिण्याचं पब्लिक येतं कोल्हापूरात आणि जाऊन जेवतं कुठे? ओपलला.. आयला, तिथं असेल लै चकचकाट, वाढायची-बिढायची श्टाईल असेल भारी...पण कोल्हापूरात जाऊन ओपलला जेवलं की त्या जीवाची दयाच येते राव! तिथं जाऊन कसलं रे तूप-साखर मटण खायचं? :) मटन थाळी हाणायची तर कसं, एखादी अंमळ कळकट खानावळ पहायची आणि शिरायचं आत! जेवणाची ग्यारेंटेड मजा येणार. :) आणि तिखट खाण्याची हौस (आणि पचवण्याची कुवत असेल ) तर पन्हाळ्याच्या आसपासच्या ढाब्यात्/हाटिलात खुळा रस्सा मागवावा...पहिल्या भुरक्यालाच पंचेंद्रियं जागी होऊन तांडव करायला लागतात...जेवण संपेपर्यंत सालं कुंडलीनीची ७च्या ७ चक्रं जागी होऊन गरागरा फिरायला लागतात :D बाकी, आंबोलीबद्दल काय बोलावं? आठवणी मोठ्या गुलाबी आहेत. ;)

In reply to by धमाल मुलगा

रंगीला मधील आमिर खान ची आठवण आली ...... क्या सिर्फ टेबल, कुर्सी पर खर्चा किया खाने पे नही....... नामान्कित हॉटेलात लै चकचकाट, वाढायची-बिढायची श्टाईल असते पण खाण्याला चव नसते

In reply to by धमाल मुलगा

काय द्येवा..असं नाय करायचं! 'नाव मोठं, लक्षण खोटं' म्हणतात ते काय उग्गाच?
एकदमं खरं बोल्ला राव. मटन थाळी खाल्ल्यावर खाली पानवाल्याकडं गेल्यावर त्यानं त्या हाटेलची हकीगत सांगितली. "हाटेलचा एक जुना आचारी सोडुन गेल्यापासुन त्या हाटेलाच्या जेवणाला चव नाही राह्यली. पहिलं खुप फेमस होत ’पद्मा गेस्ट हाऊस’." जावुद्या पण सांवतवाडीच्या सुरमई ताटानं जे काही सुख दिलयं त्याला शब्दच नाय आमच्यापाशी. :-)

सावंतवाडीत १ जून ला होतो पण त्यावेळेस पाऊस नव्हता .बाळकृष्ण मध्ये जाऊन एक गडबड (आईस्क्रीम) चापले

सावंतवाडीत १ जून ला होतो पण त्यावेळेस पाऊस नव्हता .बाळकृष्ण मध्ये जाऊन एक गडबड (आईस्क्रीम) चापले