पावसाळ्यात आंबोलीचा खरंच नाद खूळा !!
कधी कधी धुकं इतकं दाट असतं की काही फुटांवरचं पण दिसत नाही.
माझ्या माहितीप्रमाणे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस आंबोलीला पडतो.
गगनबावड्याला सर्वात जास्त पाऊस पडतो. माझ्या माहीतीप्रमाणे 'भारतातील' दुसर्या क्रमांकाचा पाऊस गगनबावड्याला पडतो. आता कदाचित तिसरा क्रमांक असेल (चेरापुंजीच दुसर्या क्रमांकावर आल्याने)
इथे काही फोटो दिसत नाहीत, पण पिकासावर पाहिले. सगळेच फोटो सुरेख आहेत, त्यातला हा फॅमिली फोटो सगळ्यात जास्त आवडला. :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
दिपकजी तुमचा फोटो चढवायचा अनूभव दांडगा असतांना असे कसे झाले हो? फक्त एकच फोटो दिसतोय येथे. पिकासाचा बहूतेक पिकासो झालेला दिसतोय.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
मागच्याच रविवारी पन्हाळ्याला जायचा योग आला. वेगळा धागा न काढता पन्हाळ्याचे काही फोटो.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
ह्यो धागा बघायचा राहिलाच कसा म्हंतो मी! :)
खल्लास खल्लास खल्लास!
>>पद्मा गेस्ट हाउस इथे मटन थाळी खाल्ली.. चव मात्र जेमतेम होती.
काय द्येवा..असं नाय करायचं! 'नाव मोठं, लक्षण खोटं' म्हणतात ते काय उग्गाच?
आता ओपलचंच उदाहरण घ्या ना..कोल्हापूरी खायचंय, तांबडा-पांढरा खास कोल्हापूरी चवीचाच हवा म्हणुन पुण्याफिण्याचं पब्लिक येतं कोल्हापूरात आणि जाऊन जेवतं कुठे? ओपलला.. आयला, तिथं असेल लै चकचकाट, वाढायची-बिढायची श्टाईल असेल भारी...पण कोल्हापूरात जाऊन ओपलला जेवलं की त्या जीवाची दयाच येते राव! तिथं जाऊन कसलं रे तूप-साखर मटण खायचं? :)
मटन थाळी हाणायची तर कसं, एखादी अंमळ कळकट खानावळ पहायची आणि शिरायचं आत! जेवणाची ग्यारेंटेड मजा येणार. :) आणि तिखट खाण्याची हौस (आणि पचवण्याची कुवत असेल ) तर पन्हाळ्याच्या आसपासच्या ढाब्यात्/हाटिलात खुळा रस्सा मागवावा...पहिल्या भुरक्यालाच पंचेंद्रियं जागी होऊन तांडव करायला लागतात...जेवण संपेपर्यंत सालं कुंडलीनीची ७च्या ७ चक्रं जागी होऊन गरागरा फिरायला लागतात :D
बाकी, आंबोलीबद्दल काय बोलावं? आठवणी मोठ्या गुलाबी आहेत. ;)
रंगीला मधील आमिर खान ची आठवण आली
...... क्या सिर्फ टेबल, कुर्सी पर खर्चा किया खाने पे नही.......
नामान्कित हॉटेलात लै चकचकाट, वाढायची-बिढायची श्टाईल असते पण खाण्याला चव नसते
काय द्येवा..असं नाय करायचं! 'नाव मोठं, लक्षण खोटं' म्हणतात ते काय उग्गाच?
एकदमं खरं बोल्ला राव. मटन थाळी खाल्ल्यावर खाली पानवाल्याकडं गेल्यावर त्यानं त्या हाटेलची हकीगत सांगितली. "हाटेलचा एक जुना आचारी सोडुन गेल्यापासुन त्या हाटेलाच्या जेवणाला चव नाही राह्यली. पहिलं खुप फेमस होत ’पद्मा गेस्ट हाऊस’." जावुद्या पण सांवतवाडीच्या सुरमई ताटानं जे काही सुख दिलयं त्याला शब्दच नाय आमच्यापाशी. :-)
प्रतिक्रिया
पावसाळ्या
नाही...
फोटोच
एकच...
पिकासावर
पिकासाचा दुवा तर द्या
वर
..
अरेच्चा
स्स्स्स्स्.......!
फोटो मस्त
नादलेस
दिपकभाऊ,
मस्त!
हिरवी वनराई आणि खाद्यपदार्थ
भन्नाटच!
दिपकजी
धन्यवाद....
कोल्हापूर - पन्हाळा
सुंदर
भन्नाट...
एकदम हळवं
क्या बात है!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पांढरा
तु कधी
अचाटच अहेत फोटू!
सुन्दर
सुरेख फोटो
दिपकशेठ, चि
व्वा फारच
कोळसा झाला !!
मस्त फोटो
वा वा वा!!!
छानच!
झकास...
मस्त आहेत
अग्गायायायायायाया.....
असेच
काय द्येवा.
मस्त आहेत फोटू
मस्त आहेत फोटू