यात पहिल्या प्रकारात जाणीवपूर्वक जोखिम पतकरून मनुष्य सहभागी होतो.
प्रत्यक्ष भगवंत (त्यातही पूर्णावतार) श्रीकृष्णच म्हणतात -
कर्मणि एव अधिकारः ते - मा फलेषु कदाचन|
कर्तुमकर्तुम सर्वशक्तीमान परमेश्वराचा पूर्णावतारच असे म्हणत आहे तर तिथे मर्त्य मानवांच्या भाकितांनुसार कोणत्याही कर्माचे फळ बदलता येईल असे कसे?
पुढे भगवान म्हणतात - कोणतेही कर्म फळाच्या अपेक्षेने करू नकोस आणि जे व्हायचे ते होईल म्हणून हातवर हात धरूनही बसू नकोस.
मग 'मी असे असे करणार आहे, त्याचे फळ मला काय मिळेल?' असा विचार करून ज्योतिषाला प्रश्न विचारणे परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध नाही काय?
यातील मानसशास्त्राचा भाग महत्वाचा आहे. भविष्यकथनाने मिळणार्या पांगळ्या मानसिक आधारापेक्षा परमेश्वराने सांगितले आहे म्हणून कार्य करणे हे आद्य कर्तव्य आहे हा आध्यात्मिक-मानसशास्त्रीय आधार लोकांना पुरेसा का ठरू नये? त्यांनी भविष्यवेत्त्याकडे का धाव घ्यावी? याचाच अर्थ लोकांची श्रद्धा धेडगुजरी आहे. त्यांचा मर्त्य ज्योतिषावर विश्वास आहे पण ज्याच्या मर्जीने सर्व ग्रहगोल फिरतात त्या प्रत्यक्ष परमेश्वरावर नाही?
ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक
वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने
मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते.
त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे
त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.
हे मात्र पटले.
चुचु
भांग, दारू, चरस किंवा अल्प प्रमाणात बिडी तंबाखू हे जेवढे जीवनाला उपयुक्त आहेत तेवढीच उपयुक्तता भविष्यवाणीची असते. या सर्व गोष्टी काही कालासाठी मनुष्याला एक प्रकारचा दिलासा देतात.
चंद्रशेखर
<<<<<<<<<<ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक
वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने
मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते.
त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे
त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.>>>>>>>>>
फसवे वाक्य.......... :) हे वाक्य म्हणजे आपली गिर्हाईक वाढण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिन्ग आहे...........
पूर्वी राजे महाराजे, सरदार, धनिक लोक ज्योतिष जास्त बघत........ आजही राजकारणी, उद्योजक, सिनेमावाले... भविष्य, दगडधोन्डे, वास्तू, आकडे, स्पेलिन्ग बदलणे.. असल्या उचापती करत असतात.....
भारतात जन्मदर २३ प्रति हजारी आहे.
२००९ ची अंदाजे लोकसंख्या: 1,198,003,000 (http://en.wikipedia.org/wiki/India)
११९८००३०००/१०००= ११९८००३
११९८००३ * २३ = २,७५,५४,०६९ बालके प्रतिवर्ष भारतात जन्मतात (दोन कोटी, पंचाहत्तर लाख)
२,७५,५४,०६९/३६५= ७५, ४९० बालके प्रतिदिन भारतात जन्मतात
७५, ४९०/२४= ३१४५ बालके प्रतितास भारतात जन्मतात
५२ बालके प्रतिमिनिट भारतात जन्मतात
भारतातील ह्या ५२ बालकांचे भविष्य सारखेच असते का?
As of 2007, the average birth rate for the whole world is 20.3 per year per 1000 total population, which for a world population of 6.5 billion comes to 134 million babies per year.
वरील गणिताप्रमाणे जगभरात प्रतिमिनिट २५४ बालके जन्मतात; ह्या २५४ बालकांचे भविष्य सारखेच असते का?
प्रतिक्रिया
याला ज्योतिषाची गरज काय?
ज्यांच्या
ज्योतिषाची उपयुक्तता
<<<<<<<<<<ज्यांच
इमोशनल ब्लॅकमेलिन्ग
पृथ्वीचा, इतर ग्रहांचा आकार, ग्रहांचा संभाव्य परिणाम व जन्मदर
भारतातील ह्या ५२ बालकांचे भविष्य सारखेच असते का?