✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विकृत बुद्धिवादाची इस्त्री

य
युयुत्सु यांनी
Sun, 09/06/2009 - 10:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10761 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

याला ज्योतिषाची गरज काय?

विसुनाना
Mon, 09/07/2009 - 12:29 नवीन
यात पहिल्या प्रकारात जाणीवपूर्वक जोखिम पतकरून मनुष्य सहभागी होतो.
प्रत्यक्ष भगवंत (त्यातही पूर्णावतार) श्रीकृष्णच म्हणतात - कर्मणि एव अधिकारः ते - मा फलेषु कदाचन| कर्तुमकर्तुम सर्वशक्तीमान परमेश्वराचा पूर्णावतारच असे म्हणत आहे तर तिथे मर्त्य मानवांच्या भाकितांनुसार कोणत्याही कर्माचे फळ बदलता येईल असे कसे? पुढे भगवान म्हणतात - कोणतेही कर्म फळाच्या अपेक्षेने करू नकोस आणि जे व्हायचे ते होईल म्हणून हातवर हात धरूनही बसू नकोस. मग 'मी असे असे करणार आहे, त्याचे फळ मला काय मिळेल?' असा विचार करून ज्योतिषाला प्रश्न विचारणे परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध नाही काय? यातील मानसशास्त्राचा भाग महत्वाचा आहे. भविष्यकथनाने मिळणार्‍या पांगळ्या मानसिक आधारापेक्षा परमेश्वराने सांगितले आहे म्हणून कार्य करणे हे आद्य कर्तव्य आहे हा आध्यात्मिक-मानसशास्त्रीय आधार लोकांना पुरेसा का ठरू नये? त्यांनी भविष्यवेत्त्याकडे का धाव घ्यावी? याचाच अर्थ लोकांची श्रद्धा धेडगुजरी आहे. त्यांचा मर्त्य ज्योतिषावर विश्वास आहे पण ज्याच्या मर्जीने सर्व ग्रहगोल फिरतात त्या प्रत्यक्ष परमेश्वरावर नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ज्यांच्या

पर्नल नेने मराठे
Mon, 09/07/2009 - 11:39 नवीन
ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे. हे मात्र पटले. चुचु
  • Log in or register to post comments

ज्योतिषाची उपयुक्तता

ए.चंद्रशेखर
Mon, 09/07/2009 - 13:20 नवीन
भांग, दारू, चरस किंवा अल्प प्रमाणात बिडी तंबाखू हे जेवढे जीवनाला उपयुक्त आहेत तेवढीच उपयुक्तता भविष्यवाणीची असते. या सर्व गोष्टी काही कालासाठी मनुष्याला एक प्रकारचा दिलासा देतात. चंद्रशेखर
  • Log in or register to post comments

<<<<<<<<<<ज्यांच

JAGOMOHANPYARE
Mon, 09/07/2009 - 13:29 नवीन
<<<<<<<<<<ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.>>>>>>>>> फसवे वाक्य.......... :) हे वाक्य म्हणजे आपली गिर्‍हाईक वाढण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिन्ग आहे........... पूर्वी राजे महाराजे, सरदार, धनिक लोक ज्योतिष जास्त बघत........ आजही राजकारणी, उद्योजक, सिनेमावाले... भविष्य, दगडधोन्डे, वास्तू, आकडे, स्पेलिन्ग बदलणे.. असल्या उचापती करत असतात.....
  • Log in or register to post comments

इमोशनल ब्लॅकमेलिन्ग

युयुत्सु
Mon, 09/07/2009 - 16:15 नवीन
फसवे वाक्य.......... Smile हे वाक्य म्हणजे आपली गिर्‍हाईक वाढण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेलिन्ग आहे...........
यात फसवं काय ब्लॅक मेलिंग काय आहे बुवा? स्पष्ट झाले नाही...
  • Log in or register to post comments

पृथ्वीचा, इतर ग्रहांचा आकार, ग्रहांचा संभाव्य परिणाम व जन्मदर

अमृतांजन
Mon, 09/07/2009 - 19:21 नवीन
भारतात जन्मदर २३ प्रति हजारी आहे. २००९ ची अंदाजे लोकसंख्या: 1,198,003,000 (http://en.wikipedia.org/wiki/India) ११९८००३०००/१०००= ११९८००३ ११९८००३ * २३ = २,७५,५४,०६९ बालके प्रतिवर्ष भारतात जन्मतात (दोन कोटी, पंचाहत्तर लाख) २,७५,५४,०६९/३६५= ७५, ४९० बालके प्रतिदिन भारतात जन्मतात ७५, ४९०/२४= ३१४५ बालके प्रतितास भारतात जन्मतात ५२ बालके प्रतिमिनिट भारतात जन्मतात भारतातील ह्या ५२ बालकांचे भविष्य सारखेच असते का? As of 2007, the average birth rate for the whole world is 20.3 per year per 1000 total population, which for a world population of 6.5 billion comes to 134 million babies per year. वरील गणिताप्रमाणे जगभरात प्रतिमिनिट २५४ बालके जन्मतात; ह्या २५४ बालकांचे भविष्य सारखेच असते का?
  • Log in or register to post comments

भारतातील ह्या ५२ बालकांचे भविष्य सारखेच असते का?

युयुत्सु
Mon, 09/07/2009 - 21:41 नवीन
भारतातील ह्या ५२ बालकांचे भविष्य सारखेच असते का?
ह्या २५४ बालकांचे भविष्य सारखेच असते का?
या दोन्ही प्रश्नांचे उत्तर नाही असे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा