✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सखा श्रावण

च — चंद्रप्रभा, Sun, 09/16/2007 - 15:32

प्रतिक्रिया द्या
16909 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
प्रियाली Sun, 09/16/2007 - 16:21 नवीन

कविता आवडली

सोप्या शब्दांतली निरागस कविता आवडली. येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे. स्वागत आहे. अजून लेखन होऊ दे. पुढील लेखनाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
च
चंद्रप्रभा Sat, 09/22/2007 - 11:18 नवीन

धन्यवाद

प्रतिक्रया वाचुन छान वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 16:29 नवीन

छान कविता..

नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं साधी, सोपी आणि सुंदर कविता... वरील ओळी आवडून गेल्या... >>(येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.) मिसळपाववर आणि पर्यायाने आंतरजालावर आपले स्वागत.. औरभी लिख्खो.. तात्या.
  • Log in or register to post comments
च
चंद्रप्रभा Sun, 09/23/2007 - 15:03 नवीन

धन्यवाद

तात्या साहेब, या स्थळावर स्वागताबद्द्ल धन्यवाद. यामुळे मला अनेक वाचकां पर्यंत पोहोचता आले आणी माझा उत्साह दुणावला. कवितेवर प्रतिक्रीया लगेच वाचायला मिळाल्या्ने छान वाटले. सकाळ मध्ये मी कविता पाठवत असे, पण वृत्तपत्रिय लेखनात, हे लगेच प्रतिसाद असणे नव्हते. असो, लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे परत वाचतांना ज्या चुका दिसल्या त्या आता काढल्या. -चंद्रप्रभा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धनंजय Tue, 09/18/2007 - 05:55 नवीन

छानच खेळ

> खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा > खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा वा! आंतरजालावर स्वागत आहे तुमचे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रप्रभा Sun, 09/23/2007 - 15:04 नवीन

धन्यवाद

आपली प्रतिक्रीया वाचुन उत्साह वाटला. आपणही कविता करता असे दिसते. -चंद्रप्रभा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चित्रा Tue, 09/18/2007 - 06:34 नवीन

छान आहे

कविता. प्रसन्न वाटले.
  • Log in or register to post comments
च
चंद्रप्रभा Sun, 09/23/2007 - 15:07 नवीन

धन्यवाद

आपली प्रतिक्रीया वाचुन, मलाही प्रसन्न वाटले. अश्या त्वरीत प्रतिक्रीयेने छान वाटते आहे. असे कधी कधी शब्द जुळतात, जुळून येतात. कविता मनासारखी उतरली कीही वेगळेच प्रसन्नपण लाभते. त्यावर प्रतिसाद येणे म्हणजे आनंदच आहे. -चंद्रप्रभा
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 20:51 नवीन

@आला आला

@आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला पाश्चिमात्य जगातल्या Red Carpet पेक्षा ही हिरवी पायघड कितीतरी नेत्रसुखद. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/16/2008 - 21:06 नवीन

अतिश्य सुरेख...

चंद्रप्रभाताई, मिपावर स्वागत. आपली कविता अतिशय देखणी (हो देखणीच) आहे... गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला या ओळी तर अगदीच दूधात साखर... अशाच आणखिही येऊदेत तुमच्या कविता. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 03/16/2008 - 21:08 नवीन

सुरेख !!

सुरेख कविता ! हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी यांसारख्या ओळींमुळे वाटते की त्या श्रावणझरींमधे आम्हीही भिजतो आहोत. कुसुमाग्रजांच्या हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला... ची आठवण झाली. या मोहक अनुभूतीबद्दल धन्यवाद ! आणि मिपावर सुस्वागतम !
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Sun, 03/16/2008 - 21:12 नवीन

खूप छान कविता...

वेगळी, पसन्न. हिरवाईचा आनंद देणारी.
  • Log in or register to post comments
इ
इसम Sun, 03/16/2008 - 21:56 नवीन

माझ्या मुलाच्या मदतीने !!!!!

चंद्रप्रभाताई, आपल्या आईच्या कविता लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे मुलाला वाटणे हाच तुमच्यातील कवयित्रीचा पहिला विजय. एरवी आईच्या (नोकरी/घर्/नातेवाइक/मैत्रिणी/स्वयंपाक) व्यतिरिक्त इतर व्यक्तिगत जाणिवांशी मुलांची उत्तरोत्तर ताटातूट होत जाते आणि हा नव्या कुटुंबव्यवस्थेचा/ नव्या जमान्याचा परिणाम आहे असा माझा एक समज आहे. तेंव्हा हा एका ''आई"चा ही विजय ठरतो. इतकी छान समज असण्याबद्दल तुमच्या मुलाचेही अभिनंदन!!! आता यापुढे मात्र तुम्ही आणि तुमच्या कविता...... -एक इसम
  • Log in or register to post comments
न
नन्दु Sun, 03/16/2008 - 22:52 नवीन

सुन्दर कविता

खरच मनाला आनद देनारि व उल्लासित करनारि कविता छान!!!!!!!!! मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 03/17/2008 - 00:24 नवीन

छान कविता

सुंदर कविता लिहिली आहे.. आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला या ओळी आवडल्या. अशाच तुमच्या सुंदर कविता आम्हाला वाचायला मिळू दे.. पुढील कवितांची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:42 नवीन

अत्यंत छान, साधे, सोपे शब्द आणि गेय रचना.

लगोलग छानशी चाल लावली जावी आणि माणिक वर्माबाईंच्या गोड गळ्यातून हे गाणे यावे असे कुठेतरी वाटून गेले! तुम्हाला टंकलेखनात साहाय्य्भूत ठरलेल्या तुमच्या मुलाचेही कौतुक! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/19/2008 - 07:55 नवीन

खूपच छान

गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं ह्या ओळी विशेष आवडल्या...तुमच्या मुलाचीही एखादी कविता इथे नक्की द्या..अजून खूप कवितांची वाट पाहतेय... वरदा
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 23:00 नवीन

सुस्वागतम ..........

चांगली आहे कविता. गहिवरला मेघ नभी ची आठवण झाली. शुभेच्छा. पण लवकरच मुलाच्या मदतीशिवाय लिहू लागा. जालनिरक्षरता बरी नव्हे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 08/19/2011 - 11:47 नवीन

श्रावण

श्रावण सुंदर आला...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा