चतुरंग शेटने एक लेख लिहीला होता... त्यांना जरा जागे करुन विचारा.
http://www.suryanamaskar.info ही साईट बघा
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
सूर्य नमस्कार हा सर्वांग व्यायाम आहे.
त्याने कॅलरीज किती बर्न होतात माहिती नाही.. मात्र पोट कमी होतं, वजनही कमी होतं. पण नुसतेच सूर्यनमस्कार न घालता त्या सोबत श्वास आणि उत्श्वास यांचेही गणित जमले पाहिजे. नमस्कार घालताना केव्हा श्वास घ्यायचा केव्हा सोडायचा याचेही नियम आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
त्यांना चंद्र नमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारांपेक्षा जास्त क्यालरी खर्च होतात. त्याचेही बरेच नियम आहेत, कधी श्वास घ्यायचा कधी सोडायचा वगैरे. पुरातन भारतात त्याविषयी खूपच संशोधन झाले होते. आता संशोधन मागे पडले, पण अद्यापही सर्व जगात हे लोकप्रिय आहेत. पाश्चिमात्यांनी भारतीयांकडून चोरलेली आणखी एक कला/विद्या.
-- मिसळभोक्ता
छान धागा आहे, मलाही फायदा होइलसे वाटतय... :D
अवांतर : इकडे मी २४ तास फिटनेसमधे योगाच्या क्लाससाठी गेली होती पण तो ट्रेनर इतका काय मृदुपणे बोलत होता की मला सॉल्लिड डुलक्या यायला लागल्या आणि इतके भयानक आसनं पण दाखवत होता की जणू त्याला मला करता येऊ नये असंच वाटत असावं...मग काय अर्ध्यातुन घरी यावंच लागलं :D
दिपाली :)
व्यायाम सर्वांगसुंदर आहे. बर्याच आसनांचा त्यात सहज अंतर्भाव आहे. एका नमस्काराने नेमक्या किती कॅलरीज खर्च होतात माहीत नाही पण भरपूर होत असाव्यात. बारा सूर्य नमस्कार व्यवस्थित घातले तर मला बारीक बारीक घाम यायला सुरुवात होते असे माझे निरीक्षण आहे.
मुख्यतः सर्व सांधे, मेरुदंड, पोट, मान, कंबर, हात, पाय असा चौफेर व्यायाम आहे.
सर्वसामान्यपणे दिवसभरात आपल्या ज्या प्रकारच्या हालचाली होत नाहीत त्या आपसूकच नमस्कारात घडतात त्यामुळे शरीरात चैतन्य येते याची जाणीव तुम्हाला नमस्कार संपताच होते.
अतिशय नव्याने व्यायाम सुरु करीत असाल तर सुरुवातीला जरा सांधे मोकळे करुन घ्या. बेतानेच सुरुवात करा. एकदम आसनाच्या शेवटल्या अचूक स्थितीला शरीर दामटवू नका त्याने अपायच होतो. पहिल्या आठ्वड्यात चक्क ३ नमस्कारांपासून सुरुवात करा. दुसर्यात ५, मग ७, ९, १२ असे सावकाश वाढवा. २४ नमस्कार मजबूत व्यायाम देतात. मानसिक फायदे म्हणजे मन शांत होते. मेरुदंडाचे आणी मानेचे व्यायाम असल्याने डोक्याकडचे रक्ताभिसरण सुधारते, सर्व जाणीवा तरतरीत झाल्याचे कळते. लास्ट बट नॉट लीस्ट २४ नमस्कार घातलेत तर थोड्याच वेळात चांगली भूक लागते! ;)
(अय्यंगार)चतुरंग
च्यामारी ...
आम्ही याम करताना कधी कॅलरी फिलरीचा इचार केला नाय ... याम करायचा तं एकदम रगाट ... पण येवस्थित ... बाझवला तिच्यामायला त्या कॅलरीच्या मंग ...
चला आमची येळ झाली यामाला जायची !!! कॅलरी मोजकयंत्र कुठे आहे बरे माझे ? अरे .. कोण आहे रे तिकडे .. माझे नाईकीचे पादत्राणं ,कपाळावर आणि मनगटावर लावायचे अदिदासचे घाम पुसण्याचे वस्त्र, रिबॉक ग्लब्ज आणि प्युमाचे सॉक्स कुठे आहेत ? अंमळ ट्रेडमिलवर कॅलरी मोजत मोजत पळू म्हणतो आज ? आपण पण उच्चभ्रु होणार :)
-(अंमळ पै) टारझन
संपले ..... आता प्रतिसाद संपले !!
मला बराच वेळ खुर्चीत बसलं की पाठदुखी होते, खरंतर व्हायची. ताठ बसायचं हे कितीही ठरवलं तरीही दिवसभरात कधी ना कधी ते विसरायला होतंच. गेली काही वर्ष (अ)नियमितपणे सूर्यनमस्कार घालत आहे, आणि पाठदुखीही झाली नाही. मला वाटतं याचं कारण आपण नेहेमीच्या कामांमधे पुढे वाकतो पण मागच्या बाजूला वाकत नाही. सूर्यनमस्कारामधे तेही होतं. शिवाय व्यायामाचे इतरही अनेक फायदे असतात ते तर होतातच.
लास्ट बट नॉट द लीस्टः चांगली भूक लागली तरी चीज-बटाटा रोल खाण्यापेक्षा सातूचं पीठ खावं.
अदिती
प्रतिक्रिया
चतुरंग
सूर्य
मलाही...
इथे कुणाला
>>इथे
घ्या ...
उलटे
चला निदान
छान धागा
काही दुवे
खरंच
सूर्य नमस्कार हा
च्यामारी
मी माणसांबद्दल बोलत होतो! ;)
छ्या ...
सहमत
उपयुक्त