फार मस्त हो ताई ! फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटलंय.
तुम्ही पाककृती टाकल्याबद्दल धन्यवाद. मला स्वतःलाच उकडीचे मोदक करुन बघायची इच्छा आहे. ती कदाचित आता पूर्ण होईलसे वाटते.
रंग घातलात की केशर वगैरे? (सुबक काय वेडी आहेस तू! इतका पिवळा रंग यायला पाव किलो वगैरे केशर लागेल! :))
माझी आई पण सही मोदक करते...पण ती पारी पोळपाटावर लाटून करते! मी पडले धसमुसळी! त्यामुळे 'हातात पारिजातकाचं फुल धरलंय असं समजून मोदक केला की मस्त होतो' असं ती मला नेहमी सांगते.
आणि त्या मागच्या पार्श्वभूमीला विंदांच्या कवितेतले शब्द अगदी समर्पक!
धन्यवाद स्वातीताई...विंदांचीच कविता आहे याबद्दल खात्री नव्हती म्हणुन संदर्भ नव्हता दिला मी...पण आता बदल केला आहे :-)
काय सुरेख दिसताहेत मोदक! :)
कालच हे तुमच्या ब्लॉगवर पाहिलं होतं, पण तिथे प्रतिक्रिया द्यायला जमेना. बरं झालं, इथेही लिहिलत आणि फोटो दिलेत ते :)
मस्त, मस्त, मस्त!!
५ मोदक पार्सल करुन पाठवावे. तोपर्यंत प्रतिक्रिया देणार नाही.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
खूप आवडलं. खूप नाजुक भावना लोभसवाण्या भाषेत व्यक्त केलीत. अन मोदकांचे तर काय बोलायचे? फोटो बघुन तोंड खवळलंय!
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
स्मिता,
केशरी आणि पांढरे मोदक खूपच मस्त आणि चकचकीत दिसताहेत.
३-४ वर्षांपूर्वी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी आणि आईनी केशरी-पांढरे-हिरवे असे तिरंगी मोदक केले होते त्याची आठवण झाली. :)
--शाल्मली.
फार छान लिहिलंयत, तुम्ही मनाच्या गाभार्यापासून लिहिलेलं माझ्या मनापर्यंत पोहोचलं, डोळ्यांच्या वाटे ('पोटाच्या वाटे' म्हणायला आवडलं असतं, पण हे नेत्रसुखही काही कमी नाही.) आपल्या मातोश्रींपर्यंत आम्हा सर्वांचे धन्यवाद पोहोचवा, तुम्हाला 'हात' दिल्याबद्दल, आणि तुमचे आभार 'हात व्यवस्थित घेतल्याबद्दल'.
जाता जाता: तुमचं हे सोबतच्या प्रकाशचित्रांना घेऊन आलेलं लिखाण छान जमलं आहे, 'पाककृती', 'कलादालन' किंवा 'जनातलं मनातलं' यांपैकी कुठेही चपखल बसेल इतकं.
सुबक ठेंगणी यांच्या प्रतिक्रियेतलं आईचं वाक्य वाचलं -'हातात पारिजातकाचं फुल धरलंय असं समजून मोदक केला की मस्त होतो', क्या बात है!! पाककृती म्हणजे कलाकृतीही असू शकते याचं अप्रतिम विवेचन!
ए... हे धागे बंद करा रे... काय छळवाद आहे हा... :)
लिहिलेलं वाचा, फोटो पहा, खायला काही मिळत नाही. नुसतं वा म्हणा... छळ आहे नुसता छळ.
नीलकांत, असे धागे ब्लॉक करण्यासाठी काही कर असं तुला मागंच सांगितलं होतं राव. काय ते सांग एकदा. 'ठरवून' टाकूया.
कोणाचे मोदक अधिक सुंदर झाले आहेत अशी स्पर्धा लावायची वेळ आली आहे. फारच कळीदार मोदक. (खरे तर याआधी प्राजु, आणि चुचुताई या दोघींनीही सुंदर केलेत आहेत मोदक, आणि हेही खूपच सुंदर)
वर बहुगुणींनी लिहीले आहे त्याच्याशी सहमत आहे.
स्मिताताई, मोदक आणि लेख दोन्हीही अप्रतिम!
'हातात पारिजातकाचं फुल धरलंय असं समजून मोदक केला की मस्त होतो' ही शिकवण कायम लक्षात राहील सई!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
एवढे सुंदर मोदक कधी पाहिले नव्हते हो, आईशप्पथ!!
आणि आईचे उपकार फेडणे शक्य आहे काय? आयुष्यभर घेतच असतो आपण तिच्याकडून. त्याची जाणीव ठेवायची आणि परतफेड करायचे निरर्थक प्रयत्न करत राहायचे.
प्रतिक्रिया
सुंदर!
मस्त्च
वा ! एकदम देखणे मोदक, चव तर काय असेल ?
आणि रंगपण सुरेख...
रंग घातलात
व्वा..
धन्यवाद स्वातीताई
रंगीत मोदक फारच छान.
काय सुरेख
मोदक.................
५ मोदक
खुपच सुरेख
प्रकटन
व्वा!
खल्लास...! ता
स्मिताबै
आतपर्यंत पोहोचलेलं लिखाण!
ए...
खरेच छान
अप्रतिम!
अरे
सहमत...
मस्त
प्रतिसादा
केवळ अप्रतीम!
छान
एवढे सुंदर
सुरेख