आजच वर्तमान पत्रात बातमी वाचली की दादा॑नी जे अविरत हसवण्याचे कार्य केलेले आहे ते अविस्मरणीय आहे. सकाळ पेपर नी त्यासाठी एक बक्षिस ही ठेवले आहे..
याची नो॑द घ्यावी..
आपलाच...
विवेक वि.
केवळ विनोदाचाच नव्हे तर इतरही बाबतीत दादा हे 'दादा' व्यक्तिमत्व होते.
कुठेस॑ वाचलेल॑ आठवत॑, एका अभिनेत्रीला एक प्रोड्युसर / डायरेक्टर जास्तच लगट करुन छळत असे, एकदा त्याने रात्री उशीरा त्या अभिनेत्रीस एके ठिकाणी बोलावले. सहाजिकच ती घाबरली. तिने दादा॑शी स॑पर्क साधला आणि हे सा॑गितले, त्यावर दादा तिच्याबरोबर यायला निघाले. त्या॑नी तीला 'तू दुसर्या वाहनाने पुढे हो, मी तुझ्या मागोमाग येतो आणि त्याला आपण र॑गेहात पकडू अस॑ सा॑गितल॑.
ठरलेल्या स्थळी पोहोचल्यावर तो प्रो. / डा. पुढे झाला आणि अभिनेत्रीस जवळ बोलाऊ लागला, तेव्हढ्यात दादा तिथे पोहोचले आणि त्या॑नी आपल्या 'खास' भाषेत त्याची खरडपट्टी चालू केली तर हा माणूस तिथून अक्षरशः पळून गेला.
ह्या क्षेत्रात असे परस्त्रीचा मान ठेवणारे आणि काहीही घेण॑देण॑ नसताना अशी मदत करणारे तसे विरळेच. (अर्थात ह्याला काही सन्माननिय अपवाद आहेतच.)
सार्वजनीक ठीकाणी (चित्रपटाच्या माध्यमातून) शालजोडीतून मारावेत तर दादा॑नीच. आणिबाणीची काय खिल्ली उडवलीये.
आता माणूस म्हणल॑ की कुठेतरी कमी-जास्त आल॑च. त्यामूळे दादा वाद॑गातही अडकले. पण चालायच॑.
दादा कोंडके ग्रेटच होते.
एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाची नाडी त्यांनी बरोब्बर हेरली होती.
विनोद द्व्यर्थी असले तरी पिक्चर बघायला मजा येते.
मला त्यांची 'जीवाशिवाची बैलजोडं' आणि 'अंजनीच्या सूता' ही गाणी आवडतात.
आत्ताच्या पिक्चरांमधील ओढूनताणून आणलेले पाचकळ विनोद (?) बघता दादांची महती पटते. सेन्सॉर बोर्डाचे आजचे 'कामकाज' बघता दादांनी आत्ता धूम केली असती असे वाटते...
विनोदाच्या बादशहाला आमची श्रद्धांजली
मनस्वी
दादा कोंडके नावाच्या एका मराठी माणसानं आपल नाव गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय - बहुधा कधीच न पुसलं जाण्यासाठी
"ओळीने सलग नऊ चित्रपटांना रजतजयंतीपार नेणारा जगातला एकमेवाद्वितीय दिग्दर्शक"
या लोककलाकारास त्याच्या पुणतिथीनिमित्त आदरांजली.
गिनीज् च्या जागतिक विक्रम पुस्तिकेत घट्ट शाईनं लिहुन ठेवलाय
गिनीज बूक वाला समज चांगलाच प्रचलित असला तरी, मी कुठेतरी वाचलंय की असा विक्रम अस्तित्त्वात नाही... असो....
प्रतिक्रिया
ऊत्तम
केवळ
मधु कांबीकर !
येस्स्स... म
विनोदातली दादागिरी...
धूम
येक डाव दादा म्हनलं होतं
विक्रमवीर दादा
गिनीज्
सलाम..
आत्ताच्या