दादा कोंडके हे बहुरंगी व्यक्तिमत्व माहित नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी चित्रपटास त्यांचे योगदान खुप मोठे आहे. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणावणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघत / बघतात.
'अपना बझार' मध्ये काम करता करता दादा सेवादला कडे आकर्षित झाले. वसंत सबनीस लिखित नाटक 'विच्छा माझी पुरी करा' हा दादांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट. ह्याच नाटकाने दादांना ओळख दिली.
दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. ह्या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितले नाही. 'सोंगाड्या' ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला व त्यांचा जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली. उषा चव्हाण ही त्यांची आवडती तारका.
त्यांचा बर्याच वेळा सेंसार बोर्डाशी वाद झाला. त्यांचे व्यक्तिमत्व राजकीय तसेच खाजगी गोष्टींमध्ये सुद्धा वादग्रस्त राहिले.
गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या ह्या 'कृष्णा' ची, १४ मार्च ही पुण्यतिथी....१४ मार्च ह्या निमित्ताने त्यांचे हे संस्मरण....
- (सोंगाड्या) शेखर
वाचने
15564
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऊत्तम
केवळ
मधु कांबीकर !
In reply to केवळ by धमाल मुलगा
येस्स्स... म
In reply to मधु कांबीकर ! by राजमुद्रा
विनोदातली दादागिरी...
धूम
येक डाव दादा म्हनलं होतं
विक्रमवीर दादा
गिनीज्
In reply to विक्रमवीर दादा by सर्वसाक्षी
सलाम..
आत्ताच्या