Skip to main content

धा धिन धिन धा

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 31/08/2009 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मेघांचा डफ, तडीतेची थाप गगनाच्या अधरी, मल्हारराग लय.. जलतरंग, भुई छेडीता तालास येई, लयबद्ध जाग पवनाने धरिला सुर अन नाचे गणेश धा धिन धिन धा .... धा धिन धिन धा शुभसुंदर .. अरूपाचे रूप गौरीतनय .. तो गण नृप लोभस मुर्त .. मुखगजस्वरूप आल्हादघन, सांबनंदन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा पदी पैंजणे .. झंकारती रसभाव मुखी .. साकारती तुंदील तन .. मोही मती अंगांग मीन, मुद्रेत लीन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा आकाशगंगा .. तेजाळली नक्षत्रे नभी .. उल्हासली चैतन्यगंधी .. हर्षावली विश्वाचा मंच, अपुरे अनंत नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2113
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

नादमय रचना! विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)