Skip to main content

कावीळलेल्या भींती

लेखक ॐकार यांनी शनिवार, 29/08/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलेली रास खडीची, गंजत पडलेले पत्रे निसरड्या पायरीवरती हुंगत बसलेले कुत्रे कचरापेट्यांना आली बुरशीची दमट नव्हाळी कावीळलेल्या भींती आता झाल्या शेवाळी बिथरला डांबरी रस्ता, बिचकली मातकट धरती विटकरी गांडुळे आली माना वेडावत वरती पागोळ्यांच्या गोळ्या टपर्‍यांवर तडतड करती चहाळ वाफा आल्या की मेणकापडे चळती दरवाज्यावरती आली वाळवी तरणीताठी कुरबुर करण्यात उलटली बिजागरींची साठी वैचित्र्यातील सौंदर्ये पाऊस घेऊनी आला मनातल्या चिखलाचा शिंतोडा एक उडाला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2362
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

उध्वस्तता, ढासळणारे शहर, कोंडलेली हवा... असं बरंच काही समोर आलं.

छान प्रयत्न आहे. "दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

दरवाज्यावरती आली वाळवी तरणीताठी कुरबुर करण्यात उलटली बिजागरींची साठी पुण्यात जुन्या मुंबई - पुणे रस्त्यावर असेच एक सरकारी ऑफिस आहे.

छान कविता आहे. चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. बिपिन कार्यकर्ते

छान कविता. चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. ;)

अशक्य कविता...! तात्या.