Skip to main content

भेटी

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 27/08/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
उजळती दीप स्वप्नांचे अलवार क्षणांच्या भेटी बहरात गंध प्रणयाचा, त्या बकुळफुलांच्या भेटी भिरभिरता अवखळ वारा, सरसरत्या श्रावणधारा नखशिखांत भिजल्या हिरव्या पाऊसखुणांच्या भेटी उलगडली कितिक रहस्ये, गीतांत भाव अवतरले शरदात चांदण्या रात्री हळुवार सुरांच्या भेटी सुकलेल्या गजर्‍यामधल्या गंधाचा अत्तरफाया रुसव्याचे फसवे नखरे, हसर्‍या अधरांच्या भेटी तळव्यावरच्या मेंदीच्या नक्षीत रंगली प्रीती सुकुमार कंठि गुंफियल्या रेशमी करांच्या भेटी विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी अलगद टिपले तार्‍यांनी हृदयाशी मधुर क्षणांना अन् चंद्रानेही जपल्या अंतरी मनांच्या भेटी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2013
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वा छान भेटी! :) कविता आवडली ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ३ वाजून १८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता "प्रेमा तुझा रंग कसा...."

विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी . . . आवडले

विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी मस्तच... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

सुंदर कविता... भिरभिरता अवखळ वारा, सरसरत्या श्रावणधारा नखशिखांत भिजल्या हिरव्या पाऊसखुणांच्या भेटी विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी लय आणि शब्द ... अप्रतिम !!

सुकलेल्या गजर्‍यामधल्या गंधाचा अत्तरफाया रुसव्याचे फसवे नखरे, हसर्‍या अधरांच्या भेटी तळव्यावरच्या मेंदीच्या नक्षीत रंगली प्रीती सुकुमार कंठि गुंफियल्या रेशमी करांच्या भेटी अफाट!! अप्रतिम!! प्रत्येक कडवं सुंदर!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/