Skip to main content

पुन्हा एकदा...

लेखक हृषीकेश पतकी यांनी रविवार, 23/08/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
मन्मनीच्या चांदण्याला एकदा प्राशून जा | जागले हृदयांतरी जे तू कधी फुलवून जा || स्वप्न आणि सत्य दोन्ही का सारखे माझ्याचसाठी | संदर्भ वेड्या भावनांचे तू एकदा लावून जा || मी बोलावता येणे तुझे मज नित्यनेमाचेच आहे | भेटण्या मजला सखे माझ्याविना येऊन जा || भाव या डोळ्यातला अश्रूंसवे झरतोच आहे | नच साध्य जे ते वर्ज्य हे माझ्या मना शिकवून जा || घेऊ नको तू सोबतीला या अक्षरांची माळ ही | उमलेल जे श्वासातूनी शब्दांविना सजवून जा || अंतरीचे गीत माझ्या मी कधीचे गात आहे | साथ दे भोळ्या सुरांची अन तया जुळ्वून जा || बहरेन मी आता नव्याने मज छंद फुलण्याचाच आहे | सध्या रित्या ह्या ओंजळीची पाकळी मिटवून जा || मैफिलीला रंग माझ्या तरीही पुन्हा चढणार आहे | फक्त या जिंदादिलाची शायरी जमवून जा ||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2611
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सु... रे....ख!!!! खूपच सुंदर!!! प्रत्येक कडवं आवडलं... श्वासातूनी सजवण्याची कल्पना खूप छान आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

खरंच सुरेख कविता. बिपिन कार्यकर्ते

बहरेन मी आता नव्याने मज छंद फुलण्याचाच आहे | सध्या रित्या ह्या ओंजळीची पाकळी मिटवून जा || सुरेख, सुरेल प्रेमगीत! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

वाह क्या बात है ! बहरेन मी आता नव्याने मज छंद फुलण्याचाच आहे | सध्या रित्या ह्या ओंजळीची पाकळी मिटवून जा || >> सुरेख, आवडली ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

खरंच सुरेख कविता.

काय सुरेख शब्द पुष्पे गुंफली आहेत ऋषिकेशराव ... अप्रतिम... असेच लिहित रहा... अगदी सुरेश भटांची आठवण झाली... माझ्या आवडत्या या चार ओळी भाव या डोळ्यातला अश्रूंसवे झरतोच आहे | नच साध्य जे ते वर्ज्य हे माझ्या मना शिकवून जा || बहुत बढीया... (कविता, गजल प्रेमी) सागर

In reply to by सागर

एकदम मस्त वाटलं सगळ्या प्रतिक्रिया वाचून.. असाच लोभ असू द्या.. आपला हृषी !!