कोल्हापूर्-गोवा फिरवुन आणलत की मस्त!
पण कोल्हापूरलाच "रक्काळा तलाव" आहे म्हणे.
त्याचा फटु टाकायचा राहिला, की तिकडं जाणच झालं नाही ह्यावेळेस?
बाकी
...आणि वंदनिय बाजी प्रभू देशपांडे ह्यांचा भव्य आणि दिव्य पुतळा. दणकट देहयष्टी, भेदक नजर आणि आक्रमक आवेश. दिलेरखानाच्या सैन्याला ह्या सैतानाला ओलांडून पुढे जाणे शक्यच नव्हते.
ह्या वाक्यात ठळक केलेला शब्द(त्यातील खलनायकी अर्थच्च्छटेमुळे) खटकला.
त्याऐवजी "रुद्राला"किंवा "भीमाला" हे शब्द शोभले असते.
असो, पण वर्णन आवडलं.
आपलाच,
मनोबा
मलाही तोच शब्द खटकल्याने मी आलरेडी संपादनाचे स्वातंत्र्य घेऊन बदल केला होता पण लेखकाचे विचार लक्षात घेऊन परत मूळ शब्द टाकलाय. (लेखकाचा हक्क मूळ लेखावर जास्त असतो तो मान्य.)
चतुरंग
'सैतानाला' हा शब्द विचार करूनच योजला आहे. पावनखिंडीतून वर येणार्या दिलेरखानी सैन्याला हा धिप्पाड, शिवप्रेमाने भारून चवताळलेला महाकाय पर्वत म्हणजे सैतानच वाटला असणार.
दिलेरखान?
नाही हो काका.. पावनखिंडीत आला तो सिद्दी मसुद.. त्याचा सासरा सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालुन बसला होता...
आणि धिप्पाड हबशांपुढे अगदी बाजीप्रभुही सैतान नव्हते हो...
हबशी म्हणजे अफ्रिकेच्या हबसाण प्रांताचे रहिवासी, ते बर्याच ठिकाणी गुलाम म्हणुन विकले गेले आणि अंगभुत गुणांवर मोठे झाले. हबशी हे व्यावसायीक लढवय्ये होते(जसे पठाण). काळ्याकभिन्न, धिप्पाड, उघड्या हबशांची फौज नंग्या तलवारी खांद्यावर टाकुन चालु लागली की भल्याभल्यांची पाचावर धारण बसायची.
जंजीर्याचा सिद्दी हाही हबशीच.
हबश्यांची शरिरयष्टी नक्किच धीप्पाड होती.
सिद्दी म्हणजे हबशी हे आफ्रिकेतल्या सोमालीलँडमधून आले असावते असे विकी म्हणतो. ते आशियात वेगवेगळ्या ठिकाणी पसरले. भारतातही बर्याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य दिसते. त्यांची गणना अनुसूचित जमातींमध्ये होते. विकीच्या दुव्यावर असलेल्या गुजरातेतल्या हबशांचा फोटो हा आफ्रिकन वंशाशी साधर्म्य दाखवणारा असला तरी हे हबशी धिप्पाड नक्कीच वाटत नाहीत. सर्वसाधारण आशियायी चणीच्चेच वाटतात.
चतुरंग
हबशांचे मुळ हबसान किंवा अॅबेसॅनीया..तिथुन त्यांना अक्षरक्षा चोरुन पकदुन युरोपियन व्यापार्यांनी जगभर विकले. त्यांचा ऊपयोग मुख्यता युध्धातिल आघाडीचे योद्धधे म्हणुन व्हायचा. मालिक अंबर, ज्याला बरेच इतिहासकार मराठयांच्या सैनीकी परंपरेचा जनक मानतात, तोही एक हबशी होता. हबशी धिप्पाड होते कि नाही हे आज सिद्ध करणे कठीन आहे कारण धिप्पाडपणाची काही मोजपट्टी नाही. परंतु हबशांची सैनीक म्हणुन असलेलि लोकप्रियता पाहता ते शारीरिक दृष्त्या दणकट असावेत असे मानायला बरीच जागा आहे. बाबासाहेब पुरंदरेही असेच समजतात.
विकीच्या दुव्यावर असलेल्या गुजरातेतल्या हबशांचा फोटो हा आजचा आहे. आज पठाण आडनावाचे अनेक पाप्याचे पितर पहायला मिळतात. हवामान व आहाराच अनुवांशीक शरीरावरही फरक पडतो.
पावनखिंडीत आला तो सिद्दी मसुद.. त्याचा सासरा सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालुन बसला होता.
१००% बरोबर.
टीव्हीवरील राजा शिवछत्रपती मालिकेतील पुरंदरच्या वेढ्याच्या एपिसोडमुळे 'दिलेरखान' डोक्यात घुमत होता. असो.
चुकीबद्दल दिलगीर आहे.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
क्या बात है!!!
काका, खूप दिवसांनी (जवळ जवळ वर्षाने) पन्हाळा, महालक्ष्मी मंदीर चित्रात का होईना...पहायला मिळाले . खूप बरं वाटलं.
फोटो क्लास आहेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- शब्द संपले. फोटो बेहद्द सुंदर आहेत. आणि सगळ्यात हेवा वाटावा अशी गोष्ट म्हणजे : जसे तब्बेतीला मानवेल तशी केलेली भ्रमंती ! या असल्या बेबंदपणावर बाकी सारे कुर्बान आहे.
फोटो सही आलेत!
स्वाईनफ्लूचा फायदासुद्धा होतो असे म्हणायला हवे.;)
आम्हा सर्व विवाहित पुरूषांचा दर आठवड्याला ह्या न त्या कारणाने 'बालाजी ' होतच असतो.
एखाद्याचा 'बालाजी होणे' असा शब्दप्रयोग रूढ व्हायला हरकत नसावी.;)
रेवती
सर्व वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद. दुसरे असे की फोटो चांगले आलेत ही कॅमेराची करामत, फोटोग्राफरची नाही. बहुतेक सगळे प्रोग्रॅम्ड मोड मध्ये काढले आहेत.
मनः कोल्हापूरलाच "रक्काळा तलाव" आहे म्हणे.
त्याचा फटु टाकायचा राहिला, की तिकडं जाणच झालं नाही ह्यावेळेस?
अचानक ठरलेल्या कार्यक्रमात वेळ थोडाच होता. त्यातुन आम्ही जेंव्हा रंकाळ्यास पोहोचलो ती वेळ दुपारची म्हणजे तलावाकाठी हुंदडण्याची नव्हती. त्यामुळे न थांबता पुढे राधानगरी कडे प्रयाण केले. पुढच्या निवांत सहलीत रंकाळा नक्की.
प्राजु: माझी कोल्हापुरची पहिलीच भेट. पहिल्या भेटीत कोल्हापुर आवडले. फडतरे मिसळीने जरा अपेक्षा भंग केला. म्हणजे मिसळ आवडली नाही असे नाही. पण फडतरे मिसळी बद्दल आधी खूप ऐकले होते त्यामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या. असो. वेळे अभावी चोरघे मिसळीचा आस्वाद घेता आला नाही.
मंदिरात आत मध्ये फोटू काढू देत नाहीत.
चतुरंगः ह्या खेपेस जास्त छायाचित्रे आणि कमी प्रवास वर्णन असा आराखडा डोक्यात होता. पुढच्या खेपेस प्रवास वर्णनावर भर देऊ.
गणपा: कोल्हापुर आवडलं मला. जे पाहिलं, चित्रीत केलं ते १/१० असावे असे वाटते. पुढच्या खेपेस जरा तपशीलवार लिहूया.
मदनबाणः सुरुवातच चटकदार झाली तर प्रवास झकास होणारच !!!
अगदी खरं आहे. वेळ कमी पडल्याचा सल काही केल्या जाईना.
यशोधरा: मित्र-मित्रच गेलो होतो.गुराख्यांना घरी ठेवून गुरे उधळली होती. स्वातंत्र्याच्या कैफाला खरा बहर आला तो गोव्याची बॉर्डर ओलांडल्यावर.
नंदनः तसेच बायको रुसली की एखादे भारीतले लुगडे तिला भेट देऊन खुश करायचे ही प्रथाही जुनीच म्हणायची.
मुक्तसुनितः जसे तब्बेतीला मानवेल तशी केलेली भ्रमंती ! या असल्या बेबंदपणावर बाकी सारे कुर्बान आहे.
मीही तोच आनंद अनुभवला. असंच ऐन पावसाळ्यात आख्खा कोकण हुंदडायचं मनात आहे. बहुतेक पुढच्या वर्षी. (७-८ दिवस).
रेवती: एखाद्याचा 'बालाजी होणे' असा शब्दप्रयोग रूढ व्हायला हरकत नसावी.
हा:.. हा:... खरच काहीच हरकत नाही.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
वाह!!!!'
काकाश्री दिल खुष हो गया.
मस्त आहेत सगळीच प्रकाशचित्रे.
ढगफुटीच चित्र केवळ उच्च. :)
सदाफुली देखील मस्तच. पण अशा चित्रांमध्ये बराच वेळ असतो आपल्याकडे. ढगफुटीसारल्ख चित्र मिळण फार कठीण :)
आमच्या पन्हाळ्यावर भेळ नाय का खाल्ली?? तीन दरवाजा जवळ?
आणि एक मध्येच तलाव आहे तिथे नाही का गेलात? पावसाळ्यात तिथे असल गुढ वातावरण असत ना.
पुसाटी बुरुजावर नाही गेलात??
actually me navin aahe tari dekhil (tumhi mala navin nahi karan me tumche mipavaril lekh vachate)mala mahit asate tar tumhala ghari bolawal asat. radhanagari roadlach aamacha gav aahe. punha aalat ki mala contact kara.
सगळेच फोटो आवडले. मस्त!
माझा नेमका रोमॅंटिक स्थळांचा फोटो डाऊनलोड होत नाहि आहे :(
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "ऋत आ गयी रेऽऽ ऋत छां गयी रे!.."
प्रतिक्रिया
वाह ! सुंदर
वा @@ छाणच
झकास!
मनोबा
धन्यवाद....
विचार करूनच..
दिलेरखान? न
चुकभूल द्यावी घ्यावी....
हबशी
कुतुहल वाटल्याने सहज विकी चाळला.
हबशांचे
१००% बरोबर.
काका, असचं
च्यामारी !!!
+१
क्या बात
वा राव एकदम जबराट सहल झाली की तुमची!
वाह
क्लाsssssssssस!!!
व्वा.
बरेच
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर लेख..
झक्कास!!
हेवा
मला वाटलं...
काय लिहू ?
फोटो सही
स्सहीऽ
मस्त फोटो
घाऊक धन्यवाद.
वाह!!!!' काका
क्लास!
जुन्या आठ्वणी जाग्या झाल्या.
pethkar kaka
वाहवा! मस्त
झ का स...
वा काका!!
असेच म्हणतो
वा
बढिया!
छान
छान फोटो
आजकाल...
पावसातला