स्वाईन फ्ल्यू मुळे 'यज्ञकर्म' बंद ठेवावं लागलं आणि हाती आलेला मोकळा वेळ सत्कारणी कसा लाववा ह्यावर मित्रांसमवेत खलबत सुरू झालं. एक मतानं ठरलं की कोल्हापूरला जाऊया. झालं ठरलं.
दुसर्याच दिवशी सकाळी साडेसातला कोल्हापुरास प्रयाण केले आणि ठिक साडे-अकराच्या सुमारास कोल्हापुरात पोहोचलो.
आता कोल्हापुरची सुरुवात कुठून करणार? अर्थात 'फडतरे मिसळ'. मिसळ चापून तडक निघालो.....
'पावन खिंड'. पावन खिंड पाहणे एक थरारक अनुभव आहे. खिंडीत पाऊस आणि ढग उतरल्यामुळे काही दिसत नव्हते तसेच छायाचित्रणही शक्य झाले नाही.
इथे 'पावन खिंड' नांव दिले आहे. पण हिच खरी 'पावन खिंड' आहे की पुढे एक 'घोड खिंड' आहे ती खरी 'पावन खिंड' ह्यावर माफक चर्चा करीत पुढील प्रवासास सुरुवात केली.
किल्ले पन्हाळ गड. 'पनांग' म्हणजे नाग आणि 'हाळ' म्हणजे घर. 'नागाचे घर' म्हणजेच 'पनाग-हाळ' त्याचाच अपभ्रंश 'पन्हाळा'.
आम्ही न घेतलेला स्थानिक गाईड दुसर्या कुणाला तरी सांगत होता.
'पन्हाळगड' परीसर बराच विस्तृत आणि आजच्या काळातही 'वसलेला' आहे.
गडावरील बांबूचे वन आणि इतर निसर्गही पाहण्यासारखा आहे.
अशी खुप ठिकाणे छायाचित्रणासाठी आपल्याला अगदी मोहात पाडतात.
पन्हाळगडावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर....
.....आणि गडावरील रोमँटीक ठिकाणे..
गडाच्या तटावरील रम्य वनराई...
...आणि वंदनिय बाजी प्रभू देशपांडे ह्यांचा भव्य आणि दिव्य पुतळा. दणकट देहयष्टी, भेदक नजर आणि आक्रमक आवेश. दिलेरखानाच्या सैन्याला ह्या सैतानाला ओलांडून पुढे जाणे शक्यच नव्हते.
कोल्हापुरास भेट द्यायची आणि महालक्ष्मीला जायचे नाही असे होणे नाही.
दक्षिणेतल्या बालाजीची ही पत्नी काही कारणाने रुसली आणि कोल्हापुरात येऊन बसली. म्हणजेच देवादिकांपासून दक्षिणेतून निघाले की थेट महाराष्ट्र गाठायचा हिच परंपरा आहे.
बालाजी दरवर्षी आपल्या ह्या प्रिय पत्नीस खुष करण्यासाठी उंची लुगडे पाठवतो. बिच्चारा, देव झाला म्हणून काय झाले. त्यालाही हे भोग सुटले नाहीतच नं! त्याला कल्पना नसावी. आम्हा सर्व विवाहित पुरूषांचा दर आठवड्याला ह्या न त्या कारणाने 'बालाजी ' होतच असतो. असो.
राधानगरीच्या वाटेवरील हिरवाकंच निसर्ग...
राधानगरी धबधबा....
अजून जरा जवळून...
इथून निघताना मनाने उचल खाल्ली. चला, गोव्याला जाऊया. गोव्याचे नांव निघताच मित्रांचे डोळे चमकलेच. चला. गाडी वळविली ......टू गोवा.
पावसाळी वातावरण. इथे-तिथे निसर्ग. आणि डोळ्यात गोव्याच्या संध्याकाळची सुरईची...आपलं...सुरम्य स्वप्न.
कलंगुट बीच. मस्त... धुंद वातावरण. समुद्राचे सौदर्य आणि धीरगंभीर गाज. चित्तवृत्ती फुलून येतात.
गोव्यातील मनुष्यनिर्मित सौंदर्य.....
अंजुना बीच...
परतीच्या प्रवासात अंबोली घाटात धबधब्याजवळ थांबलो. धुके आणि पावसाने धबधब्याचे छायाचित्रण शक्य झाले नाही. पण २००४ साली जिथे चहाची एकमेव टपरी होती तिथे आता वडापाव, चहा, साबूदाणावडा, वेफर्स इत्यादी विविध खाद्यपदार्थ पुरवणार्या १२-१३ टपर्या झाल्या आहेत. धबधब्याच्या अबाधित सौंदर्याला व्यावसायिकतेची बाधा झाली आहे.
परतीच्या प्रवासात निपाणी-कोल्हापूर रस्त्यावर 'ढगफुटी'. डोक्यावरून समोर कित्येक मैल पसरलेला काळाकुट्ट, घट्ट आणि वजनदार ढग दूरवर फुटून कोसळत होता. लवकरच आम्ही त्या प्रपातात पोहोचलो.
पुण्याला घरी पोहोचलो. थकलो होतो. येताना वाटेत पाऊसच पाऊस. सगळी हौस भागली होती. पुण्यातही पाऊस होता. झोपलो. दुसर्या दिवशी सकाळी पाहिला आमच्या गॅलरीतला 'निसर्ग'.




















| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
15011
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह ! सुंदर
वा @@ छाणच
In reply to वाह ! सुंदर by दशानन
झकास!
मनोबा
In reply to झकास! by मन
धन्यवाद....
In reply to मनोबा by चतुरंग
विचार करूनच..
In reply to झकास! by मन
दिलेरखान? न
In reply to विचार करूनच.. by प्रभाकर पेठकर
चुकभूल द्यावी घ्यावी....
In reply to दिलेरखान? न by शैलेन्द्र
हबशी
In reply to चुकभूल द्यावी घ्यावी.... by प्रभाकर पेठकर
कुतुहल वाटल्याने सहज विकी चाळला.
In reply to हबशी by शैलेन्द्र
हबशांचे
In reply to कुतुहल वाटल्याने सहज विकी चाळला. by चतुरंग
१००% बरोबर.
In reply to दिलेरखान? न by शैलेन्द्र
काका, असचं
In reply to १००% बरोबर. by प्रभाकर पेठकर
च्यामारी !!!
+१
In reply to च्यामारी !!! by बिपिन कार्यकर्ते
क्या बात
वा राव एकदम जबराट सहल झाली की तुमची!
वाह
क्लाsssssssssस!!!
व्वा.
बरेच
+१
In reply to बरेच by यशोधरा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर लेख..
झक्कास!!
हेवा
मला वाटलं...
In reply to हेवा by विसोबा खेचर
काय लिहू ?
फोटो सही
स्सहीऽ
मस्त फोटो
घाऊक धन्यवाद.
वाह!!!!' काका
क्लास!
जुन्या आठ्वणी जाग्या झाल्या.
pethkar kaka
वाहवा! मस्त
झ का स...
वा काका!!
असेच म्हणतो
In reply to वा काका!! by समंजस
वा
बढिया!
छान
छान फोटो
आजकाल...
पावसातला