Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विनायक पाचलग on Sat, 08/22/2009 - 21:59
  • Log in or register to post comments
  • 14839 views

प्रतिक्रिया

Submitted by लवंगी on Sat, 08/22/2009 - 23:05

Permalink

रडवलं बाबा..

:(
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 08/22/2009 - 23:15

Permalink

!!!

हे गाणं ऐकवत तर नाही आणि परत ऐकावंसं वाटतं. हा कार्यक्रम पहिल्यांदा झाला तेव्हाच वाईट अवस्था झाली होती. असो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Sat, 08/22/2009 - 23:46

In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

असच...

अगदी मनातल बोललास बिपिनदा...
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 08/24/2009 - 03:14

In reply to असच... by गणपा

Permalink

मग काय रे...

ज्याचे जळते त्यालाच कळते... नाही तर नुसतेच वारे जाते. आणि माझ्या मते हा विषय चर्चा वगैरे करायचा नाहीच्चे. बाकी ते गाणे त्यातल्या शब्दामुळे भावले आहे. सूर, ताल वगैरे आ.का.का.क.ना.हे.ज.जा.आ. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sat, 08/22/2009 - 23:38

Permalink

धन्यवाद!

अप्रतिम शब्द, तितकीच सुंदर चाल! सर्व पालकानी ऐकण्यासारखं गाणं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 08/22/2009 - 23:44

Permalink

ठीक आहे.

अनेक परदेशस्थ नागरीक्,संगणक क्षेत्रातील राबणारे लोक आहेत,त्या सर्वांची व्यथा हे गाणे मांडते हम्म, पैशासाठी धावाधाव करणार्‍यांसाठी असा अनुभव असेल, त्यात नवल काय ? मी हा कार्यक्रम पाहिलेला आहे. पण रडवेला वगैरे काही होत नाही. लोक कुठे आणि किती भावनिक होतील याची काही गॅरंटी नाही. असो, अजून काय, बारावीचा अभ्यास काय म्हणतो ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Sun, 08/23/2009 - 00:18

In reply to ठीक आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

काय सांगता ?

विनायका, मस्त गाण्याची लिंक दिली. बिपीनदा म्हणतात तसे च्यायला ह्या गाण्याने पहिल्या पाहण्यातच पार हळवे करुन टाकले, वाटले आता नको पहायला, मग शेवटी डाऊनलोड करुन ५-६ वेळा पुन्हा पाहिले ... असो, चालायचेच ... >>हम्म, पैशासाठी धावाधाव करणार्‍यांसाठी असा अनुभव असेल, त्यात नवल काय ? आश्चर्य वाटले सर तुमच्याकडुन ह्या टाईपची प्रतिक्रिया वाचुन. असो, असो. असतील बाबा लोक पैशासाठी धावाधाव करणारी आणि बेगडी भावना आणि हळवेपण दाखवणारी ... च्यायला लोक रडताना पाहताना आम्हाला वाटले की गाणे पार आतपर्यंत घुसते आहे पण ह्याचा संबंध फक्त "पैशासाठी धावाधाव" करणार्‍यांपुरताच मर्यादित असेल असे अजिबात वाटले नव्हते ... बाय द वे, आता अशा टाईपच्या प्रतिक्रिया मला "स्टेरिओटाईप (साचेबद्ध ? )" वाटत आहेत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे हे ओघाने आलेच ... >>मी हा कार्यक्रम पाहिलेला आहे. पण रडवेला वगैरे काही होत नाही. मीसुद्धा हा कार्यक्रम पाहिला नाही, मात्र आत्ताचे ही क्लिप पाहिली .... खोटं कशाला बोला, हे गाणे मला ५ मिनीटे हळवे करुन गेले, जर कधी भविष्यात हा कार्यक्रम प्रत्येक्षात पाहिला तर काय सांगावे डोळ्यात पाणी येईल सुद्धा ... जे आहे तसे आहे, उगाच कशाला लपवा ? >>लोक कुठे आणि किती भावनिक होतील याची काही गॅरंटी नाही. खरं आहे तुमचे म्हणणे ... आजकाल लोकांच्या ह्या भावनिक होण्याचा संबंध कशाकशासी लावला जाईल ह्याचीही काही गॅरेंटी नाही. ;) चालायचेच ... अवांतर : मी अजुन बाप वगैरे झालो नाही पण हे गाणे टच करुन गेले यार, बाप झालेल्या व समकक्ष परिस्थीतीतुन जाणार्‍या लोकांना काय लेव्हलचा हळवापणा वाटत असेल ह्याचा अंधुक अंदज येत आहे. जियो संदिप-सलिल ...!! ----- छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Sat, 08/22/2009 - 23:53

Permalink

हम्म

बरोबर आहे सर. बाकी कोण किती भावनीक होईल हे व्यक्तीसापेक्ष आहे. मग तुम्ही लेख वाचा आणि त्यावर तुम्हाला काय वाटते ते लिहा. अभ्यास चालु आहेच,आपले आशिर्वाद असु देत इतकेच सांगणे (अभ्यासु गणेशभक्त) विनायक
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 08/22/2009 - 23:59

In reply to हम्म by विनायक पाचलग

Permalink

सकाळमधे चांगले लिहिले आहे.

सकाळमधील लेखाबद्दल अभिनंदन चांगलं लिहिलंय ! >>आपले आशिर्वाद असु देत इतकेच सांगणे अरे, देवाचे आशिर्वाद असले पाहिजे. माणसाचे काय खरे नसते. असो, पुढील लेखनासाठी शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 08/23/2009 - 07:48

Permalink

हे गाणं

हे गाणं जितक्या वेळेला ऐकलं तितक्या वेळा मनात कल्लोळ माजला आहे.. बास्!! बाकी काही लिहित नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sun, 08/23/2009 - 10:27

Permalink

अतिशय

अतिशय सुंदर, साधे शब्द आणि मनातल्या कल्लोळाला साथ देणारी चाल.. हे गान आतुन हलवतं.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 08/23/2009 - 12:04

Permalink

ठीक! तूर्ता

ठीक! तूर्तास इतकेच. सवड झाल्यास बाकी विवेचन करेन.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Sun, 08/23/2009 - 22:58

In reply to ठीक! तूर्ता by विसोबा खेचर

Permalink

तात्या

तात्या सलील बर्‍याच ठीकाणी सुरात घसरल्या सारख्या माझ्या कानांना वाटतो आहे. सवड मिळाली की तुमच्या तज्ञ कानांनाही तसेच वाटले का ते कळवा. निमीत्त मात्र
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 08/23/2009 - 23:21

In reply to तात्या by निमीत्त मात्र

Permalink

तात्या

तात्या सलील बर्‍याच ठीकाणी सुरात घसरल्या सारख्या माझ्या कानांना वाटतो आहे. सवड मिळाली की तुमच्या तज्ञ कानांनाही तसेच वाटले का ते कळवा.
तशी ती मुलं गुणी आहेत... सवड मिळाल्यास नक्की लिहीन. पण फारसं काही लिहू शकेन असं वाटत नाही..परंतु मुलं काहीबाही प्रयत्न करताहेत हे चांगलं आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Sun, 08/23/2009 - 23:41

In reply to तात्या by विसोबा खेचर

Permalink

तरीसुद्धा लिहाच ...

>>पण फारसं काही लिहू शकेन असं वाटत नाही..परंतु मुलं काहीबाही प्रयत्न करताहेत हे चांगलं आहे.. हम्म्म्, एकदम मान्य आहे. तरीपण आपण ह्यावर लिहावे अशी विनंती करतो ... आम्हाला चाल, लय आणि गाण्यातल्या टेक्निकल बाबी काहीही कळत नाही, अजिबातच कळत नाही म्हटले तरी चालेल. मात्र ते शब्द आणि काव्य फारच आवडले, तेव्हा आता ह्याचेच सादरीकरण उत्तम कसे करता येईल व त्यात अजुन रंग कस्सा भरता येईल हे जाणणे आम्हाला आवडेल. ह्यातले एक दर्दी म्हणुन तात्या तुम्ही जरुर लिहा ... सवडीने लिहा, आम्ही वाट पाहु, अजिबात गडबड नाही पण आग्रह मात्र जरुर आहे ... ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 08/24/2009 - 03:29

In reply to तरीसुद्धा लिहाच ... by छोटा डॉन

Permalink

सहमत...

मी वर लिहिलंय तसं, मला हे गाणं त्यातल्या शब्दांमुळे आवडलं. बाकी काही कळत नाही. पण मलाही तात्यासारख्यांकडून सादरीकरणाबद्दल काही लिहिले गेले तर वाचायला आवडेल नक्कीच. कधी कधी अगदी उत्तम काव्यही किंवा कोणतीही कलाकृती सुमार सादरीकरणामुळे पार ढेपाळते. त्या अनुषंगाने काही वाचायला आवडेल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 08/23/2009 - 23:21

In reply to ठीक! तूर्ता by विसोबा खेचर

Permalink

मला

मला गाण्यातलं खूप कळत नाही. पण मला तरी चाल आवडली. बाकी त्यांनी सुरवातीलाच सांगीतलं की चाल अजून नीट बसलेली नाहीय, सांभाळून घ्या. गाणं संपूर्ण तयार झाल्यानंतर खूप छान असेल. स्टेज वर गाणं सादर करणं अवघड असतं. कितीतरी स्टेज शोज मध्ये मोठे-मोठे गायक मूळ गाणं लाउन फक्त लीप मुव्हमेंट्स करतात. "I always win, except when I loose. But then I just don't count" :D
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sun, 08/23/2009 - 22:46

Permalink

दम नाही.

चालीत अजिबात दम नाही.एकदम सामान्य. :( सलील कुलकर्णी उगाचच ताणून गातोय. माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sun, 08/23/2009 - 22:50

In reply to दम नाही. by प्रमोद देव

Permalink

चाल आणि

चाल आणि संगीत सोडा हो काका, ते साधे शब्द वेड लावतात...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sun, 08/23/2009 - 22:55

In reply to चाल आणि by शैलेन्द्र

Permalink

तसं असेलही...

काव्य बर्‍यापैकी आहे. पण मी तरी इतका भावूक नाहीये. :) माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 08/23/2009 - 22:58

In reply to दम नाही. by प्रमोद देव

Permalink

काय सांगता ?

चालीत अजिबात दम नाही.एकदम सामान्य. :( सलील कुलकर्णी उगाचच ताणून गातोय. गाण्याने तुम्ही आतुन हलला नाहीत, भावनांचा कल्लोळ उठला नाही. छ्या, एकतर तुम्हाला गाणं कळलं नसावं किंवा तुम्ही त्या भावनांशी एकरुप होऊ शकला नाहीत. अहो, त्यासाठी हळवं मन असावं लागतं ? तुम्ही आयटी क्षेत्रात निवृत्त झाला नसाल म्हणून तुम्हाला ते फिलींग येत नसेल असे वाटते. असो, आता अशा टाईपच्या प्रतिक्रिया मला "स्टेरिओटाईप (साचेबद्ध ? )" वाटत आहेत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे हे ओघाने आलेच ;) -दिलीप बिरुटे (साचेबद्ध)
  • Log in or register to post comments

Submitted by काळा डॉन on Sun, 08/23/2009 - 23:01

In reply to काय सांगता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हॅहॅहॅ...और

हॅहॅहॅ...और ये लगा सिक्सर!! :D
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 08/23/2009 - 23:09

Permalink

अक्षरशा:

अक्षरशा: टॉवेल्स पिळून पिळून रडलोय ! आताशा घरातले रुमाल आणी टॉवेल्स संपलेत .. आता कर्टन्स पिळणे चालू आहे !! आयच्यान एवढा तर मी लहानपणी रडलेलो .. आईनं पाठ लाल केलेली तेंव्हा ! सलिम खरे , जियो दोस्ता ! आपला खुप खुप रडलेला कोकि
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 08/24/2009 - 02:27

Permalink

गाण्याचे शब्द सुरेख आहेत.

रोजच्या रगाड्यात मुलीपासून दूर रहावे लागलेल्या बाबाची ही कैफियत आहे. घरोघरी असलेली ही भावना अतिशय आर्त शब्दात संदीपने मांडली आहे. ते शब्द बर्‍याच आई-बाबांच्या आणी त्यांच्या मुलामुलींच्या हृदयाचा ठाव घेणारे असणार ह्यात शंका नाही. मी आत्ता हे गाणं प्रथमच ऐकलं आणी डोळे ओले झाले. सलीलनं एका वेगळ्या चालीचा प्रयोग केलाय. ही चाल मला तितकीशी भावली नाही. जरा शांत, संयत चाल आणी कमी आरडाओरडा आणखीन भावपूर्ण गाणे देऊ शकेल असे वाटते. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 08/24/2009 - 16:11

In reply to गाण्याचे शब्द सुरेख आहेत. by चतुरंग

Permalink

ही चाल मला

ही चाल मला तितकीशी भावली नाही. जरा शांत, संयत चाल आणी कमी आरडाओरडा आणखीन भावपूर्ण गाणे देऊ शकेल असे वाटते.
सहमत... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on Mon, 08/24/2009 - 09:51

Permalink

छान

संदीपने सुरेख शब्द गुंफले आहेत ह्या गाण्यात. खरेच छान आहे गाणे.. राहीला भाग चालीचा, तर गाण्याच्या सुरुवातीलाच सलीलने स्पष्ट केलेय की ही चाल अगदी 'कोरी' आहे आणि चाल अजून 'बसतेय'.. अर्थात, संगीताच्या जाणकारांमध्ये एक मुद्दा नक्कीच वादाचा विषय होऊ शकतो तो असा की, चाल कोरी असताना हे गाणे जाहीरपणे सादर करण्याची घाई करणे योग्य होते का? असो, माझ्यासारख्या सामान्य संगीतप्रेमीला हे गाणे फार भावले!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 08/24/2009 - 15:56

Permalink

ओके...

सू हा स...
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Mon, 08/24/2009 - 20:10

Permalink

छान!

खरेंची कविता खरंच सुंदर आहे. चाल वगैरे ठीकठाकच आहे. जुलैत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात संदीप-सलीलचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी हे गाणं ऐकलं होतं. तेव्हाही बर्याच लोकांचे डोळे पाणावले होते. अवांतरः त्या कार्यक्रमात सलील म्हणाला होता की अगदी नवीन चाल आहे. पहिल्यांदाच कुठल्या शो मधे गातोय. तेव्हा सांभाळुन घ्या...एक महिन्यानंतर 'आयुष्यावर बोलू काही' मधे पुन्हा तेच ऐकलं तेव्हा थोडी गंमत वाटली...असो, चालायचंच!
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 08/26/2009 - 00:47

In reply to छान! by टिउ

Permalink

अवांतरः

अवांतरः त्या कार्यक्रमात सलील म्हणाला होता की अगदी नवीन चाल आहे. पहिल्यांदाच कुठल्या शो मधे गातोय. तेव्हा सांभाळुन घ्या...एक महिन्यानंतर 'आयुष्यावर बोलू काही' मधे पुन्हा तेच ऐकलं तेव्हा थोडी गंमत वाटली...असो, चालायचंच! हे फार आवडले .. धन्यवाद... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 08/26/2009 - 00:53

In reply to अवांतरः by भडकमकर मास्तर

Permalink

आणि...

आत्ताच थोड्या वेळापूर्वी झालेल्या सारेगमपच्या आजच्या एपिसोडमधे सलिल एका स्पर्धकाला 'स्टेजवर कधी खोटे बोलू नये' असे म्हणाला !!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Wed, 08/26/2009 - 01:12

In reply to आणि... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

सलिल एका

सलिल एका स्पर्धकाला 'स्टेजवर कधी खोटे बोलू नये' असे म्हणाला !!! हे लैच आवडले. (Image removed.धारी)आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Wed, 08/26/2009 - 08:18

In reply to अवांतरः by भडकमकर मास्तर

Permalink

भावु

या कार्यक्रमाचे शुटींग जुन एंडला का जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेले आहे. संदर्भ-एका वृत्तपत्रात आलेली बातमी तुमचा कार्यक्रम त्यानंतर झाला आहे असे मला वाटते. आणि हा कार्यक्रमही पहिल्यांदा २६ जुलैला प्रसारीत झाला होता... धन्यवाद विनायक
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक पाचलग on Tue, 08/25/2009 - 08:19

Permalink

आभार

सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार. या गाण्याची चाल जाणकाराना आवडणार नाही अशी शंका होतीच, ती काही प्रमाणात खरी ठरली. पण ,एक मात्र राहुन राहुन वाटते की आजपर्यंत आपल्याला सर्व भावुक किंवा सीरीयस गाणी ही शांत आणि संयत चालीवर बांधलेली होती,असतात,(यात काही अपवाद असु शकतात.).मात्र ही प्रथा मोडण्यासाठी जर सलीलने या गाण्याला अशी चाल दिली असेल तर मग मात्र तो यशस्वी ठरला आहे, कारण त्याने त्याला जो मेसेज पोहोचवायचा आहे तो व्यवस्थीतपणे पोहोचवला आहे. राहिता राहिला प्रश्न, न बसलेली चाल एवढ्या मोठ्या कार्यक्रमात म्हणावी का? याचे कारण असे असु शकते की जरी झी वर बर्‍याच जणानी हा कर्यक्रम पहिल्यांदा पाहिला असला तरी प्रेक्षागृहातील बर्‍याच लोकानी तो पुर्वी पाहिलेला होता,त्यामुळे त्याना काही नवे देणे भाग होते ,(कदाचित तीच त्यांची खासीयत असावी,कारण मी जेव्हा कोल्हापुरच्या कार्यक्रमात देतो कोण हे गाणे ऐकले त्यानंतर जवळ जवळ दोन महिन्यानी त्या चित्रपटाचे शुटींग सुरु झाल्याची बातमी वाचली, म्हणजे चित्रपट यायच्या जवळ जवळ एक वर्षे आधीच त्याने ते गाणे लोकांसमोर आणले)आणि अजुनही त्याने बालगीतांचा नवीन अल्बम काढायचे ठरवलेले नाही, त्यामुळे ही चाल लोकांपर्यंत यायला बराच वेळ गेला असता म्हणून कदाचित त्याने ते गाणे म्हणले असावे. थोडक्यात काय, सलील- संदिप हे आजच्या पीढीचे प्रतिनिधी आहेत,ते आजच्या पीढीवर गाणी करतात आणि त्याना ती आवडतात,मॅटर खतम. पण महत्व म्हणजे ते जुन्याशी धरुन आहेत,त्यांना योग्य मान देतात,आणि नवीन पीढीचा म्हणून उगाचच नेटवर मिळणारे चार पीस एकत्र करुन गाणी करत नाहीत.म्हणूनच जीयो सलिल्-संदीप आपला नम्र, ( तात्यांच्या विष्लेषणाच्या प्रतिक्षेत असलेला) विनायक
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 08/25/2009 - 08:44

Permalink

टिअर जर्कर

इंग्रजीमधे "टिअर जर्कर" असा एक शब्दप्रयोग आहे. त्याचा मूळ अर्थ जरी "भावनाना हात घालणारे काही" असा असला तरी , कालपरत्वे त्याची छटा ही "प्रयत्नपूर्वक डोळ्यातून पाणी काढणारे" अशा अर्थाची आणि त्यामुळे काहीशी व्यंगात्म झालेली आहे. प्रस्तुत गाणे ऐकताना थोडे तसे वाटले. या गाण्यावर अश्रू टिपणार्‍यांनी "माहेरची साडी" , "लेक चालली सासरला" वगैरे चित्रपटांना रडणार्‍याना , "संत गजानन शेगावीचा" या चित्रपटाच्या वेळी भावव्याकूळ होणार्‍या गोरगरीब जनतेला हसू नये इतपत म्हणणे सयुक्तिक होईल. कारण माझ्यामते प्रस्तुत सादरीकरणामधे , वरील आवरण जरी शहरी, सोफिस्टिकेटेड असले तरी आतला पदार्थ हा उपरोल्लेखित रेसिपीचाच आहे. अर्थात मला जरी असे वाटले तरी इथे कुणाच्या भावनाना दुखावायचा हेतू नव्हता. चित्रपट, नाट्य, संगीत, काव्य या सार्‍यांपैकी कशाना कशाने मला कधी ना कधी स्पर्श केलेला आहे हे खुल्या मनाने मान्य करतो. मात्र, एखादी गोष्ट सरळसरळ असा हिशेब ठेवून सादर केल्यासारखी वाटली तर त्याचे मूल्य फार जाणवत नाही इतकेच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Tue, 08/25/2009 - 09:25

In reply to टिअर जर्कर by मुक्तसुनीत

Permalink

"या

"या गाण्यावर अश्रू टिपणार्‍यांनी "माहेरची साडी" , "लेक चालली सासरला" वगैरे चित्रपटांना रडणार्‍याना , "संत गजानन शेगावीचा" या चित्रपटाच्या वेळी भावव्याकूळ होणार्‍या गोरगरीब जनतेला हसू नये इतपत म्हणणे सयुक्तिक होईल. कारण माझ्यामते प्रस्तुत सादरीकरणामधे , वरील आवरण जरी शहरी, सोफिस्टिकेटेड असले तरी आतला पदार्थ हा उपरोल्लेखित रेसिपीचाच आहे." असहमत, या गाण्यात कुणीही कुणावर अन्याय करत नाही, मार-झोड नाही. चांगल्या वाइटाचे काळे पांढरे रंग नाही, इतकच काय, दैवाने केलेला पराकोटीचा अन्यायही नाही... जवळ राहुनही हळु-हळु सुकत जाणार्‍या एका आदिम नात्याची ही व्यथा आहे. मुळात ही एक कविता आहे. मुक्तक म्हणा हवतरं. आणि आज ३५-४० मधे असलेल्या अनेक बाबांना ही कथा स्वतःची वाटते. हे सगळ असच असेल असही नाही, पण अस होवु शकत ही धास्ती मनाला खंतावते. डोळ्यातुन येणारे पाणी या खंतेतुन येते. पुढच्या जगण्याची तरतुद करताना "आज" जगयचा राहुन जातोय ही वेदना तशी जुनीच आहे तिचेच आजचे रुप घेवुन ही कविता येते. बाकी चाल, संगीत मला फारस कळत नाही, पण शब्द कळतात आणि म्हणुनच हे गाण आणि कविता असं कॉम्बिनेशन आवडतं "गाडी सुटली रुमाल हलले" हेही असच एक छान मुक्तक...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 08/25/2009 - 09:50

In reply to "या by शैलेन्द्र

Permalink

प्रतिसाद

या गाण्यात कुणीही कुणावर अन्याय करत नाही, मार-झोड नाही. चांगल्या वाइटाचे काळे पांढरे रंग नाही, इतकच काय, दैवाने केलेला पराकोटीचा अन्यायही नाही... जवळ राहुनही हळु-हळु सुकत जाणार्‍या एका आदिम नात्याची ही व्यथा आहे. मुळात ही एक कविता आहे. मुक्तक म्हणा हवतरं. प्रस्तुत सादरीकरणात मारझोड वगैरे आहे असे मी लिहिल्याचे मला स्मरत नाही. ही कविता आहे , मुक्तक आहे हेदेखील आपल्याला अमान्य नाहीच. माझा मुद्दा मी वर मांडला आहे. आणि तो काहीशा हिशेबी वाटेल अशा भावनिक आवाहनाचा आहे इतकेच. बाकी तुमच्या आमच्या असहमतीबद्दल सहमत आहे. (वी अग्री टू डिसॅग्री.)
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Tue, 08/25/2009 - 10:01

In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत

Permalink

तुम्ही

तुम्ही दिलेल्या उदाहरणांमधे ते प्रकार आहेत. म्हणुन मला ही तुलना पटली नाही. बाकी सहमत- असहमत किंवा कुणाला कुठला अनुभव कसा भिडावा हे व्यक्तिसापेक्ष आहे. वी अग्री टू डिसॅग्री.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 08/26/2009 - 00:55

In reply to तुम्ही by शैलेन्द्र

Permalink

मुक्तसुनीतशी सहमत...

गाण्यतल्या हिशोबीपणाचा आदर ठेवत आणि गाणे आवडलेल्या सर्व रसिकांच्या भावनांचा आदर ठेवत असे म्हणावेसे वाटतेच की अगदी हिशोबी गाणे वाटले... .. म्हणजे स्वतःच लिहिलेल्या एका एकांगी हिशोबी गाण्याला ( म्हणजे लहान मूल बापाला म्हणते की तू मला सोडून जातोस वगैरे)अजून एका दुसर्‍या टोकाच्या एकांगी हिशोबी गाण्याचे उत्तर द्यायचे... ( बाप पोराला म्हणतो की मी रे किती कष्ट करतो) ... फार बनावट वाटले... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 08/26/2009 - 01:01

In reply to मुक्तसुनीतशी सहमत... by भडकमकर मास्तर

Permalink

माझ्यापुरते...

मी हे गाणे ऐकले प्रथम तेव्हा मला हे बाकीचे संदर्भ काहीच माहिती नव्हते. आणि त्यात जे वर्णन आहे ते कुठेतरी संबंधित असल्यासारखे वाटले म्हणून एक वेगळाच प्रत्यय देऊन गेले. कदाचित हे संदर्भ माहित असते तरीही आवडले असते ते वैयक्तिक संदर्भामुळे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Wed, 08/26/2009 - 03:43

In reply to टिअर जर्कर by मुक्तसुनीत

Permalink

+१

मुक्तसुनित ह्यांच्याशी पूर्ण सहमत आहे. अतिशय हिशेबी प्रकार आहे हा. विशेषतः संदीपने शेवटच्या काही ओळीत आवाजात मुद्दाम आणलेला हुंदका वगैरे प्रकार तेच दर्शवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Wed, 08/26/2009 - 09:36

In reply to टिअर जर्कर by मुक्तसुनीत

Permalink

टिअर जर्कर

टिअर जर्कर आणि हिशोबी पणाबद्दल संपूर्ण सहमत! कॉपिरायटींग मधला हिशोबी पणा खर्‍यांच्या इतर कवितातही येतो असं आपलं माझं मत. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 08/25/2009 - 10:03

Permalink

या कवितेच्या निमित्ताने

या कवितेच्या निमित्ताने एका जुन्या इंग्रजी कवितेची आठवण झाली. कवी मराठी आहेत : दिलीप पुरुषोत्तम चित्रे. पण कविता इंग्रजी आहे. ही कविता मला आवडते. (म्हणजे ती वाचताना मी रुमाल काढतो असे नाही. पण आवडते बुवा. ) प्रस्तुत विषयाशी ही कविता थोडीशी मिळतीजुळती आहे असे एखाद्याला वाटेल. Father Returning Home My father travels on the late evening train Standing among silent commuters in the yellow light Suburbs slide past his unseeing eyes His shirt and pants are soggy and his black raincoat Stained with mud and his bag stuffed with books Is falling apart. His eyes dimmed by age fade homeward through the humid monsoon night. Now I can see him getting off the train Like a word dropped from a long sentence. He hurries across the length of the grey platform, Crosses the railway line, enters the lane, His chappals are sticky with mud, but he hurries onward. Home again, I see him drinking weak tea, Eating a stale chapati, reading a book. He goes into the toilet to contemplate Man's estrangement from a man-made world. Coming out he trembles at the sink, The cold water running over his brown hands, A few droplets cling to the greying hairs on his wrists. His sullen children have often refused to share Jokes and secrets with him. He will now go to sleep Listening to the static on the radio, dreaming Of his ancestors and grandchildren, thinking Of nomads entering a subcontinent through a narrow pass.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 08/25/2009 - 19:06

In reply to या कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत

Permalink

कविता

कविता आवडली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 08/25/2009 - 22:44

In reply to या कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत

Permalink

या कवितेच्या निमित्ताने

या कवितेच्या निमित्ताने या कवितेवर झालेली एक सुरेख चर्चा. इथे अर्नब नावाच्या एकाचा प्रतिसाद मी भाषांतर करून टंकतो आहे. एखाद्या उत्तम कवितेकडे , त्या कवितेच्या आशयघनतेला न्याय देणारा रसास्वाद याचे हे एक उत्तम उदाहरण आहे : "या कवितेमधे शेवटी आलेल्या खिंडीचा उल्लेख खैबरखिंडीचाच आहे असे मला वाटत नाही. ही कुठलीही खिंड असू शकते. त्यामुळे कवितेच्या एकूण सुरामधे काही फरक पडत नाही. कवितेमधे अनेक घटकांची अदलाबदल किंवा सरमिसळ केलेली आहे : नेहमीच्या लोकलट्रेनमधले कंटाळवाणे येणे-जाणे आणि स्थलांतरितांच्या प्रवासातली अर्थपूर्णता, बाह्यपरिस्थिती आणि मनःस्थिती , माणसाचे सभोवतालपासूनचे सांधलेपण-तुटलेपण या सगळ्याची अदलाबदल म्हणजे कवितेचा गाभा होय असे मला जाणवले. कवितेची ही बहुपेडीशैली सुद्धा त्याचे प्रतिबिंब दाखवते. कवितेतल्या खिंडीचा अरुंदपणा आणि त्यातून जाणार्‍या भटक्यांच्या उपयोजनाकडे एकंदर प्रतीकात्म अर्थाने पहाणे योग्य. त्यातून काही विशिष्ट ऐतिहासिक/भौगोलिक अर्थाचे काही मला दिसले नाही. "
  • Log in or register to post comments

Submitted by पूजादीप on Tue, 08/25/2009 - 11:10

Permalink

अतिशय

अतिशय भावुक गाणे. बापाच्या मनाचा कोंडमारा छान उलगडुन दाखवला आहे. पूजा
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Wed, 08/26/2009 - 00:11

Permalink

छान

विनायका, छान लिहिलयस. सकाळ मधला लेख ही छान. कार्यक्रम पाहिला तेव्हाच आवडले होते गाणे. बाकी चालीबद्दल या गाण्याच्या सुरुवातीला संदीपने 'दूरदेशी गेला बाबा' या गाण्याची दुसरी बाजू म्हणून ही कविता लिहिली असे सांगितले होते. त्या गाण्याची चाल भावूक असल्याने कदाचित सलील ने ही चाल अशी बनवली असावी. बाकी संदीप सलील बद्दल लिहावे तितके थोडेच. तू मात्र असाच लिहीत रहा. - ओंकार. अवांतर : सवड असेल तेव्हा मी लिहिलेला हा लेख वाच.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com