नमस्कार.
सर्व मिपाकराना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि आपल्या लाडक्या मिपाला २ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
असो,तर मुळ सांगायचा मुद्दा असा की आत्ता झी टॉकीजवर आयुष्यावर बोलु काही चे पुनःप्रक्षेपण चालु आहे.
आणि मगाशीच मी त्यात एक गाणे ऐकले.
हे गाणे खरेतर मी काही दिवसापुर्वीच यु नळीवरुन उतरवुन घेतले आहे, व सध्या त्याचे पारायण चालु आहे,अगदी या गाण्याव लिहायचे,त्याचे रसावलोकन का रसग्रहण जे काही म्हणतात ते करायचेच असे ठरवुन मनात लेखही तयार केला होता. पण्,नंतर लक्षात आले की काही गाण्यांचे अवलोकन करण्यात वेळ घालवायचा नसतो, ती फक्त अनुभवायचीच असतात.तसाच हा अनुभव.मी आजपर्यंत ज्यांना ज्यांना हे गाणे पाहताना वा ऐकताना पाहिले आहे त्या सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचेही पाहिले आहे आणि याला एकही अपवाद नाही.....
म्हणुनच काहीही न लिहिता ते गाणे तुमच्यापुढे ठेवत आहे.
खरेच सांगतो,मी हे गाणे जवळ जवळ १०० वेळा ऐकले असेल पण एकदाही माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलेले नाही. मिपावर आज अनेक परदेशस्थ नागरीक्,संगणक क्षेत्रातील राबणारे लोक आहेत,त्या सर्वांची व्यथा हे गाणे मांडते हे नि:संशय . त्या सगळ्याना जे म्हणता आले नसेल ते हे गाणे सांगते. म्हणुनच मिपावरच्या बर्याचशा लोकानी हे गाणे ऐकले असण्याची शक्यता असतानाही हे गाणे मी इथे टाकत आहे. खरेतर गणेश चतुर्थीच्या प्रसन्न वातावरणात हे गाणे इथे द्यावे का नाही याविषयी अजुनही संभ्रम आहे.पण ,निदान या शुभदिनी हे सर्व लोक आपल्यावर अशी वेळ येवु देणार नाहीत अशी प्रतिज्ञा करतील असे वाटत असल्याने किंवा तशी इच्छा असल्याने हे गाणे इथे देत आहे. बाकी हा गजानन सर्वाना सद्बुद्धी देवो हीच त्याच्याकडे प्रार्थना.
आणि हो, या गाण्यावर लिहिण्यासाठी शिवशिवणारा हात थांबवण्यात जरी मला यश आले असले,तरी या कार्यक्रमावर लिहिणे मात्र मी टाळु शकलो नाही,त्यामुळे या कार्यक्रमावर लिहिलेला लेख
सलाम आबोका
http://beta.esakal.com/2009/08/19141213/Muktapeeth-on-experience-of-sa…
इथे वाचु शकता.(जरुर वाचा,चांगला झाला आहे असे वाटत आहे.)
याच संदर्भातील लेख पुर्वी मिपावर लिहिला असल्याने हा लेख मिपावर प्रकाशित केला नव्हता. मात्र,तुम्ही लेखाला अनुसरुन प्रतिसाद इथे दिल्यास आनंद वाटेल.
बाकी सर्वाना पुन्हा एकदा शुभेच्छा.
आपला,
(गणेशभक्त आणि मिपाप्रेमी) विनायक
वाचने
14972
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
रडवलं बाबा..
!!!
असच...
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
मग काय रे...
In reply to असच... by गणपा
धन्यवाद!
ठीक आहे.
काय सांगता ?
In reply to ठीक आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म
सकाळमधे चांगले लिहिले आहे.
In reply to हम्म by विनायक पाचलग
हे गाणं
अतिशय
ठीक! तूर्ता
तात्या
In reply to ठीक! तूर्ता by विसोबा खेचर
तात्या
In reply to तात्या by निमीत्त मात्र
तरीसुद्धा लिहाच ...
In reply to तात्या by विसोबा खेचर
सहमत...
In reply to तरीसुद्धा लिहाच ... by छोटा डॉन
मला
In reply to ठीक! तूर्ता by विसोबा खेचर
दम नाही.
चाल आणि
In reply to दम नाही. by प्रमोद देव
तसं असेलही...
In reply to चाल आणि by शैलेन्द्र
काय सांगता ?
In reply to दम नाही. by प्रमोद देव
हॅहॅहॅ...और
In reply to काय सांगता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अक्षरशा:
गाण्याचे शब्द सुरेख आहेत.
ही चाल मला
In reply to गाण्याचे शब्द सुरेख आहेत. by चतुरंग
छान
ओके...
छान!
अवांतरः
In reply to छान! by टिउ
आणि...
In reply to अवांतरः by भडकमकर मास्तर
सलिल एका
In reply to आणि... by बिपिन कार्यकर्ते
भावु
In reply to अवांतरः by भडकमकर मास्तर
आभार
टिअर जर्कर
"या
In reply to टिअर जर्कर by मुक्तसुनीत
प्रतिसाद
In reply to "या by शैलेन्द्र
तुम्ही
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
मुक्तसुनीतशी सहमत...
In reply to तुम्ही by शैलेन्द्र
माझ्यापुरते...
In reply to मुक्तसुनीतशी सहमत... by भडकमकर मास्तर
+१
In reply to टिअर जर्कर by मुक्तसुनीत
टिअर जर्कर
In reply to टिअर जर्कर by मुक्तसुनीत
या कवितेच्या निमित्ताने
कविता
In reply to या कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
या कवितेच्या निमित्ताने
In reply to या कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
अतिशय
छान