घोषणा केलीच होती, आता तुम्ही हा धागा काढल्याने मला एक दिवस सर्व कामांपासून मुक्ती मिळवण्याचे नैतिक बळ प्राप्त झाले आहे! तुम्हालाही शुभेच्छा!! B)
सध्या इथे उन्हाळा जोरात असल्याने मी झूल वापरणार नाहीये, फार उकडेल हो! #:S
संध्याकाळी इथल्या तरणतलावात जाऊन डुंबत पडण्याचा विचार आहे. 8>
कारभारणीशी होणार्या शाब्दिक मारामारीत (आम्ही बोलू शकतच नाही पण) चुकून कधी आम्ही रागाने मानेला हिसडा दिला तर शिंगे लागू नयेत म्हणून सध्या शिंगे कलम केली आहेत. >:)
पुरणपोळी जेवून मस्त ताणून देऊ ह्यात काही शंका नाही!
बाकी वरच्या चित्रात तुम्ही अंमळ उग्र दिसता आहात! :P
(नंदी)चतुरंग
वरील फोटोसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! ;)
मदन जोशी..... ;)
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
पोळ्याला शहरी भागात पोळा न म्हणता बैलपोळा का म्हणतात तेच कळत नाही. मला बैलपोळा म्हणने म्हणजे वॉटरबॅगला 'पाण्याची वॉटरबॅग' म्हंटल्यासारखे वाट्ते. पोळा हा बैलांचाच असतो तेव्हा बैलपोळा म्हणायची काय गरज?
बाकी सगळ्या बैलांना पोळ्याच्या शुभेच्छा!
-अनामिक
लिखाळराव, तुम्हाला एक म्हण माहित आहे का हो ?
" आ बैल मुझे मार ...."
असो, तुम्हाला "बैल"पोळ्याच्या शुभेच्छा ....
फोटो चांगला आला आहे हे वे.सा. न. ल.
------
(मोकाट सांड) छोटा डॉन
लिखाळराव, आपल्याकडे पोळा असतो तसाच पश्चिमी देशांमधे 'विमन्स डे' असतो का हो? असो, तुम्हाला आणि तुमच्या सर्व कम्युनिटीला तुमच्या दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
(गायीसारखी गरीब) अदिती
सर्वांना "बैल"पोळ्याच्या शुभेच्छा ....
लिखाळराव, आपल्याकडे पोळा असतो तसाच पश्चिमी देशांमधे 'विमन्स डे' असतो का हो?
मी रहात असलेल्या देशात "विमन्स डे" रोजच असतो. खुपच विमन्स आहेत येथे. कधी कधी मी एकटाच पुरूष बस/ट्राम मध्ये असतो. बाकी सर्व बायका (ड्रायवरसकट)....
खादाडबैल
(हम्मा ....)
(गायीसारखी गरीब) अदिती
अरे बापरे !
गुजराथी भाषेत एक म्हण आहे
दिकरी अने गाय्..माथु मारीने खाय
( मुलगी (कन्या) आणि गाय ह्या तुमचे डोके ऊठवतातच /डोके खातात)
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
लिखाळ शेठ,चित्रातील बैला कडे पाहिल्यावर जर कुणी 'जवळीक' साधण्याचा प्रयत्न केला तर त्याची गत आ बैल मुझे मार अशीच होईल हे भाकित सांगायला ज्योतिषाची गरज नाही. ;)
आमच्या शेतात अनेक गायी होत्या. एक गाय अशी होती कि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर अचानक अंगावर धावुन आलि. मग आमचा शंकर गडी म्हन्ला,"पर्कास, माजाव आल्याव गरीब गाय बी यड्यावानी कर्तीया. जास्ती जौळीक नको"
शंकरनी जीवनाविषयक तत्त्वज्ञानच सांगितले होते. असो बैलपोळ्याच्या यानिमित्तानी अनेक स्मृती ठळक पुसट झाल्या.
(नॉस्टल्जिक)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
सर्व बैलांना पोळ्याच्या शुभेच्छा!
(वासरू ;) ) ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून ३० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "आरं ढवळ्या रं माझ्या पवळ्या रं ...."
सर्वांनी शुभेच्छांची देवाणघेवाण केल्याचे पाहून अगदी जोरात हंबरावेसे वाटले.
आजच्या दिवशी झूल पांघरणे, शिंगाला बेगड लावणे, अंगावर निरनिराळ्या रंगांनी छाप उठवून घेणे आणि मग संध्याकाळी गावभर चक्कर टाकून येणे असा कार्यक्रम साधारण भाग्यवान बैलांच्या नशिबी येताना दिसतो. भारतीय संस्कृतीमध्ये मध्ये प्रत्येक कौटुंबीक घटकाचा जो विचार होतो आणि त्याच्यासाठी जो राखीव दिवस ठेवला जातो त्याचे मी मनापासून कौतुक करतो. (पाश्चात्यांकडे असे पाहायला मिळते की नाही कोण जाणे.)
आज का कोण जाणे पण पुरणपोळी जेवल्यावर दुपारी पडी टाकता येईल..भांडी घासायला लागणार नाहीत याचे स्मरण होऊन डोळ्याच्या कडा ओलावल्या. सुख सुख म्हणतात ते हेच ! (हे वाक्य म्हणजे साहित्यिक हंबरणे आहे ;) )
वरील छायाचित्र मागच्या पोळ्याच्या वेळी घेतले आहे. त्याबद्दल पुन्हाकधीतरी.... असे लिहिणार होतो. पण आज फुरसत आहे तर आताच लिहितो.
मागच्या वर्षीच्या पोळ्याला मला आंघोळीसाठी तळ्यावर नेताना माझ्या एकदम लक्षात आले की आज पोळा आहे. आज आपल्या मानेवर जू नाही. आज आपण स्वतंत्र आहोत. त्या आनंदात मी जोरात स्वातंत्र्याचा हुंकार (गर्जनाच म्हणा ना !) दिला. तो नेमका क्षण छायचित्रकार मित्राने टिपला. तो अविवाहित असल्याने तो पोळ्याच्या दिवशी असलेच उद्योग करत मजा घेत फिरतो. त्याच्या बद्दल खरेतर एक वेगळा लेखच होईल..पण ते पुन्हा कधीतरी....
-- लिखाळ.
महाराष्ट्रातील सर्व बैलांना पोळ्याच्या शुभेच्छा.
भरपुर पाउस पडून दुष्काळ दुर होवो व सर्व बैल शेतात पुन्हा एकदा काम करत राहोत हिच अपेक्षा.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
प्रतिक्रिया
आज सकाळीच 'कालनिर्णय' बघून माझा दिवस आहे ह्याची
बैल पोळा.
वरील
लिखाळा वेळ
पोळ आं?
अरे आज
खि खि खि खि
पोळ्याला
लिखाळराव,
मस्त धागा!
:)
लिखाळराव
ह्याला म्हणतात ...
माझ्यातर्
लिखाळराव,
सर्वांना
:)
(गायीसारखी
शुभेच्छा
आ बैल
माझ्यापण
शुभेच्छा
सर्वांनी
बाबा बर्वे !
हाहाहाहा
चोक्कस
महाराष्ट्