एका याहूग्रुपवर एका ज्योतिषनिंद्काने प्रश्न विचारला की ज्योतिषांनी स्वाईन फ्लुचे भविष्य का वर्तवले नाही. हा प्रश्न मला उद्देशून असावा कारण मी त्या ग्रुपवरील ज्योतिषाचा खंदा समर्थक आहे. वास्तविक ऑक्टोबर २००८ मध्ये लिहिलेल्या एका टिपणात मी जे ग्रहयोगांचे वर्णन केले आहे, ते जिज्ञासूनी येथे http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html अवश्य वाचावे.
आधुनिक ज्योतिष (विशेषत: एबर्टीनचे तंत्र) एखाद्या घटनेतील core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास कसे उपयोगी पडते हे यावरून समजून घेता येईल. 'अस्थैर्य' हे हर्षल आणि शनीच्या योगात दिसून येते. 'अनपेक्षित' हा एकच शब्द हर्षलचे वर्णन करण्यास पाश्चात्य ज्योतिषी पुरेसा मानतात. शनी-हर्षलच्या प्रतियोगात आपण वेगवेगळ्या प्रकारचे 'अनपेक्षित अस्थैर्य' अनुभवत आहोत. प्रथम आर्थिक मंदी, मग २६ नोव्हेंबरचे अरिष्ट आणि आता स्वाईन फ्लु मला वाटतं ज्योतिषाची उपयुक्ततता पटण्यास हा अनुभव पुरेसा आहे.
'स्वाईन फ्लूची साथ" येईल असे शब्द माझ्या भाकीतात नाहीत असा आक्षेप काही नतद्र्ष्ट ज्योतिषाचे निंदक घेतील. त्याचे स्पष्टीकरण असे -
- माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासाच्या वैयक्तिक मर्यादा
मी साथीच्या रोगांचा आणि ज्योतिषाचा संबंध अभ्यासलेला नाही. ज्योतिषाचा सर्वसमावेशक अभ्यास एका व्यक्तीस तिच्या एका आयुष्यात शक्य नाही.
- मी जे तंत्र (एबर्टीन) वापरतो त्याची मर्यादा
वर अगोदरच म्हटल्या प्रमाणे एबर्टीनचे तंत्र एखाद्या घटनेतील फक्त core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास उपयोगी पडते. ग्रहयोगांच्या सक्रियतेच्या कालावधीत ज्या मोठ्या घटना घडल्या त्यांचा स्थायीभाव तो माझ्या भाकितात अचूकपणे आला आहे. एबर्टीन तंत्राच्या मूळ दाव्याशी हे सुसंगत आहे असे मला वाटते.
जाता जाता स्वाईन फ्लूच्या साथी मध्ये कुणी विशेष काळजी घ्यायची त्यासंबंधी सूचना -
ज्यांच्या पत्रिकेत शनी आणि नेपच्युन angular आहेत म्हणजे लग्न आणि दशमभाव आरंभ बिंदूशी युती करत आहेत किंवा जन्मरवीशी युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ योग करत आहेत त्यांची प्रतिकारशक्ती जन्मत: कमी असते.
याशिवाय ज्यांच्या पत्रिकेत गोचर शनी किंवा गोचर नेपच्यून जर जन्मरवीशीवरील (म्हणजे युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ) प्रमाणे योग करत असेल तर अशी मंडळी साथीच्या रोगांनी पट्कन आजारी पडतात.
स्वाईन फ्लूच्या साथीमूळे स्वर्गात गणपतीने मात्र नक्कीच सूटकेचा नि:श्वास टाकला असेल, हे मात्र खरे...
वाचने
7472
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक
मलाही रोचक वाटला लेख!
In reply to रोचक by ऋषिकेश
एबर्टीन
In reply to मलाही रोचक वाटला लेख! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅहॅहॅहॅ
In reply to एबर्टीन by अनामिक
भाकीत हे काळ्या दगडावरची रेघ नव्हे
In reply to मलाही रोचक वाटला लेख! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ
In reply to भाकीत हे काळ्या दगडावरची रेघ नव्हे by युयुत्सु
योगायोग
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
Collective knowledge
In reply to रोचक by ऋषिकेश
विचारलेल्या उत्तरे
In reply to Collective knowledge by युयुत्सु
+१
In reply to विचारलेल्या उत्तरे by ऋषिकेश
शनि - नेपच्यून
काही
उर्टचा ढग
In reply to काही by विजुभाऊ
+१
In reply to उर्टचा ढग by युयुत्सु
तेव्हा
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे शक्य
In reply to तेव्हा by लिखाळ
वा..
In reply to हे शक्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅह्लॅहॅ
In reply to वा.. by लिखाळ
पत्रिकांच
In reply to हे शक्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
अॅक्सेस नसलेल्यांसाठी ...
In reply to पत्रिकांच by ऋषिकेश
मंडळ आभारी आहे
In reply to अॅक्सेस नसलेल्यांसाठी ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण मी
In reply to मंडळ आभारी आहे by ऋषिकेश
तेव्हा
काही अंशी चूक
In reply to तेव्हा by विजुभाऊ
अगदी वर्तमानपत्र वाचू लागण्याच्या वयापासून
+१
In reply to अगदी वर्तमानपत्र वाचू लागण्याच्या वयापासून by चतुरंग
उत्तर
In reply to अगदी वर्तमानपत्र वाचू लागण्याच्या वयापासून by चतुरंग
अजून एक
जगबुडीची भाकिते
In reply to अजून एक by विजुभाऊ
सहमत आहे
In reply to जगबुडीची भाकिते by युयुत्सु
पुरातन
In reply to जगबुडीची भाकिते by युयुत्सु
माहितीपुर
चालू द्या
आपला युक्तिवाद
In reply to चालू द्या by सहज
>>>>काय राव
In reply to चालू द्या by सहज
एकादी घटना घडुन गेल्यावर हे असे ज्योतीषशास्त्रात वर्तवले होते.
आपण
In reply to एकादी घटना घडुन गेल्यावर हे असे ज्योतीषशास्त्रात वर्तवले होते. by वेताळ
युयुस्तूस
एखादी
प्रथम
अनपेक्षित
युयुत्सुस