Skip to main content

स्वप्नांचे पहारेकरी

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 11/08/2009 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या स्वप्नात जागुन तुझ्या स्व्प्नांना पहारा देतो, तुझ्या स्वप्नात तु माझ्यापासुन दुर जाशील म्हणुन मी घाबरतो चांदण्याना तुझ्या स्वप्नात येण्याची परवानगी देतो, पण चंद्राला मात्र दारावरुनच हाकलतो, मला माहितेय चंद्र तुला आवडतो, पण काय करणार चंद्र पण तुझ्यावरच मरतो मी ही कधी कधी हळुच तुझ्या स्वप्नात डोकवतो, तुला डोळे भरुन पाहुन घेतो, तुझ्या माथ्यावर डोके टेकवणार असतोच, तेवढ्यात कुठलातरी अज्ञात पहारेकरी मलाच हाकलतो मला कळाले मी इकटाच नाही अजुन बरेच जण तुझ्या स्वप्नांना पहारा देतात, आणि तुझ्या स्वप्नांच्या प्रवेशदारावर एकमेकांशी भांडत बसतात तु पण थोडीफार चुकतेस, डोळ्यांनी अशी काय जादु करतेस, एका नजरेत एक नवीन जवान घायाळ करतेस, आणि एक नविन 'स्वप्नांचा पहारेकरी' नेमतेस
लेखनविषय:

वाचने 1251
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मस्तच !! :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

हा हा ...मस्त..स्वप्नांचा पहारेकरी.