विझलेल्या निखार्यात्...अर्धविजली आग
गाभुळलेल्या वटवाघळाला....अवचित येते जाग
राखेतून निसटता.... फिनिक्स शिथील होतो
लोंबकळतानाच गतप्राण पादत्राण होतो.
शिंकून शिंकून बेजार होताना...अर्धी सर्दी होतो
गर्जीत वर्जीत तडीपार खोकत जातो
रक्त घाम लघ्वी थुंकी तपाशीत बसतो.
हिमोग्लोबीन च्या अभावाचा भाव पहातो.
हिरव्या राईतले गर्द रावे..
अजुनी करतात लबाड कावे
टॅहॅ टॅहॅ किर्र्रॅव बोलत गोड..
..हातात पेरूची गलीतगात्र फोड
निष्प्राण पंख पसरून चादर अंथरतो...
स्वतःच्याच स्वप्नात फोड गोंजारतो
ही जूनी खोड...लावते गोड ओढ
येईल कधी ग्रीश्म दारी....वाळेल शेवाळ परसदारी
पडेल उजेड्...अंधार द्वारी
उगवेल गारवेल्....फार नाहीवेळ
पहाट झाली....
नळा धार आली
फुर्र फुस्स....खुर्र्...फिस्स..
क्छॉ..त्र्हॉ..खबॉक खबॉक खबॉक
......( विद्वंश = विद्वानांचा वंश)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2687
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
( विद्वंश =
(विषय दिलेला नाही)
+१
+२
In reply to +१ by मिसळभोक्ता
हॅ हॅ हॅ
विजूभाऊ,
भयानक
मस्त, सहज सुंदर लेखन