Skip to main content

मराठी पंचलाईन - मदत करा.

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 08/08/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्ही काही लोक मराठी लिहीलेली टीशर्ट्स विकत घ्यायचं असं ठरवतोय. मात्र ती तशी तयार विकत मिळत नाही असं माहिती पडल्यावर मग ती छापून घ्यावी असं ठरतंय. या संदर्भात मिपाकरांची मदत हवी आहे. खाली दिलेलेले प्रश्न आम्हाला पडलेले आहेत. कृपया मदत करा. १) मराठी केंद्रस्थानी ठेऊन काही पंचलाईन हवी आहे. सध्या तरी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हा एकमेव पर्याय समोर आहे. कुणाला आणि काही सुचवता येईल का? २) टीशर्टचा प्रकार पोलो आहे. म्हणजे कॉलर आणि शक्यतो डाव्या बाजुला खिसा असावा. (की नसावा? ) ३) रंगसंगती सुचवता येईल का? ४) कुणी असा प्रकार आधी केला आहे का? काही अनुभव? ५) अशी टीशर्ट छापून देणारं पुणे परिसरात कुणी ओळखीचं आहे का? याबाबत तुमच्या सर्व सुचनांची आम्हाला गरज आहे. - नीलकांत ईमेल : neelkant[dot]akl [at] gmail [dot] com नीलकांत.एकेएल @ जीमेल . कॉम ( :) ) माझा भटक्या : अठ्ठ्यान्नव तेवीस पन्चावन्न पंचवीस तेवीस ( हा प्रकार स्पॅम टाळण्यासाठी आहे. )

वाचने 18123
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती? भले देऊ कासेची लंगोटी;नाठाळाचे माथी हाणू काठी केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

१)मराठी तितुका मेळवावा ! २)मराठी असे आमुची मायबोली ! ३)रुजवू मराठी । फुलवू मराठी । हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

In reply to by प्रमोद देव

हे तीन्ही छान वाटत आहे... खास करुन... रुजवू मराठी । फुलवू मराठी । *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !

In reply to by दशानन

तिन्ही पंचलाईन्स छानच वाटताहेत. कॉलर आणि खिसा हवाच ! ठाण्यात राम मारुती रोडवर श्री. उन्मेश जोशी यांचे एक दुकान आहे. राज एंटरप्राइजेस किंवा असेच काहीतरी. ते अशाप्रकारचे टी शर्टस बनवतात / बनवुन घेतात. ठाणेकर जास्त प्रकाश पाडु शकतील असे वाटते. शिवरायांची मुद्रा असलेले टी शर्टही मार्केटमध्ये आहेत, ते देखील छान वाटतात. अवांतरः ऑर्डर कुठे नोंदवायची ते आत्ताच सांगुन ठेवा? :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

माझा मराठाची बोलु कौतुकें..... मराठा तितुका मेळवावा... हा मायबोलीवरचा दुवा.. पुणे-मुंबईच्या आयोजकांचे दूरध्वनी क्रमांकही आहेत इथे http://www.maayboli.com/node/2489 मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निलकांता ... माझ्यासाठी एक टि-शर्ट बुक करता येईल कारे ? नाही ही पंचलाईन नाही .. विणंती आहे ..

टी शर्ट ठाण्यात तयार मिळतात. हवे तसे तयार करून मिळतात.

पुण्यात चॅम्पियन स्पोर्टस मध्ये छापुन मिळतील

In reply to by शिप्रा

बरोबर. आम्ही महाविद्यालयात तेथूनच तयार करुन घेतला होता. त्यावरचा रबर-छाप अनेक धुण्यानंतरही चांगला टिकला आहे. टिशर्ट आणि छपाई (इंग्रजी) दोन्ही तेथेच. ठसकेदार वाक्याचा विचार करतो :) -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

In reply to by शिप्रा

एक स्टिकर होता ज्याच्यावर लिहिले होते 'शिव्याहि द्या पण मराठित' .. :)

In reply to by शिप्रा

सुंदर मराठी, समृद्ध मराठी मुंबई विमानतळावर लावा मराठी फलक ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

मायबोलीचे असे टी शर्ट आहेत. त्यांनी पुण्यात करुन घेतले. अ‍ॅडमिन ना विचारल्यास इतर माहीती मिळेल.

शर्टावर लिहा: "..... तेव्हाच मी डिसाईड केलं यु नो... आता मी मराठी पंचलाईन असलेलाच टीशर्ट घालणार" ;) (मराठी यु नो) ऋषिकेश ------------------ इंग्रजी गाण्याच्या शोधात

तीर्थ विठ्ठ्ल..क्शेत्र विठ्ठ्ल...

'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' 'मराठी पाउल पडते पुढे।' 'माझा मराठाचि बोलू कौतुके।' "I always win, except when I loose. But then I just don't count" :D

In reply to by दादा कोंडके

'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' अगदी दादांसारखच वाटत. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

In reply to by दादा कोंडके

'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' आपणास माहित असेलच ही आपल्या लाडक्या राज्याची 'राजमुद्रा'. ती राजमुद्रा आत्ता वापरात नसेल, पण त्याचा "लोगो, अंगठी, लॉकेट,साईन बोर्ड" अश्या ठिकाणी वापर करणे किती योग्य?

In reply to by हर्षद आनंदी

ही मुद्रा अभिमानाने छातीवर मिरवायला काय हरकत आहे. एका मराठी माणसाने मराठियाच्या हितासाठी केलेल्या महत्प्रयासांची, महापराक्रमाची साक्ष म्हणुन, आठवण म्हणुन ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

लाभले अम्हांस भाग्य्..बोलतो मराठी.. मराठी पाऊल पडते पुढे.. माझी माय मराठी!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

लाभले अम्हांस भाग्य्..बोलतो मराठी.. आणि हो, जर आपला राष्ट्रध्वज छापून घेणार असलात तर कृपया केवळ ३ रंग उतरवून घ्या. पूर्ण ध्वज नको. कारण ध्वज हा अंगाभोवती गुंडाळणे तसे योग्य नव्हे. अवमान होण्याची भिती असते. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

"वाचाता काय? चपला घाला आणी चालु पडा !!!" ही पंचलाईन म्हणुन घेने... (परस)नली नको !! --टुकुल

चामुंड्राये करवियले लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ~कविवर्य सुरेश भट अमृतवाहीनी मराठी । ज्ञानईश्वरी मराठी मी मराठीच बोलेन काय? तुम्हाला मराठी बोलता येत नाही?

जैशी हरळामाजी रत्नकिळा | कीं रत्नामाजी हिरा निळा | तैशी भाषामाजी चोखळा | भाषा मराठी ||१|| जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी | कीं परिमळांमाजी कस्तुरी | तैशी भाषांमाजी साजिरी | मराठिया ||२|| पक्ष्यांमध्ये मयुरू | वृक्षांमध्ये कल्पतरू | भाषांमध्ये मानूं थोरू | मराठियेशी ||३|| तारांमध्ये बारा राशी | सप्त वारांमध्ये रविशशी | ह्या द्वीपीच्या भाषांमध्ये तैशी | बोली मराठी! ||४|| यापैकी गडद केलेली माझी आवडती ओळ आहे. तशी शक्यता बरीच कमी आहे, पण स्वतःला काही सुचलंच तर तेही नंतर व्य.नि ने कळवेन. बाकी अनेक वेबसाईट्स आहेत, जिथे तुम्हाला टी शर्ट हवे तसे बनवून पाहता येतात. एक उदाहरण म्हणून हिचा उपयोग करून पाहा. अधिक माहिती गूगल केल्यावर मिळावी. शुभेच्छा. - पार्टनर

मी तर्र ह्या ओळी वापरीन!!: ''हर् हर् महादेव'' ''मराठी पाऊल पडते पुढे'' - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

मराठी पंच लाइन ची टी शर्ट मिळतात मार्केट मधे पण छापून घ्याची असतील तर मग मला उलहास्नगर मधली माहित आहई...मज्या मंदलाची टी शर्ट दही हंडी ची उलहास्नगर मध्ये विकत घेवौं छापून घेतो ...अणि जर तुम्हाला ५०० च्या वर टीशर्ट हवे असतील तर सांगलीत ला एक पता माहित आहे... माजी कड़े छान पंच लाइन च मराठी टीशर्ट आहे ..नंतर ईमेल करथो... मराठी टी शर्ट घालून मिरवानारा मनसे चा पदाधिकारी (अक्षय)

नीलकांता, अद्याप काही खास सुचलेलं नाही.. सुचलं की सांगतो रे! -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

In reply to by विसोबा खेचर

नीलकांता, अद्याप काही खास सुचलेलं नाही.. सुचलं की सांगतो रे! -दिलीप बिरुटे (संपामुळे डोक्याचा भुगा झालेला प्राध्यापक)

In reply to by विसोबा खेचर

"नीलकांता, अद्याप काही खास सुचलेलं नाही.. सुचलं की लिहीतो रे!" ही जबरदस्त पंचलाइन आहे....

मराठी पंचलाईन म्हटल्यामुळे मला खालील ओळी सुचल्या. रॉक स्टाईल संदेश हवा असेल तर.... बोल बेबी बोल,मराठी बोल बोल बाबा बोल मराठी बोल आणि मला चाल लावायची जरूर देखिल नाही. ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

१) मराठी केंद्रस्थानी ठेऊन काही पंचलाईन हवी आहे. सध्या तरी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हा एकमेव पर्याय समोर आहे. कुणाला आणि काही सुचवता येईल का? "मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले" "मराठी पाऊल पडते पुढे" "जय जय महाराष्ट्र माझा" "आमच्या नसानसात वाहते मराठी" (लाभले अम्हास्..या कवितेतीलच एक ओळ) २) टीशर्टचा प्रकार पोलो आहे. म्हणजे कॉलर आणि शक्यतो डाव्या बाजुला खिसा असावा. (की नसावा?) प्रिंटेड टी शर्ट्स शक्यतो राऊंड नेक किंवा व्ही नेक असतील तर चांगले वाटतात. खिसा तर नकोच. अर्थात, ही वैयक्तिक मते आहेत. ३) रंगसंगती सुचवता येईल का? आवड आपली आपली! ४) कुणी असा प्रकार आधी केला आहे का? काही अनुभव? ऑर्कुटवरील काव्यांजलीच्या कार्यक्रमात आम्ही असे टीशर्ट्स बनवले आणि वापरले आहेत. माझा एक नेट मित्रच असे टी शर्ट बनवतो. एकदा बनवल्यावर १ वर्ष तरी वांधा नाही. ५) अशी टीशर्ट छापून देणारं पुणे परिसरात कुणी ओळखीचं आहे का? मुंबईत आहे. डीटेल्स आज रात्री कळवतो. "Great Power Comes With Great Responsibilities"

ठाण्यात मिळतात बुवा. " सुलेखनकार अच्युत पालव " यांनी तयार केलेले. समतानगर येथे दुकान आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सुचली, सुचली - पंचलाईन सुचली.....!! "दिल्लीचेही तख्त राखितो...!" कशी वाटली बॉस? :) तात्या. -- आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

In reply to by विसोबा खेचर

"दिल्लीचेही तख्त राखितो...!" ++ त्रिवार ++

In reply to by विश्वेश

दिल्लीचे तख्त राखतो? नको बॉ! आपण काय सालं हुजरे आहोत का दिल्लीचे? आपली नेतेमंडळी करताहेत ती हुजरेगीरी पुरेशी आहेच ना? त्यापेक्षा भटसाहेबांनाच शरण जाऊया का? 'शेवटी मदांध तख्त फोडते मराठी! ' हे कसं वाटेल?

In reply to by धमाल मुलगा

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी! हे सर्वात बेष्ट आहे, असे माझे मत आहे. -- मिसळभोक्ता

"दिल्लीचेही तख्त राखितो...!" सद्द्याचे महाराष्ट्राचे कणाहीन नेते पाहिले की नाईलाजास्तव म्हणावेसे वाटते... दिल्लीचेही 'तस्त' राखितो...... :( हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

In reply to by प्रमोद देव

=)) मस्तच ... देवा ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !

In reply to by प्रमोद देव

ब्राव्हो, प्रमोद-जी, ब्राव्हो! "तस्ता"ची कल्पना मस्त! ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

५) अशी टीशर्ट छापून देणारं पुणे परिसरात कुणी ओळखीचं आहे का?
शनिवारवाड्याच्या परिसरात सायकलींची दुकानं आहेत, तिकडे फडके हौद या भागात पोरवाल ट्रेड लिंक नावाचं दुकान आहे (गुगल लिंक देऊ शकते किंवा तोंडी नीट पत्ता देता येईल), तिकडून जी.एम.आर.टी.साठी चांगल्या प्रतीचे टीशर्टस छापून घेतले होते. फेब्रुवारीत ते टीशर्ट्स छापले. आत्तापर्यंत कलीग्जपैकी एकाचाही टीशर्ट खराब दिसत नाही आहे. आमच्यासाठी, लेडीज साईझमधे, काही टीशर्ट्स बनवणार आहात का? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्यासाठी, लेडीज साईझमधे, काही टीशर्ट्स बनवणार आहात का?
आणि त्याला पण खिसा असणार आहे का?

तात्याच्या मापाचा टीशर्ट बनवून घेणार काय? ;) हा प्रतिसाद अवांतर आहे. "चांदनी बार" वाल्यांचे लक्ष आहे ना? (अनवाणी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

१) (पुरषांसाठी ) मर्द गडी मी मराठी . २) आहे मी मर्द मराठा उंच फडकवीन भगवा झेंडा ३) (स्त्रियांसाठी )- मराठमोळी रुजवू मराठी । फुलवू मराठी ; लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी हे दोन्ही पण छानच आहे. - अश्विनी

१) होय, मी मराठी आहे. २) जय महाराष्ट्र जय मराठी

इये मराठीचिये नगरी! किंवा मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! टी शर्ट ला खिसा कॉलर हवीच. टी शर्ट चा रंग? पीच कलर किंवा फिक्कट भगवा. हे कसे वाटते?

रायगडावर शिवमुद्रा छापलेले t shirt मिळतात काळ्या रंगाचा t shirt आणि पिवळ्या रंगामधे शिवमुद्रा मस्त आहे तो t shirt पुण्यात कुठे मिळेल का ?

मागे एक गाणं ऐकलं होतं... तेच वापरलं तरी चालेल वाटते... महाराष्ट्रभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमुची | महावंदनीय, अति प्राणप्रिय, ही माय मराठी आमुची || -अनामिक

१. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा २. बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ३. गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे (महाराष्ट्रगीतातील पहिले कडव्यातील ३ ओळी) ४. हर हर महादेव ५. जय भवानी जय शिवाजी (महाराष्ट्रप्रेमी) सागर

असा महिलानकरिता उपक्रम करायचा असल्यास?????

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ..!

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ..!

माय मराठी माऊली, जणु प्रेमाची सावली. आम्ही मराठीचे सरदार, भगवा फडकवु सातासमुद्रापार. मराठी आमची शान, वाढवु तिचा सन्मान.

अच्युत पालव यांची ही साइट पहा.. सुंदर आहे...

इथे एवढ्या लोकांनी इतक्या पंच लाईन्स सुचवल्या. मग शेवटी कोणती निवडली? काही कळवले नाही. - अश्विनी

काही मराठी कवीतांच्या ओळी देता येतील ऊदा. डोळे हे जुल्मी गडे रो़खुनी मज पाहू नका (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

४) कुणी असा प्रकार आधी केला आहे का? काही अनुभव? वरती अनेकांनी सुचवले आहे. अच्युत पालव यांनी हा प्रयोग केला आहे. त्यांनी बनवलेला एक टी शर्ट मी पाहिला होता. त्यावर श्रावणमासी ही कविता होती.