मस्तच आहे हे गाणे/भजन. त्यातील अर्थ मात्र वर मिभोंनी सांगितलेला वाटतो.
"मुंगी उडाली आकाशी, तिणे गिळीले सुर्यासी" सारखेच ह्या हंसाचे उडणे आहे असे वाटते.
वास्तवीक कविता आपण कधी वाचतो (वय, वेळ, मूड इत्यादी) यावर त्याचे आपले मनातील अर्थ बदलू शकतात. त्यामुळे केवळ या भजनात अथवा कुठल्याही गाण्यात कवीला काय म्हणायचे आहे तोच अर्थ आपण घेण्याची गरज नाही असे वाटते. म्हणूनच तुम्हाला इतर लागलेले अर्थपण कुठेतरी पटतात.
तीच अवस्था "नववधू प्रिया मी बावरते" बद्दल आहे. बरीचशी स्पष्ट तरी देखील परस्परविरोधी अर्थाने भरलेली...
बाकी आज तुमच्यामुळे माझ्या आठवणीत पण घंटाळी मंदीर आणि तिथल्या आठवणी जाग्या झाल्या...
जवळच राहणारा एक कुणीसा मुलगा ठेका धरायला आला होता. तंबोर्यावर मी.
श्रोते फक्त दोनच. मी आणि त्यांच्या पत्नी वसुंधरा कोमकली.
अण्णांच्या घरीही त्यांचं गाणं ऐकण्याचा योग काही वेळेला आला आहे.
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
मी सुध्दा काव्यात अर्थ शोधत राहते. आणि अचूक मिळाला म्हणजे तोच अर्थ असावा अशी खात्री झाली की समाधान होत.
आपले लेखन आवडले.एकतर भजन ऐकवलत. त्याच्याशी निगडित काही आठवणी सांगितल्यात शिवाय विविध अर्थ ही समाजावून दिलेत.
आता मी ही शोधते आहे की यापैकी अचूक अर्थ कोणता असावा? की सारेच?
मीनल.
सुंदर लेख !
आवडले !
***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
छान लेख. माझ्या आईच आवडत भजन. या लेखामुळे खूप आठवणी जाग्या झाल्या. हंस म्हणजे आत्मा हे १५-१६ वर्षाची असताना खूप आवडलं होतं. गळणार्या पानासारख नाशिवंत शरीर आणि मुक्त होऊन देवाकडे झेपावणारा आत्मा.
खूप छान लिहिलाय लेख. हे माझं अतिशय आवडतं भजन आहे. त्यातून जितके अर्थ शोधावे, तितके कमीच! लेखातले आणि प्रतिसादातलेही संदर्भ समर्पक आहेत.
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखारूह की शायरी
हंस = आत्मा, हे तर आहेच पण हा अकेला उडून जाणारा हंस त्याला गळणार्या पानाची उपमा देताना त्या पानाचा नव्या कोंबातून होणारा पुनःप्रवेश मोठ्या खुबीनं सूचित केलाय कबिराने. ते गळणारं पान कुठे जाणार, कसं जाणार हे त्याच्या हातात नाही पण ते पुन्हा हिरव्या कोंबातून येईल. हे चक्रनेमिक्रम चालूच आहे, चालू रहाणार आहे. ह्यात कुठेही खेद/खंत नाही, दु:ख नाही, परतीची आर्त आस आहे, उत्पत्ति-स्थिती-लय ह्या चक्राचा आदर आहे.
आत्म्याला हंसाची उपमा देखील किती चपखल आहे! नीर-क्षीर विवेक जागा असलेल्या ह्या पक्ष्याची उपमा तुमचा विवेक जागा करुन जाते.
तुमच्या मनाचे डोळे उघडणारे हे पद कुमारांनी असं गायलं आहे की साक्षात आत्मदर्शन झाले आहे!
(हंस)चतुरंग
प्रतिक्रिया
सुरेख!!
क्या बात
हंस
असेच वाटते
असेच
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुरेख..
आत्मा
सुंदर
अरे बाप रे
जवळच
आवडले
आवडले
सुंदर लेख
वा !!
छान लेख.
सुंदर लेख.
खरेच सुंदर
झकास लिहलय.
वा वा सुरेख स्फुट!
>>नीर-क्षीर
सुरेख लेख.