पुण्यात चारचाकी गाडी चालविणे म्हंजे एक दिव्य गोष्ट झाली आहे. गेल्या चार महिन्यात माझ्या तीन चार मित्रांनी गाड्या घेतल्या; परंतु चार महिनेही त्या गाड्यांची लकाकी टिकली नाही. एक गाडी मागच्या बाजूने चेपलेली, दुसरीच्या दरवाजाला भला मोठा कोचा, तिसऱ्या गाडीला मागचे चाक ते पुढचे चाक असा पाच फुटांचा मोठा स्क्रॅच...
तुमच्या लक्षात आलेच असेल... ही सर्व उदाहरणे पुण्यातील वाढत्या ट्रॅफिकचे दृश्य परिणाम आहेत. पुण्यात चार चाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे एका गाडीला दुसऱ्या गाडीचा ठोसा, हे प्रकार घडतच राहणार. परंतु अन्य गाड्यांचे ठोसे चुकवूनही तुमची गाडी सुरक्षित राहीलच, अशी खात्री काही देता येणार नाही. हे माझे गृहितक खरे ठरविणारा एका प्रसंग मला आज याचि डोळा पाह्यला मिळाला....
बायकोच्या स्कूटीची सर्व्हिसिंग बऱ्याच दिवसांपासून रेंगाळली होती. आज करू, उद्या करू, असे करत आज योग आला. सकाळी लवकर उठून मी स्कूटी सर्व्हिसिंगला टाकली. माझ्या घरापासून सर्व्हिस सेंटर सुमारे आठ किलोमीटर, पर्वती पायथ्याशी आहे. गाडी देऊन पायपीट करीत मी सिंहगडरोडवर आलो. एखादी सिक्स सिटर पकडून घर गाठावे, असा विचार मनात होता. पण बऱ्याच दिवसात चालणे झाले नव्हते म्हणून तसाच चालत पुढे निघालो...
दांडेकर पूल ओलांडून पुढे चालू लागलो. मधेच चकचकीत लाल रंगाच्या एका अलिशान मोटारीने माझे लक्ष वेधून घेतले. त्याची दोन करणे होती. एक तर ती पार्किंगमध्ये नव्हे; तर रस्त्याच्या कडेला थांबविलेली होती. दुसरे म्हंजे, अगदी कोरी करकरीत होती ती. आठ-नऊ लाखांची नक्कीच असेल! कुणीही यावे आणि तिच्या रंगात पाहून तोंडाला पावडर लावून जावे, असा तिचा थाट होता. म्हटलं, किती छान मोटार आहे. आपल्या नशिबात "अशी' केव्हा येणार कोण जाणे?... जरा तिच्या जवळून जावं म्हणून चालू लागलो, तर एक बोकड ऐटीत त्या गाडीकडे निघाला होता. माझ्या आधी जाऊन तो गाडी जवळ थबकला. त्याला पाहून माझी पाऊले संथ झाली. मी थांबलो. त्याच्याकडे पाहत होतो. तो म्हंजे बोकड कुणाचीही तमा न बाळगता गाडीला हुंगत होता. जरावेळानं त्यांनं गाडीच्या मागच्या दरवाजकडे निरखून पाहिले. काही वेळ तो पाहात होता. का कोण जाणे पण नंतर तो मागे सरला आणि मुंडी खाली घालून त्याने दरवाजाला जोराची धडक दिली. अशा चारपाच धडका त्याने दिल्या. कदाचित त्याचे प्रतिबिंब त्याला त्या चकचकीत रंगात दिसत असावे.
आता बोकडच तो. त्याच्या धडकेने गाडीचा दरवाजा पार चेमटून गेला होता. विचार केला, या गाडीचा मालक कुठे असेल आता. तो हजर असता, तर त्याने नक्कीच या बोकडाला गोळ्या घालून रात्री मित्रांना बोकड पार्टी दिली असती.
म्हटलं, बरं झालं आपल्याकडे फोर व्हीलर नाहीये. फोर व्हीलर नसल्याचा आनंद मी अनुभवला होता. या आनंदातच मी बराच वेळ चालत राहिलो....
वाचने
2828
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा हा...
अर्रर्रर्
हाहाहा !!
सरदार
In reply to हाहाहा !! by टारझन
सरदारजी ?
In reply to सरदार by उमराणी सरकार
टारुभौ...
In reply to हाहाहा !! by टारझन
टारूभाऊ बघा
In reply to टारुभौ... by विशाल कुलकर्णी
हॅ हॅ
चालता चालता