अर्रे बापरे !!
काय खतरा कविता केलिये ... शरदिनी जियो ...
आपण आज पासुन तुमचे फॅण... तुमच्या क्रिटिक्सच्या तोंडावर ह्या पेक्षा जड ते काय फेकून मारणार ... जियो ,...
जागा झालो , जन्मलो , उठलो , पुनर्जन्म झाला , राखेतुन वर आलो , नवचैतन्य आलं , !!!!
काय जबरदस्त व्यथा मांडलीये ... बिचारी किल्वर राणी ...
इस्पिकच्या राजाचं प्रभु देखिल काही करू शकणार नाही ... कालंच मिड डे मधे .. "जपानी तेल" ची अॅड्वर्टाईज पाहिली !! ते चालू शकेल बहुदा !!
- चौकट राजा
अधिक जपानी तेला साठी आम्हालाच भेटा
जागा झालो , जन्मलो , उठलो , पुनर्जन्म झाला , राखेतुन वर आलो , नवचैतन्य आलं , !!!!
राखेतून पुन्हा जीवंत
झालेला जाडसर
फीनिक्स,
दे तीनशे रुपये
(शरदिनीताईंचा शिष्य)
-- मिसळभोक्ता
वा !!!!
अन् नासपतीच्या खोडाशी पडलेला
फाटका पण युद्धपिपासू इस्पिक राजा
मस्त !!!
जणू हिंग उडालेली
पोकळ बांधानी डबी
फारच सुंदर !!
न सोसणारं कदाचित
अपेक्षांचं ओझं
पण का व्हावी नेहमीच
ही थुलथुलीत प्रतारणा?
क्या बात है !
ओबामा ला (आणि डेव्हिड अॅक्सेलरॉडला) ईमेलने पाठवली आहे. जरा वेळाने फोन आल्यावर अर्थ समजावून सांगेन. अफगाणिस्तानातून अमेरिकेने बाहेर पडावे, हे त्याला पटेलच.
शरदिनीताई, तुम्ही एकदा जकार्ताला जाच.
-- मिसळभोक्ता
कविता समजली असं वाटतंय. दोन अर्थ दिसतात - एक मूळ कवितेचा म्हणून आणि दुसरा एकूण इथल्या तुमच्या कवितांविषयीच्या अनाकलनीय, अगम्य वगैरे धाटणीच्या माझ्यासह इतर प्रतिसादांवरचा टोला. वा.
कवितेचे नांव " डंकर्कचे विध्दविवेचन" कां दिले ? हेच लक्षात आले नाही ( इथपासूनच न कळण्याची सुरवात झाली :/ )
पण कविता कां आवडली हे ही लिहीणे तितकेच महत्वाचे :
१. कवितेत तुम्ही जे शब्द वापरले आहेत, ते अगदी वेगळे आहेत
( हिंग, बांधानी, करपट इ. ) त्यातून नासपती ह्या झाडाचा
उल्लेखही क्वचितच कुठल्या कवितेमध्ये आला असेल.
२. कवितेच्या ओळींमध्ये केलेली शब्दरचना विस्मयकारक आहे.
( थुलथुलीत प्रतारणा, बाष्कळ यमकांची करपट वेलबुट्टी, निरभ्र
माघार इ.)
एखादी अवघड, जरा उशीरा कळणारी पण ह्याच्यापेक्षा समजायला सोपी, अर्थ लावता येईल अशी कविता टाका नां ? म्हणजे मग आमच्याही मेंदूला व्यायाम होईल.
लालजी गोधू यांचा जीव सुखावला असेल. बांधानी हिंगाची मराठी कवितेच्या इतिहासात नोंद झाली.
थुलथुलीत आणि बांधानी याचा काहीतरी संबंध असावा असेही काही इतिहासकारांचे म्हणणे आहे.
अन् मोक्याच्या क्षणी
त्याची निरभ्र माघार
त्याची पुनःपुन्हा माघार
वा ! वा ! ताई ह्या ओळी वाचून मला एक जुने विडंबन आठवले.
भातुकलीच्या खेळामधली....
अर्ध्यावरती राजा उठला राणी तशीच उताणी
(आधी अवांतर : ईप्सितवंचन = frustration = हवे असलेले बळेच नाकारणे - यासाठी सोपा मराठी शब्द आहे का? म्हणजे लाईन मारतो तो मुली ने राखी बांधली की "पोपट होतो" हा विनोदी शब्द, त्यासाठी गंभीर शब्द कुठला आहे?)
अचाट ऐतिहासिक दृष्टांत (येथे डनकर्क), गुंतागुंतीचे सामासिक शब्दप्रयोग (धूम्रतरल), आणि एका ज्ञानेंद्रियाकडे दुसर्याच संवेदनेची कल्पना करणे (करपट वेलबुट्टी), या सर्व चमत्कृती शरदिनी यांचे वैशिष्ट्यच आहेत. त्या असणार हे जाणूनच कविता वाचली. त्याबद्दल तक्रार नाही.
काहीकाही शब्दांची निवड "नास्पती" द्वि-अर्थी (एक वाच्यार्थ, एक ध्वन्यर्थ) म्हणून उत्तम आहे. पण काही शब्द निष्काळजी वाटतात. "बांधानी" म्हणजे कणिक-मैद्याने "बांधलेले" हिंगाचे खडे. त्या तपशिलातून शब्दवैचित्र्याबरोबर काय मिळते? काही खोल अर्थ असेल तर माझ्यासाठी ईप्सितवंचन. उलट शब्दाचा सोस होऊन निष्काळजीपणा झाला असे वाटण्याचा मोह अनावर होतो. (मागे एका कवितेत "जवनिका-कर्णिका यांचा जीवशास्त्रीय क्रम का उलटवला?" या प्रश्नाने असेच वंचन आणि शब्दांचा सोस वाटण्याची भावना माझ्यात उत्पन्न झाली होती.) "विद्ध" म्हणजे तीक्ष्ण जखम झालेले, बाणाने शिकार झालेले... याचा अर्थ विनोदी अति-उपयोगाने गुळगुळीत झालेला आहे. येथेसुद्धा मला शब्दाचा सोस जाणवतो.
ही सगळी कोडी सोडवता सोडवता, "इस्पिक राजा आणि किल्वर राणी यांचा भग्न संबंध" या विषयाबद्दल माझ्या मनातले कुतूहल मारले गेले. त्याविषयी शब्दांपलीकडची कुठली समजूत मला झाली, अशी भावना खोल उद्भवली नाही.
म्हणून म्हणतो - वंचक. तरी वाचनीय कविता. चालू द्या, शरदिनी.
>>म्हणजे लाईन मारतो तो मुली ने राखी बांधली की "पोपट होतो" हा विनोदी शब्द, त्यासाठी गंभीर शब्द कुठला आहे?
मी आपणांस शब्द सुचवणे म्हणजे तीनचाकी सायकल चालवणार्याने वैमानिकास सुचना देण्यासारखे आहे पण तरीही,
पोपट होणे = फजिती होणे
बाकी, जिथे आपल्याला कळत नाही तिथे आपण तोंड उघडत नाही..त्यामुळे कवितेबद्दल नो कमेंट्स..
"हिरमोड" उत्तम.
याबाबत शाहरुख यांच्याबरोबर खरडचर्चा झाली. माझ्या मते "फ्रस्ट्रेट"साठी "प्रयत्नांचा विचका होणे" किंवा "आकांक्षांचा विचका होणे" हे प्रतिशब्द अर्थाच्या दृष्टीने नेमके असले, तरी मिताक्षरी असल्यामुळे "हिरमोड" हा उजवा.
फ्रस्ट्रेशन साठी उद्विग्नता हा सगळ्यात सुयोग्य शब्द आहे. हिरमोड होणे म्हणजे अपेक्षाभंग, उत्साहावर विरजण पडणे यासारखे काहीसे व तसा अर्थ. नकारात्मक छटेच्या दृष्टिकोनातून फ्रस्ट्रेशन हे अपेक्षाभंग इ. पेक्षा जास्त गहिरे आहे. त्याला हिरमोड तितकेसे योग्य नाही. चू. भू. द्या. घ्या.
(पर्यायसूचक)बेसनलाडू
आशा करतो की इस्पिकच्या राजाने सप्तपदी घातल्या नसतील.
बाकी किल्वरची राणी आणि या इस्पिकच्या राजाचा धुम्रतल सहवास गोल्ड तिकीटे काढून चालला होता का? तसे असेल तर राणीच्या आईस नक्कीच "न सोसणारं कदाचित अपेक्षांचं ओझं, पण का व्हावी नेहमीचही थुलथुलीत प्रतारणा?" असे झाले असेल...
शरदीनीताई,
क्रिप्टीक लिखाणाचा वसा तुम्ही मास्तरां कडुन घेतला आहे का??
वा! छान! असंच लिखाण चालू राहो, हीच सदीच्छा! :)
(उतु नये मातु नये! घेतला वसा टाकु नये!)..............
खरं सांगू? या आधीच्या दोन कवितांइतकी ही कविता भावली नाही...
तरीही उगीच उडवून न लावता कवयत्रीच्या कवितेचा स्वीकार केल्याबद्दल मिपाकरांचे आभार!!!!
-बदामचा राजा!!!
तुम्ही तुमच्या कवितांबरोबर तुमची एक वेगळी डिक्शनरी का देत नाही?
कारण आम्ही आमच्यापरीने (थोडंफार संस्कृत आणि मराठीचं ज्ञान इत्यादी..) अर्थ लावायचा प्रयत्न केल्यावर एका ओळीचा दुसर्या ओळीशी, एका शब्दाचा दुसर्या शब्दाशी काहीही संबंध आहे असं मुळीच वाटत नाही.
केवळ अवघड आणि एकापुढे एक ठेवल्याने नादमयता येणारे शब्द एकत्र गोळा करून आम्हाला कविता म्हणून तुम्ही वाचायला लावताय असं वाटतंय.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
(आज सुट्टी आहे.
गाढ़ झोप लागली होती तेव्हा का कुणास ठाऊक भडकमकर मास्तर स्वप्नात आले होते. मुलीला शाळेत सोडायला चालले होते. असो! )
कविता 2009 ची असली तरी ख़ास आहे आणि 2015 ला देखील नाही त्याहून जास्त लागू आहे.
अर्रे
जागा झालो !!
(शरदिनीताई
चल,
सुंदर !!!
न सोसणारं
सहमत
युद्धपिपासू इस्पिक राजा
हे नातंच
दुसरे महायुद्ध?
+१
शरदिनीतै, म
(बांधानी
(बांधानी
वा
जय हो !!! !
अरे उगिचच
हुश्श
भन्नाट
सुरेख्,अप्रतिम
शरदीनीताई
उनझेपेबल
कविता आवडली, पण कळली नाही.
मसजीद बंदरला आज
अग्गायायायायाया.............
हीहीहीही
अग्ग्गाग्गागा
मेलो...............
आगागा
छान कविता.
वाचलीच पाहिजे पण ईप्सितवंचन करणारी
>>म्हणजे
"फ्रस्ट्रेट"साठी "फजिती"सुद्धा गंभीर नाही
हिरमोड
उत्तम
उद्विग्न होणे/उद्विग्नता
तुम्ही
बरोबर आहे.
छान :-)
हॅहॅहॅ
शरदीनीताई
अरे बापरे !
खरं सांगू?
विद्धविवेचन!
तुम्ही
मिपा क्लासिक-६
असहमत.
असहमत.
(आज सुट्टी आहे.
+11111