मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फक्त अनिवासी भारतीयांसाठी - नवा धागा

मुक्तसुनीत · · काथ्याकूट
वाचकांच्या सोयीसाठी नवा धागा उघडत आहे. जुन्या धाग्यासाठी पहा : http://www.misalpav.com/node/8846 सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती. तर अनिवासी भारतीयांनो, खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. त्याबरोबरच, स्वतःचे अनिवासीत्व वर्गीकृत करावे, ही देखील विनंती. (म्हणजे तात्पुरते : अमेरिकेतील एच १ - ब सारखे जे काही जग भर आहे ते, भारतीय नागरीक, परंतु परदेशी रहिवासः अमेरिकेतील ग्रीन कार्डसारखे जे जगभर आहे, ते. आणि परदेशी नागरीक: मूळचे, म्हणजे जन्मतः भारतीय, परंतु सध्या परदेशी नागरीक) प्रश्नः समजा आपण रहात असलेल्या देशाचे भारताशी (काही कारणामुळे) वितुष्ट आले, किंवा युद्ध झाले, तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल (युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?) ? येऊ द्यात. माझे उत्तरः मी ज्या देशाचा नागरीक आहे, मग रहात कुठे का असेना, त्याचे समर्थन करीन, त्या देशाकडून लढीन. तुमचे काय ?

वाचने 7718 वाचनखूण प्रतिक्रिया 38

टारझन गुरुवार, 08/06/2009 - 17:52
नविन शोध लागला ... मुक्तसुनित हेच खरे मिसळभोक्ता आहे !! - (स्पाय) मिसळसुनित

In reply to by टारझन

छोटा डॉन गुरुवार, 08/06/2009 - 18:49
>>नविन शोध लागला ... मुक्तसुनित हेच खरे मिसळभोक्ता आहे !! व्वा टारझनराव, मला तुमचा अभिमान वाटला. वास्तविक पहाता ह्या शोधाबद्दल आपल्याला खचितच "शांततेसाठीचे नोबेल प्राईज" मिळालले हवे पण आपण ते पुन्हा "फेकलेल्या परदेशी तुकड्यांची औकाद ती काय ?" म्हणुन फाट्यावर माराल ह्याची खात्री आहे ... म्हणुन निदान आपल्याला "ज्ञानपीठ" द्यावे अशी शिफारस मी करतो ... ------ छोटा डॉन

विकास गुरुवार, 08/06/2009 - 18:43
मुळ धागा मिसळभोक्तांनी सुरू केल्या मुळे विशेष करून हा त्यांना प्रश्न आहे. आपण विचारत आहात की: तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल...युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ? समर्थन आणि लढणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहील्याच्या बाबतीत नुसता कळफलक बडवावा लागतो तर दुसर्‍याच्या बाबतीत शत्रूला बडवावे लागते. तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे? "त्या देशाकडून लढीन" असे म्हणताना नक्की तुम्ही कसे लढणार? बाकी आम्ही लहानपणा पासून असेच शिकत आलो आहे युद्ध एकच आहे आणि बाजूही ठरलेली: "माणूसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू!" ;) (ऐकीवात आहे: आचार्य अत्रे हे गाणे ऐकल्यावर म्हणाले की बहुतेक मरूच!8} कदाचीत त्यांना टिस्टा, शबाना, महेश भट्ट सारखी मंडळी तयार होणार हे माहीत असावे...:-) )

In reply to by विकास

मिसळभोक्ता गुरुवार, 08/06/2009 - 21:53
माझ्या दृष्टीने समर्थन आणि युद्ध करणे फारसे वेगळे नाही. कळफलक हा दुधारी तलवारीपेक्षा अधिक इफेक्टिव्ह असतो. सायबर वारफेअर मध्ये कळफलकानेच युद्ध होते. माणुसकीचे वगैरे कविता म्हणून ठीक आहे. पण माणुसकीच्या बाजूने तुमचा देश नसला, तर तुम्ही स्वतःच्याच देशाशी युद्ध कराल का ? -- मिसळभोक्ता

In reply to by विकास

Nile गुरुवार, 08/06/2009 - 22:25
समर्थन आणि लढणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहील्याच्या बाबतीत नुसता कळफलक बडवावा लागतो
=)) =)) =)) =)) त्यासाठी 'ते' युद्ध होण्याची वाट कशाला पहायला पाहीजे? मराठी 'संकेत'स्थळांवर तर नेहमीच अशी युद्ध चालु असतात. =))

विनायक प्रभू गुरुवार, 08/06/2009 - 18:51
विकास भौ- एकदम सहमत पुन्हा कशाल अवतरतोस, मरुच नको ना असे कोणी का सांगत नाही.

In reply to by विनायक प्रभू

विकास गुरुवार, 08/06/2009 - 19:23
>>>मरुच नको ना असे कोणी का सांगत नाही. वर माझ्या विधानात अत्र्यांना कुठल्या अर्थाने म्हणायचे होते ते लिहीले आहेच. "मरूच नको ना" हा मुद्दा बरोबर आहे पण त्याच बरोबर लढणे, जबाबदारी पार पाडणे हे विसरू नको हे सांगणे देखील महत्वाचे आहे. दुर्दैवाने ते सांगितले जात नाही. त्यामुळे तसे व्यवहारात मग वागताही येत नाही... माझ्या इथल्या एका भारतीय मित्राने (तत्कालीन इथल्या विद्यालयातील प्राध्यापकाने) सांगितलेले एक पंधराएक वर्षांपुर्वीचे उदाहरणः "सबवे ला (दोन डब्यांची रस्त्यावरची आणि भुयारात पण जाणारी ट्राम) अचानक कसला तरी हादरा बसला आणि सर्वजण जागीच हलले अथवा पडले. ताबडतोब दारे उघडली गेली (कारण रस्त्यावर होती) आणि मी बाहेर जीव वाचवायला पळत आलो. नंतर बघितले तर लक्षात आले की दुसरापण एक बाहेर पळत आला आणि तो ही भारतीयच होता. बाकी त्या डब्यातील काळे-गोरे (वर्णीय, आडनाव नाही!) स्वतःला सावरून झाल्यावर इतरांना मदत करत होते..." मला माहीत आहे, असे सगळेच नसतात, सगळीकडे असे होत नाही आणि याला जिथे गरज आहे तिथे उलट उदाहरण पण मी देऊ शकेन. पण तरी देखील हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे...

In reply to by विकास

मिसळभोक्ता गुरुवार, 08/06/2009 - 21:55
विकासभौ, आपण दिलेल्या उदाहरणावरून "भारतीय हे माणुसकीचे शत्रू आहेत" असे दिसते, कारण संकटात सापडलेल्यांना मदत करणे, हीच माणुसकी. आता तुमचे युद्ध कुणाशी ? -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

विकास गुरुवार, 08/06/2009 - 22:15
आपण दिलेल्या उदाहरणावरून "भारतीय हे माणुसकीचे शत्रू आहेत" असे दिसते, कारण संकटात सापडलेल्यांना मदत करणे, हीच माणुसकी. आता तुमचे युद्ध कुणाशी ? तसे म्हणायचे नाही. एक अब्ज बिंदूंमधील हे केवळ दोन बिंदू आहेत. बाकीचे एक्स-वाय अ‍ॅक्सिस वर मांडून मग लाईन होते, की कर्व्ह, पॅराबोला की हायपरबोला (अ‍ॅसेम्प्टोटीक - इव्हर अ‍ॅप्रोचेस बट नेव्हर रिचेस) होतोय ते समजेल... बाकी, हे म्हणजे केवळ ९/११ झाले म्हणून सर्वच मुसलमान (आणि मुस्लीम राष्ट्रे) वाईट म्हणण्या सारखे झाले. आपल्याला माहीतच असेल की आपल्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झुडूप ने इस्लाम इज रीलिजन ऑफ पीस असे सातत्याने म्हणले होते (त्याने हल्ला केलेले, अटकेत टाकलेले अपराधी आणि निरपराधी हे मुस्लीम धर्मीय होते हा निव्वळ योगायोग! ;) )

मिसळभोक्ता गुरुवार, 08/06/2009 - 21:59
गीतेच्या पहिल्या अध्यायात भगवंताने "स्वकीयांशी लढताना ते स्वकीय आहेत ह्याचा विचार करू नये" असे सांगितले आहेच. त्यामुळे बाय लॉ, तुम्हाला स्वतःच्या देशाविरुद्ध लढण्याची परवानगी आहे. (अवांतरः भग = भोक, वंत = असलेला.) -- मिसळभोक्ता

एक गुरुवार, 08/06/2009 - 22:14
यातून काहीतरी वेगळच तर सुचवायचं नसेल? :W आम्ही कुठल्या बाजूने लढणार हे आमच्याकडे कोण मदत मागायला येणार आणि ते कुठे बसणार यावर ठरवलं जाईल.. -(तो पर्यंत पहुडलेला कॄष्ण)

In reply to by एक

विकास गुरुवार, 08/06/2009 - 22:17
हा धागा औषधोपचार/चौकशी या सदरात का आहे? खूप मिसळ खाल्ली की असा औषधोपचार अधूनमधून लागतो म्हणून हे औषधोपचार सदरात आहे ;)

In reply to by विकास

मिसळभोक्ता गुरुवार, 08/06/2009 - 22:19
मिसळपावावरील एका गटाची चौकशी, आणि विरोधी गटाला औषधोपचाराचा सल्ला. -- मिसळभोक्ता

नितिन थत्ते गुरुवार, 08/06/2009 - 22:14
इंग्लंड किंवा वेस्टइंडिज मधले भारतीय त्यांच्या संघाविरुद्ध भारतीय संघाला पाठिंबा देतात आणि विजयाचा जल्लोषही करतात. (अरे हे काय? धागा माझ्यासाठी नाहिये) :) नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by नितिन थत्ते

मिसळभोक्ता गुरुवार, 08/06/2009 - 22:18
इंग्लंड किंवा वेस्टइंडिज मधले भारतीय त्यांच्या संघाविरुद्ध भारतीय संघाला पाठिंबा देतात आणि विजयाचा जल्लोषही करतात. मग दंगली मस्जिद बंदर, भायखळ्यात का होतात ? -- मिसळभोक्ता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळभोक्ता गुरुवार, 08/06/2009 - 22:31
झाडावर चढलीस, तर डॉन्याला खाली पाठव. त्याची इथे गरज आहे म्हणाव. -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

Nile गुरुवार, 08/06/2009 - 22:32
ते तर कवापासुन मि.भो आला रे आला ओरडताहेत. ;) (डॉ. ह. घे..च! )

In reply to by मिसळभोक्ता

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/06/2009 - 22:34
तसंही माझ्या वजनाने फांदी मोडेल! पण तो पिंपळावर चढला आहे आणि मी हरबर्‍याच्या झाडावर त्यामुळे भेटणार नाही तो मला!! डान्राव, या हो, तुम्हाला हे काका बोलावत आहेत. आल्यावर तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही. ज्यांना कोणाला डान्राव दिसतील त्यांनी कृपया त्यांना त्वरित मिपावर पाठवून द्यावे. अदिती

In reply to by मिसळभोक्ता

टारझन गुरुवार, 08/06/2009 - 22:51
काय चढाचढी चाल्लीये रे मुलांनो ?? गुढग्याचे त्रास संभवतील आं ! मंग नानावटीत टाकावं लागेल आणि तिकडेही वराहज्वर आला आहे म्हणे !! -(फुटबॉल एल्बो ने त्रस्त) टचिन टेंडुलकर

In reply to by टारझन

_समीर_ गुरुवार, 08/06/2009 - 22:56
टारू, गुढग्याच्या त्रासाची चिंता तुला असणे स्वाभाविक आहे रे! पण सगळ्यांचेच तुझ्यासारखे नसते काही. (हलके घे हो!)

In reply to by मिसळभोक्ता

प्राजु गुरुवार, 08/06/2009 - 22:53
मग दंगली मस्जिद बंदर, भायखळ्यात का होतात ? तिथलेच बहुतेक सगळे लोक अनिवासी इंग्रज अथवा वेस्टइंडिज असावेत.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by नितिन थत्ते

Nile गुरुवार, 08/06/2009 - 22:28
थत्ते काका (की आजोबा म्हणु?) कुठल्या 'देशात' आहात? की मंगळावर आहात? =))

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile गुरुवार, 08/06/2009 - 22:55
हॅ हॅ हॅ. त्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर दुर्बीण रोखुनच सांगा ना आम्हाला. ;)

इनोबा म्हणे गुरुवार, 08/06/2009 - 22:41
तेजायला आमच्या प्रतिसादांचं आणि ह्या मॉनीटरांचं काय वाकडं आहे कळत नाही. दिसला प्रतिसाद की उडव. चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इनोबा म्हणे गुरुवार, 08/06/2009 - 22:48
काय रे, आत्ता खरंच प्रतिसाद उडवला का उगाच वावड्या उडवत आहेस रे? इनोबावर आरोप करणं ही फ्याशनच झालीये हल्ली. असो. चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

In reply to by इनोबा म्हणे

_समीर_ गुरुवार, 08/06/2009 - 22:43
इनोबा, आता ऐन राखी पोर्णीमेला तू भांचोत भांचोत करत बसलास तर उडणारच की रे प्रतिसाद! :) बाझवला तिच्यायला!!

In reply to by इनोबा म्हणे

Nile गुरुवार, 08/06/2009 - 22:46
संभाव्य कारणे: १. तुम्ही अमेरीकन कंपनीत काम करता २. तुमच्या चपलेचा ब्रँड अमेरीकन आहे (घातल्या आहेत का?) ३. अमेरीकन कम्पु शी निगडीत आहात वगैरे वगैरे वगैरे.

In reply to by Nile

इनोबा म्हणे गुरुवार, 08/06/2009 - 23:11
१. तुम्ही अमेरीकन कंपनीत काम करता नाही २. तुमच्या चपलेचा ब्रँड अमेरीकन आहे (घातल्या आहेत का?) नाही ३. अमेरीकन कम्पु शी निगडीत आहात आमचा स्वतःचाच कंपू आहे. चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

नंदन गुरुवार, 08/06/2009 - 22:58
खालीलपैकी एक प्रतिसाद निवडावा आमचा प्रतिसाद म्हणून - १. काय ट्यँवट्यँव लावलं आहे. आहे हे असं आहे. ज्यांना इथलं वातावरण आवडत नाही, त्यांनी चालू पडावे. सगळे गेलात नि XX बंद पडले तरी बेहत्तर (हे बाळासाहेब ठाकरे अधूनमधून निवृत्तीची घोषणा करत तसं. ) २. बरं बाबांनो. तुमच्या मनासारखं होऊ देत. काय कवतिकं करायची ती करा अमेरिकेची. आपण साला एक शब्द बोलणार नाही. XX मारली आणि पदरचे पैसे खर्चून संकेतस्थळ काढलं. (पडलो तरी नाक वर) ३. आपलं घर, आई-बाप सोडून सुखासुखी कुणी परदेशी जात नाही, हे मला ठाऊक आहे. पण दुर्दैवाने माझ्या ओळखीत दहा तरी असे लोक आहेत जे.... सगळ्यांचा मित्र. (हा आधी तीनदा येऊन गेलेला प्रतिसाद) ४. साला मजा आली. एक काडी टाकली की हे लोक कसे भांडत बसतात ते बघायला. &#$@ (प्रतिवादाचे मुद्दे संपल्याने निरुत्तर झालो आहोत हे कबूल न करण्याचा एक मार्ग) या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे आपल्याला उद्देशून तर नसेल अशी शंका कोणी घेऊ नये :). त्यामुळे या प्रतिसादाला "माझ्या लेखनाचा बराच बारकाईने अभ्यास केला आहेस, हो. छान, छान" अशी ठेवणीतली प्रतिक्रिया आली तर आश्चर्य वाटेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

_समीर_ गुरुवार, 08/06/2009 - 23:03
वावावा! असाच अभ्यास चालू राहू दे हो नंदन! शेवटी क्रेडीट मलाच जाते ;) कोकणात म्हशीला रेडकू झाले तरी क्रेडीट सरपंचाला म्हणतात बहुतेक =))

In reply to by विसोबा खेचर

_समीर_ गुरुवार, 08/06/2009 - 23:14
तात्या आज नेमकी गुरुवार रात्र आहे!! आजची खादाडी गुरुवारचा उपास तिच्यायला... बुधवार रात्र असती तर तुमी पण फॉर्मात..मग लैच मज्जा!! :)