Skip to main content

फुलांच्या देशात ......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 05/08/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कंपनीचे (फुग्रो) हेडऑफीस लायशेंडॅम (Leichendam) हॉलंड इथे असल्याने दरवर्षी किमान दोन तरी चकरा होतातच हॉलंडच्या. यावेळी कालच्या मे महिन्यात परत एक दौरा झाला. यावेळी वुरबर्ग येथे राहण्याची सोय केली होती कंपनीने. इथे आलो की इथली फुले कॅमेर्‍यात पकडणे हा माझा छंद असतो. या वेळी ठरवले होते की नेहेमीच ट्युलीप्स च्या मागे लागतो, (मग सिझन असो वा नसो, मी आपला ट्युलीप्स शोधत फिरतो वेळ मिळेल तसा) या वेळेस त्या वाटेला जायचे नाही. मग इतर फुलांच्या मागे लागलो. त्यापैकी काही फोटो.... एका देखण्या घराशेजारी हा तितकाच देखणा राखणदार आढळला आणि मला मोह आवरला नाही. कंपनीने पुरवलेल्या तात्पुरत्या घरासमोर, तात्पुरत्याच भाडोत्री रथासमवेत अस्मादिक ! विशाल.
लेखनविषय:

वाचने 3034
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

:) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मस्त फोटो आहेत. हॉलंड म्हणज्जे एकदम "फुल्ज पॅराडाईज" च दिसतोय! ;) मला वाटते सीलसीलाचे चित्रिकरण हॉलंड मधे झाले होते. त्या वेळेस त्याचे अप्रुप होते :)

वा वा! विशाल, फोटो पघुन आनंद जाहला! आदुगर आमी फुल्यांच्या देशात असे वाचले. म्हन्ल फुले-आंबेडकरांच्या मधील फुल्यांच्या देशात हे काय चालल आहे? असा काही वैचारिक लेख हाय कि काय? कारन अवती भवती हेच वाचतो ना! पुर्वी फुले-आंबेडकर असा द्वंद्व समास नव्हता. काहि विचारमंचांनी तो जाणीवपुर्वक रुजवला. नंतर त्यात हळु हळू फुले-शाहु-आंबेडकर असा त्रैशाब्दिक समास तयार झाला. तो ही रुजला. समाजाच्या विकासासाठी विचार आणि कृती पेक्षा राष्ट्रपुरुषांना वेठीस धरणे सोयीचे जाते. प्रत्येकाने आपापल्या सोयीने राष्ट्रपुरुष निर्माण करुन त्यांची ढाल पुढे करुन समाजकारणाच्या नावाने राजकारण खेळले जाते. राजकारण हा शब्द बदनाम झाल्याने त्याकडे नेहमी संशयीत नजरेने पाहिले जाते. असो हा वेगळा विषय झाला पण यानिमित्ताने आठवले एवढच. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विचार करायला लावणारी प्रतिक्रीया आहे सर आपली. न जाणो येत्या काही दिवसात काही बहीण भाऊ पण या यादित येतील. विशाल कुलकर्णी , सगळे फोटो तर छानच. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

वरून शेवटचा, मधून दुसरा व शेवटून शेवटचा फोटू जीवघेणा! कसलं गहिवरुन आलय म्हणु सांगु ! ठांकु...ठांकु...!! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...