तात्यांच्य्या गांधाराच्या लेखावरून काही इतर, विषेशतः लताबाईंच्या हिंदी चित्रपटगीतांमधील विशेष स्थानांची आठवण झाली. ती त्यातील 'हाय..' ह्या शब्दाच्या अत्यंत परिणामकारक उच्चारावरून. लताबाईंचे गाणे अगदी अंडरप्लेईंगचा उत्तम नमुना आहे. कोठेच भाव उतू चालले आहेत असे दिसत नाही. पण अगदी अचूक, जेव्हढ्यास तेव्हढे, असे परिणामकारक शब्दोच्चार, विशीष्ठ जागांवरील किंचीत आघात, ह्यांतून त्या किती जीवघेणे गातात त्याचे प्रत्यय ह्या काही गाण्यांतून दिसते.
त्यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या 'बरसात' मधील अत्यंत गाजलेल्या 'बरसात मे..' च्या अंतर्याच्या शेवटी जो ' हाय ' आहे, तो प्रेमाची पहिली चाहूल लागलेल्या तरूणीच्या मनाचा हुंकार आहे. १९५१ साली आलेल्या 'आह' मधील 'राजा की आयेगी बरात' मधील 'हाय' मात्र प्रेमभंग झालेल्या नायिकेचा आहे.
शंकर जयकिशनसाठीच गायिलेल्या 'काली घटा' तील 'उनके सितम ने लूट लिया' तील 'हाय क्या करे?' दु:खी नायिकेची अगतिकता दर्शवतो, तर १९५७ साली शंकरच्या निदर्शनाखाली म्हटलेल्या 'हाय, तू ही गया मोहे भूल रे' ह्या नृत्यगीताची मझा काही औरच.
पं. रविशंकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताबाईंनी 'अनुराधा'तील शैलेंद्रची गीते गायलीत, त्यातील 'हाये रे वो दिन क्यू ना आये' ची गोडी अवीट आहे.
आणि हंसराज बहेलच्या 'हाय, जिया रोये' ची सुरूवातच अंगावर काटा आणते. त्याच हंसराज बहेलने मुकेश व लताकडून गाऊन घेतलेल्या 'नैन द्वार से मन मे वो आके, तन मे आग लगाये' मधे लताबाई 'हाय रे कोई छलिया छल के जाये..' असे म्हणतच येतात.
अजून एक जीवघेणे 'हाय' चे गाणे ,चित्रगुप्तांसाठी गायलेले 'हाय रे तेरे चंचल नैनवा, कुछ बात करे, रूक जायें'
एल. पींसाठी गायलेल्या 'भोर भयी पनघट पे' मधील 'हाय' हा दोन वाक्यांतील गॅप भरण्यासाठी आहे, खरे तर.
दत्तारामांच्या 'टारझन कम्स तो दिल्ली"मध्ये 'हुस्न इकरार करे' ह्या अत्यंत शृंगारिक गाण्यात अंतर्याच्या शेवटी जो एक थोडा पॉझ आहे, त्याला बाईंच्या 'हाय..'ने कसे विलक्षण तोलून धरले आहे ! कल्याणजी आनंदजीसाठी 'ऱोटी कपडा और मकान' मधील 'हाय हाय ये मजबूरी'ची सुरूवातच ह्या 'हाय' ने आहे.
'तेरे घर के सामने' तील बर्मनदांसाठी बाईंनी गायलेले 'ये तनहाई, हाये रे हाये, जाने फिर आये न आये' अवखळ तारुण्याचा सुंदर आविषकार सादर करते. तर आर. डी. साठी 'बरसात की एक रात'मधे गायलेले पहाडी ढंगाचे गाणेही 'हाय' पासूनच सुरू होते...' हाय वो परदेसी ' .
वाचने
13210
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!!
असेच म्हणतो !
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
अजून एक हाय!
एकदम मस्त!
छोटेखानी
पवन
दिलका
लताची आणखी दोन गाणी
अजून एक हाय
कैसे दिन बिते..
खास मेजवानी
१. तुने
मिपावरचा
लताबाईंचे रेचक गाणे
अरे देवा!
In reply to लताबाईंचे रेचक गाणे by नंदा
आळस दूर
In reply to अरे देवा! by क्रान्ति
श्या!
In reply to लताबाईंचे रेचक गाणे by नंदा
श्या!
In reply to श्या! by स्वाती२
साजेसे,,
In reply to लताबाईंचे रेचक गाणे by नंदा
सुरेख धागा.
+१
In reply to सुरेख धागा. by मुक्तसुनीत
२+
In reply to +१ by सहज
सुपडा साफ गाणी
In reply to सुरेख धागा. by मुक्तसुनीत
हा, हा...
In reply to सुपडा साफ गाणी by डॉ.प्रसाद दाढे
वा! मस्त
छान्
अजून काही 'हाय'
तुम्ही गातसा सुस्वरे...
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to तुम्ही गातसा सुस्वरे... by नंदन
नंदनसायबा,
In reply to तुम्ही गातसा सुस्वरे... by नंदन
वाहवा
In reply to तुम्ही गातसा सुस्वरे... by नंदन
वाहवा
In reply to वाहवा by डॉ.प्रसाद दाढे
असं दिसतंय
In reply to तुम्ही गातसा सुस्वरे... by नंदन
आणखी एक हाय ..
धन्यवाद
हाय हाय!!!
हाय!हाय! हा लेख कुठे लपला
हाय प्रमाणेच
.
Hay,
हा हाय लताबाईंचा नसून
In reply to Hay, by भक्त प्रल्हाद
Ata matra haay khaayachi
..
हाय राम,रामा रामा गजब हुई
In reply to .. by चंपाबाई
सुरेख लेख!
छान लेख आणि प्रतिसाद
क्या बात है!
क्या बात है...
In reply to क्या बात है! by चतुरंग
अरे उदासीन माणसा जरा
In reply to क्या बात है... by महामाया
हाए...
लागे ना मोरा जिया
छान लेख! आवडला. उत्तम संकलन!