हे राग-बिग आपल्याला काही कळत नाही... पण गाणी जाम आवडतात....
हे घ्या यादीत आणखी थोडी भर... तशी बरीच गाणी आहेत.. पण लेख वाचतानाच आठवली ती गाणी...
लारा लप्पा लारा लप्पा लायी लख दा.. , (म्हणजे नक्की काय हो??)
लता नि उषा यांची जुगलबंदी... हो... तुमको पिया दिल दिया कितने नाझसे...(हा पिया चक्क चक्क अजित आहे)
याच दोघींचंच आणखी एक अफलातून गाणं अपलम चपलम पोरी काय मस्त नाचतात हो.. ऐकलं बर्याचदा... कधीतरी शाळेत असताना रंगोलीमध्ये प्रथम पाहिलं नि त्यानंतर आजच.. पण चित्रफीत पाहिली नाही म्हणून गाण्याची जादू काही कमी होत नाही...
पुन्हा मुस्लिमी ढंगातल्या शिनिमातलं... मेरे मेह्बूब में क्या कमी...,
जीव ओवाळून टाकावा अशी लता नि शमशाद बेगम यांची कव्वाली.... तेरी मेहफिलमें किस्मत आज़माकर हम भी देखेंगे... या गाण्यात मला मधुबालापेक्षा निगार सुलतानच जास्त आवडली... पण त्यानंतर "जहनसीब... काँटोंको मुरझानेका खौफ नहीं होता!!!" हे वाक्य निगार नि दिलीपकुमारला अक्षरशः खाऊन टाकतं...
लता नि आशाचं आणखी एक अतिशय आवडतं गाणं.. "ऐ चाँद जहाँ वो जायें".. हे बहुतेक शारदा मधलं...
शमशाद्जींच्या आवाजाचा पोतच निराळा... त्यांची "कज़रा मोहब्बतवाला" नि "रेशमी सलवार कुर्ता जालीका" ही गाणी भेंड्या खेळताना कोणत्याही पक्षानं चालू केलं तेरी दोन्ही पक्ष तितक्याच उत्साहानं गातात..
नि गोरे गोरे ओ बाँके छोरे.. विसरून कसं चालेल... यातला एक आवाज लतादी हे माहीत होतं.. इथं दुवा टाकण्यासाठी थोडं गुगलवलं.. तर दुसरा आवाज अमीरबाई कर्नाटकींचा आहे असं कळलं.. नि गाणं माहीत होतं पण चित्रफीत आज प्रथमच पाहिली... :)
मंडळी येऊद्यात आणखी गाण्यांच्या आठवणी नि दुवे!!!!
(सध्या यूट्युबवरून गाणी उतरवण्यात व्यस्त)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
दोनदा टंकलेला लेख हरवला म्हणून तीन भागांत टंकला! त्यात तुमच्या प्रतिसादातली बरीच गाणी दुव्यांसह दिली होती, पण तो जड होतोय की काय, या विचारानं दुवेही कमी केले. तशीही बरीच गाणी बघणीय नसतात, ऐकणीयच असतात ना! तुमचा प्रतिसाद मनापासून आवडला.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
प्रतिक्रिया
अजूनही बरीच गाणी आहेत अशी...
मी