खल्लास च्या खल्लास कोट्या आणि सुयोग्य लांबी ह्यामुळे विडंबन अतिशय आवडले. विडंबन करताना मुळ लेखाची लांबी फाट्यावर मारली हे ही आवडले ;)
>>"निकल" मधली भावना आणि 'गली'तला ग किती शुद्ध आहे पहा.
हे वाक्य ह्रुदयाला व भावना मनाला भिडल्याने डोळ्यात पाणी आले.
असेच अजुन येऊद्यात ...
------
छोटा डॉन..
सावधान..! प्रतिसादशुद्धिचिकित्सक आयोग"बसला" आहे ;)
गाण्यातले बारकावे, सॉरी 'जागा' काय शोधल्या आहेत, केवळ सुंदर...! आपला गाण्यांचा अभ्यास आपल्या लेखनीतून प्रकट झाला आहे. सूर्यग्रहणाच्या परिणामाने लख्खन प्रतिभा स्फूरली आणि लेख आकाराला आला असावा असे वाटते..! :D (ह.घे)
गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची.
हे निरिक्षण तर केवळ अप्रतिम.....!
-दिलीप बिरुटे
गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची...
२ जीबीची जादा मेमरी मिळाल्यावर हेवी प्रोग्रॅम ....
'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही.
.. केवळ अप्रतिम.....!
:-)
एक नंबर !!
=)) =)) =))
(लेख/विडंबन जे काय असेल ते वाचले नाही पण प्रतिसाद द्यायचा मोह आवरला नाही .. काय आहे या विडंबनाने आमची खुप दिवसांची इच्छा पुर्ण होईल .. लेखांची विडंबने वैगेरे साहित्यप्रकारांवर प्रशासकिय निर्बंध येतिल.)
...'ग' वेळीच थांबला तरी त्याची बाधा होत नाही...
...या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची...
२ जीबीची जादा मेमरी मिळाल्यावर हेवी प्रोग्रॅम जसा पळू लागतो तसं आपले विचारही पळत जातात...
क्या बात है!!!
जियो!!!!
लेख चांगला आहे. विचार करायला लावणारा वैचारीक आहे. तरी देखील वाचताना मला हसावेसे वाटले. पण वर पाहीले तर लेखाची विभागणी संगीत आणि प्रकटन मधे झालेली, विरंगुळा, विनोद मधे नाही... मग हसण्याचे चित्र काढले तर चुकून अवांतर समजले जाऊन कुणाला चांदणी मिळू शकेल ना!
प्रतिसाद चांगला आहे. विचार करायला लावणारा वैचारीक आहे. तरी देखील वाचताना मला हसावेसे वाटले. पण तुम्ही wink ची स्मायली न काढल्याने हसत नाही.
खरं तर अवांतर प्रतिसाद देउन मलाही इतर कुणाला चांदणी मिळण्यास प्रोत्साहन द्यायचे नाही. पण संपादक साहेबांचा असा भावी (हंगामी) संपादकाला पदग्रहण करण्यापुर्वीच पदच्युत करण्याच्या प्रयत्नाचा जाहीर निषेध.
आणि त्यात त्यांनी wink ची स्मायली न काढल्याने आम्हीही काढत नाही.
कालानुक्रमे सर्वप्रथम एका मित्राचे आभार ज्याने 'दिगंबरा दिगंबरा' आणि 'निकल भी जा' या दोन्हीची चाल खूपच सारखी आहे हे लक्षात आणून दिलं.
नंतर आभार दोन मिपाकरांचे (नोबडी शुड बी नेम्ड) ज्यांनी मला गप्पा मारताना फूस लावून हे विडंबन लिहीण्यास भरीस पाडलं, आणि वर माझ्या लेखनात सुधारणाही करून दिल्या.
तात्यांचे आभार ज्यांनी आधी एका सुंदर गाण्यावर लेख लिहीला (त्या लेखावर प्रतिक्रिया देणं माझ्या आवाक्यातलं नाही.) आणि शिवाय हे विडंबन खेळीमेळीने घेतले.
सर्व वाचक/प्रतिसादकांचेही आभार.
यापुढेही मी रेडीओवर अशी भन्नाट गाणी ऐकून राहेन पण .... घाबरू नका, याच पद्धतीचा आणखी एक लेख मी तरी लिहीणार नाही! ;-)
अदिती
आत्ता त्या ओळी "दिगंबरा, दिगंबरा"च्या चालीवर पुन्हा म्हणून पाहिल्या...आणि =))
आता कोणी मिपाकराला "पतली गली से निकल" म्हणायचं असेल की "दिगंबरा दिगंबरा हो हां..." असं म्हटलं तरी चालेल! ;)
लय भारी! एकसे एक पंचेच :)
वर सु.ठेंनी सुचवलेला उपाय तर एकदम फस्सकल्लास :)
येऊ द्या दुर्बिटणेताई अजुन काही :)
----------------------------------------------------------------------------------------
चांदण्यात फिरताना माऽझा कापलास प्रतिसाऽऽद........
गाण्याचे उत्तम रसग्रहण किंबहुना गानसमीक्षेचा एक नवा मापदंडच!
तरीही अधिक उदाहरणे देऊन लेख अजून खुलवता आले असते असे वाटते.
;)
(पुढील समीक्षेच्या प्रतीक्षेत)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सही जमल आहे गं विंड्बन...
या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची
हे आले होते लक्षात.... आता परत एकदा गाणे त्या चाली वर म्हणुन पाहिले सही जमतयं....
बाकी कोट्या मस्त जमल्यात
निखिल
================================
केवळ भन्नाट ... शब्दच नाहीत
आपल्याला एखादं गाणं का आवडतं? चौथे उत्तर ;)
१) शब्द आवडतात,
२) संगीत - चाल आवडते,
३) एकूण समष्टीने गाणं, गाणारा/री, गाण्याचं चित्रीकरण, गाण्यावर ओठ हलवणारा/री, वाद्यमेळ
४) चित्र विचित्र अंग हलवणारे बाजूचे नर्तक (किमान अक्षय - अर्शद मुळे आज ह्या गाण्यात त्यांच्याकडे पहिल्यांदा लक्ष गेले माझे =)) =)) =)) )
शंकर-एहसान-लॉयचं निकल भी जा हे गाणं आपल्यापैकी फार लोकांनी ऐकलेलं नसेलच. आवर्जून ऐका.
आधी ऐकले होते. पण आज हे गाणे म्हणजे अत्भुत असल्याचा नव्याने साक्षात्कार झाला :)
जावेद अख्तरसाहेबांनी शब्दांच्या माध्यमातून (प्रकटनाच्या शेवटी गाण्याचे बोल दिले आहेत) दिलेला व्यावहारीक जगण्याविषयीचा एक संदेश श्रोत्याच्या मनःपटलापुढे वेगवेगळ्या प्रसंगांना तंतोतंत उभा राहतो.
१००% सहमत
त्यासाठी जाणीवपूर्वक त्या मुलाचा आवाज किरटाच लागेल याची काळजी घेत गाण्याच्या संदेशाशी प्रामाणीकपणा राखण्याचा प्रयत्न संगीत संयोजकांनी केल्याचे दिसते. या मुलाने 'निकल भी जा'ला एक वेगळेच परिमाण गाठून दिले आहे.
हा गाण्याचा सुवर्णमध्य वाटला मला =))
या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा.."ला खूप जवळची.
हे निरिक्षण अफलातून आहे आदितीताई ... हे केवळ तुमच्यासारख्या तीक्ष्ण बुद्धीचेच शास्त्रज्ञ करु जाणे :)
मी लिहिण्यापूर्वी ऑफिसात चक्क मोठ्याने हसलो आहे ह्या गाण्याबरोबर दिगंबरा दिगंबरा ची लिंक लावून =))
अक्षय खन्नाने बोटांचा खेळ दाखवला आहे,
येडचाप चाळे असतातच अक्षयचे. पण गाण्याचे सगळ्यात हाईलाईट दृष्य म्हणजे अर्शद नोटा उडवताना दिसतो ते... वा वा... एवढ्या नोटा कुठून आणल्यास रे ठोंब्या.... ;) जणू काही लोकांना तो नोटा उडवून हिणवतो आहे की लोकांनो या चित्रपटाला वेळ देऊन तुमचे पैसे गेले पाण्यात :D हा सीन मात्र थिएटर मधे हा चित्रपट पाहणार्याच्या अंगावर नक्की काटा आणत असेन =))
अशा लयीच्या गाण्यावर अतिशय उच्च नाच हे फक्त अर्शद-अक्षयच करू जाणे! .. खरे आहे.. म्हणून तर सपोर्टींग नर्तक गाण्यात का घेतात हे आजच कळाले =))
शेवटी पुन्हा एकदा =)) =)) =))
मनापासून खूप खूप धन्यवाद आदितीताई...
एवढे पोट भर हसवल्याबद्दल...
आप ने तो हमे जीना सिखा दिया =))
(मदमस्त) सागर
परा आणि श्रावण यांनी अतिशय उत्तम प्रश्न विचारले आहेत. मी एकदा काही वेगळ्या संदर्भात हेच, असेच प्रश्न प्रो. किरटेंना विचारले होते, जेव्हा ते मला संध्याकाळी फिरता फिरता तळ्याकाठी भेटले होते. प्रो. किरटे हे अतिशय विद्वान आणि बहुश्रुत गृहस्थ! त्यांनी लगेच संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी मला असं सांगितलं, "जालिंदर बाबांनी १९९१ साली त्यांचा ग्रंथ अरण्यरूदनरसग्रहणसंहिता यात तिसर्या प्रकरणाच्या चौदाव्या पानावर अशा परिस्थितीचे यथायोग्य वर्णन केलं आहे. जेव्हा जालिंदर बाबांचे परात्पर शिष्य श्रीकुमार परापूरकर यांनी बाबांची एक आरती लिहीली आणि त्या आरतीला सागरगडाचे किल्लेदारांची वारस रेशमताई नाकपुरवालिया यांनी अतिशय आधुनिक आणि उच्च चाल लावली. ती ऐकून बाबांचे एक भक्त श्री. केसरी जंगली यांनी हाच प्रश्न विचारला होता जो सद्यस्थितीत तू मला विचारत आहेस. तर ग्रंथात बाबांनी दिलेली उत्तरं अशी:
"प्रः गाणं कळण्यासाठी ते आवडलंच पाहिजे असे आहे का?
"उत्तरः गाणं कळण्यासाठी आधी अमुक एक गाणं आहे हे कळलं पाहिजे. जर ते कळलं नाही तर कदाचित धडा आवडेल पण गाणं आवडणार नाही. तर गाणं म्हणजे काय हे आधी समजलं पाहीजे, कारण गाणं आणि कविता यांमधेही फरक असतो. प्रत्येक कविता गेय नसते, आणि प्रत्येक गेय कविता गाणंही नसते. गाणं असण्यासाठी त्या रचनेत एक प्रकारची लय, ताल, स्वरावली वारंवार यावी लागते. आणि एवढंच नाही तर गाणं ऐकताना त्यात एक ध्रुवपद आहे, एक किंवा जास्त अंतरे आहेत हेही लक्षात यावं लागतं. नाहीतर ते गाणं होत नाही.
आता हा प्रश्न विचारला आहे तो या आरतीसंदर्भात. तर या आरतीला अत्याधुनिक चाल लावल्यामुळे हे गाणं आहे हे आधी लक्षात यायला वेळ लागतो, त्यामुळे गाण्यात नेमकं काय आहे हे कळायला आणखीनच वेळ लागतो. पण अशा पद्धतीची गाणी आवडण्यासाठी एक विशिष्ट शिस्त निर्माण व्हावी लागते जी एका दिवसात लागत नाही. ही एक-दोन महिने शाळेत जाऊन शिकण्याची गोष्टच नव्हे. उलट असं केलंत तर दोन महिन्यात परत येऊन तुम्ही आधीच्या संगीताचा तिटकारा कराल. तसं होऊ नये.
"प्र. गाणं आवडायला ते कळलंच पाहिजे असे आहे का ?
"उत्तरः याचं उत्तर निश्चित असं देता येणार नाही. कसं आहे ना की आपल्याला जे पहायचं असतं तेच आपल्याला दिसतं. तर आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला कळल्याशिवाय गाणं आवडणार नाही तर तसंच खरं असतं आणि जर आपल्याला उलट वाटत असेल तर तसं खरं असतं. अर्थात मनाची ही अवस्थाही कायमची नसते. ही अवस्था अतिशय मायावी अर्थात फसवी आहे. आपल्याला जे पहायचं असतं ते दिसतं तरी आपल्याला काय पहायचं असतं हे मात्र आपल्या हातात नसतं.
"यापुढे मात्र बाबांनी हा ग्रंथ सामान्य वाचकांसाठी असल्याने क्लिष्टता टाळण्यासाठी त्यांच्या पुढच्या ग्रंथाचा संदर्भ दिला आहे, जो ग्रंथ सध्या मी लिहीत आहे. प्रकाशन झालेले नसल्यामुळे पुढचं स्पष्टीकरण देण्यासाठी मला थांबावं लागेल. किंवा प्रकाशनपूर्व सवलतीत, अदिती, तू तो खरेदी कर. शिवाय तुला प्रकाशनाच्या आधी हा ग्रंथ वाचता येईलच कारण प्रूफरिडींगसाठी इतर कोणी बकरे हल्ली मिळतही नाही आहेत."
एवढं बोलून झाल्यावर मी प्रो. किरट्यांची रजा घेतली.
अवांतरः त्यांच्या घरी तेव्हा चहा मिळाला नाही.
अदिती
आई गं... आदिती... आज तू मला मनसोक्त हसवण्याचा वसा घेतला आहेस की काय? आजपर्यंत एवढा खळाळून क्वचितच हसलो असेन मी.....
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
त्यात हे वाक्य म्हणजे जबर्या ... ;)
सागरगडाचे किल्लेदारांची वारस रेशमताई नाकपुरवालिया यांनी अतिशय आधुनिक आणि उच्च चाल लावली.
मी हिमेश च्या आवाजात सध्या दोन्ही गाणी इमॅजिन करत आहे
दिगंबरा दिगंबरा ... आणि ते आपलं भयानक गाणं - पतली गलीसे निकल भी जा... =))
हा ग्रहणाचा परिणाम समजावा का?
- टिंग्या
अवांतर : हा प्रतिसाद अवांतर आहे. चांदणी मिळवण्याकरिता लवकर क्रमांक १२५ शी संपर्क साधा अन्यधा प्रतिसाद उडवला जाईल!
अदिती,
जोरदार, छप्परफाड लेख. हे गाणे मी अजूनतरी ऐकले नाही. पण सवड मिळाली तर ऐकेन म्हणतो.
प्राध्यापकांशी झालेला संवाद सुद्धा उद्बोधक आणि माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित करणारा. लिहित राहा. मला नेहमी प्रतिसाद द्यायला जमतेच असे नाही पण मी वाचत असतो :)
-- लिखाळ.
आपण खूप बोललो म्हणजे आपण बरोबर बोललो असे नसते :)
प्रतिक्रिया
कै च्या कै
-१
अबाबो...
असेच
+१
अहाहा !
खल्लास!!
हाहाहा!!!
एक नंबर
___/\___ ज ह ब ह
गाणं आणि
छानच.......!!!! --स
मस्त!
वास्तवीक..
प्रतिसाद
हसून हसून फुटलो...
हॅ हॅ हॅ
"या गाण्याची चाल वास्तवात "दिगंबरा दिगंबरा..."
खरच... चाल ओळखीची
एकदम झक्कास!
खीखीखीखी..
आभारप्रदर्शन
घाबरू नका,
हॅ हॅ हॅ
शॉल्लेट...
'ग' वेळीच
आहाहाहा....
चांदण्यात
छान
सही जमल
हेहेहेहेह
विडंबन
वाह
केवळ भन्नाट ...
अदिती,
हाण्ण!!!
प्रतिप्रश्न
लई भारी
ह.च घ्या हो ... नाहीतर माझे फ्लोटर्स तयार आहेत.
ट्ठो
मेलो मेलो...
आईगं अदिती
दिगंबरा दिगंबरा...
बेक्कार
हॅ हॅ हॅ.....
ठ्ठो ! ठ्ठो ! ठ्ठो !
गाणं
हा हा हा!
अदिती, जोरद
मजा आली...लै