"उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कुत्र्यालाही आपली निष्ठा विसरायला लावणारं आहे,' अशी टीका कदाचित राज ठाकरे करतील.
=))
भक्कम नेतृत्व असतानाही काहींनी मालकावर तंगडी वर केलेलीच आहे कि.
शिवसेना हा मोठा पक्ष आहे.
प्रत्येक शिक्षकाला आपलीच शाळा जगात मोठी आहे असं वाटतं.
मस्त! विडंबन आवडले.
यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे बोलणे ऐकून मला मागच्या आठवड्यातच सुधीर गाडगिळांकडून ऐकलेला एक विनोद आठवला:
बाळासाहेबांनी गाडगिळांना पहील्या भेटीतच विनोद सांगायला सांगितला. गाडगिळांनी सुरवातीस हा विनोद पुण्याला स्वारगेटला मुंबईकडे जाणार्या बसची वाट पहात उभा असलेला एक माणूस बाजूच्या माणसास नम्रपणे विचारतो की तुम्ही मुंबईत बाळासहेबांना भेटायला जात आहात का? उत्तर येते नाही. मग उद्धवजींना? - परत नाही, मग मनोहरपंतांना - नाही हो! मग एखाद्या शाखाप्रमुखास? - " हे पहा माझा आणि शिवसेनाचा काही एक संबंध नाही". इतके ऐकताच तो नम्र माणूस एकदम खेकसत म्हणतो, "मग तुमचा पाय जरा माझ्या पायावरून बाजूला करा की!"
बाळासाहेब हसले पण म्हणाले की तुम्हाला पण विनोद करायला शिवसेनाच मिळते का? मग गाडगिळांनी हा विनोद सांगितला: दिल्लीत सध्या एक प्रश्न चर्चेला आहे. २+२ किती? प्रमोद महाजन हसत हसत बाकी बोलत शेवटी कसे बसे चार म्हणले. लालूप्रसादांनी, "हमरी बिहार मे..." करत बरेच काही बोलले पण उत्तर नाही. मग अर्जुनसिंगांना विचारले, ते म्हणाले, "वैसे तो २+२ चार होते है, लेकीन हम मध्यप्रदेश मे जाके कार्यकर्ताओंके साथ बातचित करेंगे, जो सुझाव आयेंगा वो बतायेंगे!" सरते शेवटी गाडी पवारांवर आली. "साहेब २+२ किती?" साहेब चेहर्यावर कुठलेही हावभाव न दाखवता म्हणाले, "देयचेत का घेयचेत?"
या विनोदावर बाळासाहेब जोरात हसले. पण मग परत म्हणाले की यात पण तुम्ही शिवसेनेवर अन्याय केला. किमान आमच्या मनोहरपंतांना तरी विचारू शकला असता की. गाडगिळ म्हणाले, "अहो साहेब, पंतांना विचारले असतेतरी शेवटी उत्तर तुम्हीच देणार ना!"
>>साहेब २+२ किती?" साहेब चेहर्यावर कुठलेही हावभाव न दाखवता म्हणाले, "देयचेत का घेयचेत?"
=)) =)) =))
हे फारच आवडले.
अभिदाचा लेखही लै भारी, मटामध्येही मस्त वृत्तांत आला होता ह्या सोहळ्याचा ...
ह्या लेखावरुन प्रविण टोकेकरांनी "शॅमेलिऑन सरड्यावर" लिहलेल्या लेखाची आठवण झाली, तो ही फार अफाट लेख होता.
येऊद्यात अजुन असेच ...
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
<<भवनात खलबतं करण्यासाठी जमलेली मंडळी मूळ काम सोडून याच मोहिमेवर लागली.>>
हल्ली शिवसेनेला " कार्पोरेट चेहरा देण्याच्या नादात मंडळी मूळ काम सोडून देऊन असेच काहीतरी करत असतात(वैयक्तीक मत, लगेच भा॑डायला येऊ नका !!)
<<<उद्धवजी बोलत होते, "व्होडाफोन'नं जाहिरातीतून `पग'ला आधी काढलं, मग परत घेतलं. त्याच्या निष्ठेबद्दल तुम्ही परत एकदा खात्री करून घ्या, एवढंच सांगायचं होतं!''>>>
काय बोललास !!!! जबरदस्त...
<<"साहेब २+२ किती?" साहेब चेहर्यावर कुठलेही हावभाव न दाखवता म्हणाले, "देयचेत का घेयचेत?">> =)) =)) =)) =)) =)) =))
सुहास
प्रतिक्रिया
"उद्धव
त्यांना आधीच्या "एअरटेल' आणि आताच्या "व्होडाफोन'च्या जाहिरातीतला
योग्य तो
मस्त!
हा हा हा ...
मस्त लेख्...अभिजीतराव..