जून जुलै महिन्यात घरी फणस पिकून दरवळू लागतात.बाहेरुन काटेरी पण आतून गोड, बरका गरा असा बचक्यात मावत नाही. तो अलगद ओठाशी धरायचा आणि आत ओढून घ्यायचा. शेजारीच ठेवलेल्या खोबरेल तेलाच्या वाटीत हाताला लागलेला चीक पुसत पुसत , एका मागोमाग एक किती गरे फस्त झाले त्याचा हिशेबच उरत नाही. गरे खाउन मंडळी कंटाळली की घरी सांदणांचा घाट घातला जातोच.
तांदूळ भिजवून कोरडे केले जातात. जात्यावर त्याच्या कण्या निघतात. बरक्या गर्यांचा रस काढण्यासाठी बाल गोपाळ चाळण्या घेउन बसतात. बाहेर पावसाच्या सरी कोसळताना गरमागरम सांदणे खाण्याची मजा औरच !!
कोकणात केली जाणारी ही पाककृती.तशी अनवट. आणि म्हणूनच खास मिपाकरांसाठी.
आत्ताच गेल्या रविवारी घरी केली होती.
साहित्य
भिजवून वाळवलेले तांदूळ २ वाट्या
बरक्या फणासाचे गरे १५-२० ( हे गरे रसाळ असतात)
गूळ १ वाटी
थोडीशी हळद
तांदूळ परतून घ्यावेत. थंड झाल्यावर कण्या करुन घ्याव्यात. म्हणजे सांदण हलके होइल.
बरक्या गर्यांचा रस काढून घ्यावा.
आता मिक्सरमध्ये गूळ बारीक करुन, तो गर्यांच्या रसात मिसळावा.
तांदूळाच्या कण्या आणि गर्यांचा रस एकत्र करावा. थोडे पाणी घातले तरी चालेल. रंग येण्यासाठी थोडी हळद घालावी. मिश्रण तासभर तरी मुरु द्यावे.
हे मिश्रण इडली पात्रात्/मोदकपात्रात घालून अर्धा तास उकडून काढावे. सांदण तयार आहे.
अगदीच गोड वाटत असेल तर, नुकत्याच दादरा सोडलेल्या बरणीतले लोणचे तोंडी लावयला घेण्यास हरकत नाही.
पाकृ सौजन्यः सौ. काळे. आमचा सहभाग फोटु काढण्यापुरताच. ( 8| लहानपणी आईला चाळणीवर रस तरी काढून द्यायचास की!!)
वाचने
12738
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा ! पाकृची
हो, गरे
In reply to वा ! पाकृची by लिखाळ
हो, गरे
In reply to वा ! पाकृची by लिखाळ
सांदण : ही तर मर्मबंधातली ठेव
In reply to वा ! पाकृची by लिखाळ
काय आठवण!
कायरे
अस्सेच म्हणतो
In reply to कायरे by पिवळा डांबिस
बरं झालं...
In reply to अस्सेच म्हणतो by धनंजय
तसे ठीक आहे
In reply to बरं झालं... by दिपाली पाटिल
अच्छा...
In reply to तसे ठीक आहे by धनंजय
धनंजय सुद्धा मस्त करतात सांदण.
In reply to तसे ठीक आहे by धनंजय
प्राजू,
In reply to धनंजय सुद्धा मस्त करतात सांदण. by प्राजु
पण तसंही तुम्हाला गोड कुठे आवडतं ना? ;)
In reply to कायरे by पिवळा डांबिस
हुच्च पाकृ कपिलभौ!
मला
वेगळी आणि
मस्त
स्सस्स्! एक
झक्कास
शेवटचे दोन फोटो
जबर्या..! त
आत्ता
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पाकृ, फोटो
वावा..
पाणी
पाणी
एकदम मस्त
मला ह्या
झक्कास......
असेच बोल्तो !
In reply to झक्कास...... by वेताळ
फोटो
धन्यवाद!
आता दसरा/ नवरात्रात पातोळ्यांची खास कोकणी स्टाईल पाकृ टाकेन म्हण