Skip to main content

आलबेल

लेखक सचिन यांनी रविवार, 09/03/2008 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाच्या तरी पुतळ्याची कुठेतरी विटम्बना झाली म्हणून परवा आमच्याही गावामध्ये दङगल झाली ज्यान्चे नाव माहीत नाही कार्याबद्दल कल्पना नाही त्यान्च्या नावे मण्डळान्ची दगडफेकही खच्चून झाली बन्दोबस्त झाले, अश्रुधूर झाला आता सारे आलबेल आहे गोळीबारातल्या जखमी - मृतान्ची यादी देखील पुसट झाली

वाचने 7223
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

हे ज्वलंत सत्य आहे. आणि हे कधी बदलेल असे वाटत नाही. कवितेतली भावना आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु

धन्यवाद प्राजुताई !! मिसळपाव वरचा मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद ...आणि असा उत्साहवर्धक !

आणखिही उत्तम काव्यांची अपेक्षा आहे आपल्याहडून. - (सर्वव्यापी)प्राजु

सचिनराव्,अगदी झकास जमलीय कविता. आपल्याकडून अशाच आणखी काही काव्यांची अपेक्षा! लगे रहो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मि.पा. वर स्वागत.. अशाच कवितांची वाट पाहात आहोत. प्राजु शी सहमत..

एक दाहक सत्य खूप मोजक्या शब्दात व्यक्त केलं आहे...

थोडक्यात, परंतु छानच लिहिले आहे... सचिनराव, मिसळपाववर मनापासून स्वागत... कृपया आपला लॉग-ईन आयडी देवनागरीत बदललात तर बरं होईल... तात्या.

लॉग इन देवनागरीत बदला. नाहीतर दंगल होईल. नामांतरवादी करतील. नाही केला तरी दंगल होईल. नामांतरविरोधी करतील. असो. उत्तरोत्तर अशाच छान कविता आपल्याकडून लाभोत. धन्यवाद.

रसिक वाचकान्ना विनम्र अभिवादन ! आता नामान्तर करून टाकले आहे.

कवितेचा अतिशय भेदक झाला आहे. कविता आवडली. सोनाली