निळू फुले ... मराठी नाट्य-चित्रसृष्टीला लाभलेला एक अनमोल हिरा ! हाती आलेल्या भूमिकेची नेमकी व नेटकी जाण ठेवून अगदी सहजगत्या त्या भूमिकेचं अक्षरशः सोनं करणारा एक चतुरस्त्र आणि जातिवंत कलावंत !
काही महिन्यांपूर्वीच पाहिलेल्या 'सातच्या आत घरात' या चित्रपटात अवघ्या दोन मिनिटांच्या भूमिकेतून सारा चित्रपट अख्खा कच्चा खाऊन टाकला होता आपल्या निळूभाऊंनी ! भूमिकेच्या लांबी-रुंदीपेक्षा त्या भूमिकेची खोली कधीही महत्वाची हे निव्वळ संवादफेकीतून व संयत अभिनयातून सिध्द करणार्या या अभिनयसम्राटाला सलाम !
सामना, सिंहासन, पिंजरा, एक गाव बारा भानगडी, सखाराम बाइंडर, सूर्यास्त - या व अशा कित्येक चित्रपटांतील आणि नाटकांतील आपल्या सकस अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकाला आपलंसं करणार्या निळूभाऊंना विनम्र श्रध्दांजली !
- दिपोटी
प्रतिक्रिया
श्रद्धांजली
भावपूर्ण
श्रद्धांजली
विनम्र श्रध्दांजली !
Pagination