आजकाल फास्टनॉलेज चा जमाना तेजीत आहे. कुठलीही माहीती हवी असली तर गुगलवर लगेच त्यासंदर्भातील शब्द टाकून पाहीले जाते. कधीकधी ऐतिहासीक/सामाजीक/राष्ट्रीय माहीती शोधायला या शोधामधे बहुतांशी येणार्या विकीपिडीयाचा उपयोग होतो. तरी देखील कधीकधी याहून अधिक माहीती हवी असते.
अशी वेळ जशी काही कामानिमित्त संशोधन करताना येते तशीच ती मिपा अथवा इतरत्र काही चर्चा करताना योग्य संदर्भ करताना पण येते. अशा वेळेस नेहमीच्या गुगलच्या उपयोगापेक्षा अधिक काहीतरी हवे असते. जिथे ठाम संदर्भ मिळू शकतील. त्याला परत उत्तर तेच आहे - गुगल! फक्त नुसते गुगल नसून ते गुगलबुक्स म्हणून आहे. त्याचा दुवा आहे: http://books.google.com/
(परत) विकीवरील माहीती प्रमाणे सुरवातीस हार्वर्ड, मिशिगन, ऑक्सफर्डम स्टॅनफर्ड विद्यापिठे तसेच न्यूयॉर्क पब्लीक लायब्रररीशी करार करून गुगलने हा प्रकल्प चालू केला. त्यात ज्या पुस्तकांचे कॉपिराईट्स उरलेले नाहीत अथवा काही सरकारी प्रकाशने यांना स्कॅन करून पुर्ण उपलब्धता, ज्यांचे कॉपिराईट्स आहेत पण लेखकांशी करार झाला आहे त्यांची काही पाने दाखवण्याची सोय (पण कुठल्याही प्रकारे कॉपि करायची सोय नाही!) आणि ज्यांच्याशी करार झाला नाही ती नुसतीच स्कॅन करून, पण त्यातील अगदी एखादे वाक्य (स्नीपेट्स) दाखवणे इतकेच उपलब्ध करणे असे तीन प्रकार असतात. त्यात ती पुस्तके कुठे विकत मिळतील फे देखील बाजूस दाखवले जाते. बहुतांशी पुस्तके ही इंग्रजीतच आहेत. पण फ्रेंच विद्यापिठाबरोबर आता फ्रेंच पुस्तके पण स्कॅन करणे चालू आहे. आणि भारतातील भुर्जपत्रे पण स्कॅन केली जात आहेत. त्यांचे स्कॅनिंगचे तंत्रज्ञान अगदी गोपनीय ठेवले आहे.
जर एखादी माहीती, ही (जाला ऐवजी) पुस्तक या माध्यमात शोधायची असेल तर http://books.google.com/ या संकेतस्थळावर जाऊन नेहमी प्रमाणे शब्द देयचे लगेच मोठी जंत्री येईल. पण त्यात नुसते स्नीपेट्स दाखवणार्या पुस्तकांचा उपयोग होत नाही. म्हणून मग ड्रॉपडाऊन मेन्यू मधून "लिमिटेड प्रिव्ह्यू अँड फूल व्ह्यू" निवडायचे. मग त्यातील ज्या पानावर तो शब्द येत असेल त्यात माहीती मिळत जाते. फूल व्ह्यू ची पुस्तके तुम्ही पीडीएफ करून डाऊनलोड करून घेऊ शकता. अथवा फ्रेम वापरून तुमच्या ब्लॉगमधे पण वापरू शकता.
मधल्या काळात दादोजी कोंडदेवांवरून जोरदार चर्चा चालू असताना अशी पुस्तके आणि त्यातील संदर्भ मिळाले होते. तेच काल पेशव्यांच्या चर्चेत खर्याखोट्याची शहानिशा करताना सरकारी गॅझेट मिळून झाले. तेच शोधत असताना एक मराठी म्हणींचे एक पुस्तक एका गोर्या रेव्हरंडने १८९९ साली लिहीले होते, ते देखील मिळाले! खूप मजेशीर म्हणी त्यात मराठीत, इंग्रजीत (ट्रान्सलीटरेशन) आणी अर्थ अशा पद्धतीने दिल्या आहेत. खाली त्याची प्रतिमा दिली आहे.
त्या व्यतिरीक्त अजून काही गोष्टी तयार करू शकता: एक म्हणजे यातील कुठलाही भाग (मोफत पुस्तकांचा) हा विशिष्ठ पद्धतीने इतर संकेत स्थळावर चिकटवण्याची सोय केली आहे. एखादे पुस्तक आवडले/रोचक वाटले तर ते "अॅड टू माय लायब्ररी" ही कळ वापरून स्वत:च्या गुगल अकांऊटमधे साठवून ठेवता येते. मग ते कधीही बघता येते अथवा इतरांशी शेअर करता येते.
एकंदरीत ऐतिहासिक गोष्टींबद्दल माहीती करून घेयची असेल तर तसेच अधुनिक विज्ञानासंदर्भात पण येथे भरपूर पुस्तके मिळू शकतील. अशी पुस्तकातील विद्या वापरली तर उत्तम , नाहीतर "पुस्तकस्था तु या विद्या..." हे आहेच!
वाचने
8935
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! मस्त
chan mahiti aahe........thanks
In reply to वा! मस्त by अवलिया
माहिती
मस्त माहीती
खरंच खाण आहे.
+१
In reply to खरंच खाण आहे. by प्रमोद देव
मस्त
वरवर
In reply to मस्त by ऋषिकेश
छान
:-) :-)
In reply to छान by सुनील
मस्त!
In reply to छान by सुनील
:)
उत्तम
गूगलचा स्कॅन खजिना खूपच उपयोगी
माय लायब्ररी
In reply to गूगलचा स्कॅन खजिना खूपच उपयोगी by धनंजय
फूल व्ह्यू ची पुस्तके तुम्ही पीडीएफ करून डाऊनलोड करून घेऊ शकता.
ह्या स्टेप्स फॉलो करा... (पुढील सूचनांच्या मागोमाग जा )
उपयोगी
धन्यवाद सागर भाऊ
आहाहा! हा प्रकार झकास आहे!
जगातली
+१
In reply to जगातली by शाहरुख
कूल...
छान