Skip to main content

समलिंगी संबंध हा गुन्हा नाही: दिल्ली उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

लेखक मेघना भुस्कुटे यांनी शुक्रवार, 03/07/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने समलिंगी संबंध ठेवू इच्छिणार्‍या लोकांना नवे बळ मिळाले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा बातमीचा दुवा: http://www.loksatta.com/daily/20090703/mp02.htm

वाचने 49123
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच धनंजय यांचा मुद्देसूद प्रतिसाद. :) घटनात्मक आणि कायदेशीर बाजूंची फारशी चर्चा करायची नाही असे मी ठरवले होते. पण तरी या निर्णयाच्या अनुषंगाने काही गोष्टी मांडाव्याशा वाटतात. न्यायालयाने ३७७ कलम घटनेतील मूलभूत स्वातंत्र्याविरोधात आहे असे म्हटले आहे. म्हणजे त्याचा अर्थ सद्याची घटनात्मक चौकट जी काही आहे त्या चौकटीत हे कलम विसंगत आहे असे म्हटले आहे. समलिंगी संबंध समाजाने मान्य करावेत / निषेधावेत / पुरस्कृत करावेत यापैकी कोणतेही रेकमेंडेशन देण्याचा अधिकार न्यायालय या संस्थेला नाही. तो अधिकार जनतेचा आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधीमंडळांचा आहे. म्हणजे जनतेला हे संबंध मान्य नसतील तर जनता आपल्या प्रतिनिधींकरवी घटना दुरुस्ती करून अशा संबंधांवर एक्सप्लिसिट बंदी घालू शकेल असे वाटते.अशी घटना दुरुस्ती झाली तर न्यायालये काही करू शकणार नाहीत. (अवांतर : ३७७ कलम अनैसर्गिक संबंधांविषयी बोलते. त्यात ओरल आणि अ‍ॅनल हे ही येतात. आणि ते भिन्नलिंगियांमध्येसुद्धा असू शकतात. हे सारेच प्रकार आता मुक्त झाले आहेत. बेस्टिअ‍ॅलिटी बद्दल ३७७ कलमात काय आहे ते माहिती नाही.) नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

>>>म्हणजे जनतेला हे संबंध मान्य नसतील तर जनता आपल्या प्रतिनिधींकरवी घटना दुरुस्ती करून अशा संबंधांवर एक्सप्लिसिट बंदी घालू शकेल असे वाटते.अशी घटना दुरुस्ती झाली तर न्यायालये काही करू शकणार नाहीत. खरे आहे. माझ्या माहीतीप्रमाणे अशी घटना दुरूस्ती करायला संसदेत तीन चतुर्थांश मते लागतात. आपल्याकडील पक्षांतरबंदी कायद्यामुळे मत कुठल्याबाजूने द्यावे हे लोकप्रतिनिधींपेक्षा पक्षच ठरवतो :-( आणि तसे मत न दिल्यास त्या लोकप्रतिनिधीस पक्ष बाहेर काढून त्याची निवडणूक रदबातलही करू शकतो. थोडक्यात सध्याच्या काळात कुणालाच पूर्ण बहुमत नसल्याने (सुदैवाने) घटना दुरूस्ती होऊ शकणार नाही. मात्र शहाबानोच्या खटल्याच्या सुनावणीनंतर राजीव गांधींकडे असे ७५% मत असल्याने त्यांनी तशी घटना दुरूस्ती करून घेतली होती हे नजीकच्या भूतकाळातील उदाहरण आहेच...

In reply to by विकास

बरोबर आहे. माझ्या प्रतिसादाचा हेतू 'कोणते वागणे मान्य/अमान्य' हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांचा नाही लोकांचा म्हणजे पर्यायाने विधिमंडळाचा आहे हे अधोरेखित करणे हा होता. (पक्षांतरबंदी हा या चर्चेचा हेतू नाही म्हणून त्यावर भाष्य करीत नाही.) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

जनता आपल्या प्रतिनिधींकरवी घटना दुरुस्ती करून अशा संबंधांवर एक्सप्लिसिट बंदी घालू शकेल असे वाटते.अशी घटना दुरुस्ती झाली तर न्यायालये काही करू शकणार नाहीत. हे काम महामुश्कील आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील तीन महत्त्वाचे मुद्दे त्यासंबंधात कळीचे आहेत: घटनेचा अनुच्छेद १४, १५ आणि अनुच्छेद २१. या सगळ्यांचा संबंध मूलभूत हक्कांशी येतो. त्याखालीच आता समलैंगीक संबंधांना मान्यता देणारा निकाल झाला आहे. त्यामुळे समलिंगी संबंधांना बंदी घालावयाची झाली तर या मुलभूत हक्कांची व्याख्याच बदलणार आहे. आणि ती करणे केंद्राला महामुश्कील जाईल. कारण तसे झाले तर घटनेचा मूलभूत आकृतीबंध बदलला जाईल. केशवानंद भारती प्रकरणाचा निकाल असे करण्यास सक्त मनाई करतो. त्यामुळे संसद अशी घटनादुरूस्ती करू शकेल असे वाटत नाही. कारण तसे काही करणे म्हणजे वर धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे पुरेसे पुरावे नसतानाही केवळ जनतेचे मत आहे म्हणून अल्पसंख्य असणाऱ्या समुदायाला समान हक्क नाकारणे असा त्याचा अर्थ होईल. मला तरी अशी घटनादुरूस्ती अशक्य वाटते. घटनेतील समतेच्या तत्त्वाचा विचार करता स्वेच्छीक समलिंगी संबंधांवरील बंदी अशक्य ठरते.

छोटा डॉन, धनंजय, श्रावण मोडक यांचे विचार योग्य आहेत. धन्यवाद. अभिज्ञ यांनी मांडलेला मुद्दा "विवाहबाह्य संबंध" याबाबत अधिक विचार होऊन त्याबद्दल कायदा होणे गरजेचे आहे. व्यावसायिक / सामाजिक व्यवहारात "विचारू नये, सांगू नये" हा दृष्टीकोन ठेवणे हितकारक. पण मित्रमंडळीत व मुख्यतः विवाहविषयक संबधात याबद्दल माहिती देणे योग्य. किंवा अशाबाबतीत चुकीची माहिती देणे किंवा विवाहबाह्य संबध ठेवल्यास कायद्याने शिक्षा ही केलीच पाहिजे. आपण स्वतःच्या मुला-मुलींसाठी स्थळ शोधतांना जी काळजी घ्यावी, ती कायद्यानेही जनतेच्या भल्यासाठी घ्यावी. पण एक गडबड ध्यानात घ्या.... समलैंगिकांना मूल होणे जरी वरवर अशक्य दिसत असले तरी, फक्त मूल होण्यासाठी समलैंगिक लोकांनी तात्पुरते विरुद्धलिंगी लोकांशी संबध ठेवले, तर वाइट होईल. अशाप्रकारे कोणाचिही फसवणुक होऊ नये. उद्या जर समलैंगिक व्यक्तींनी स्वातंत्र्याच्या नावाखाली मुले असण्याची इच्छा केली तर त्यास योग्य प्रकारे नाकारले पाहिजे. कारण एकप्रकारे तुम्ही ज्यावर प्रेम करत नाहीत अशा लोकांना तुम्ही फसवत आहात किंवा त्यांचा दुरुपयोग करून घेत आहात. समलैंगिक व्यक्तींकडे अनैसर्गिक म्हणून पाहण्यापेक्षा differently abled (यासाठी चांगला मराठी शब्द असल्यास कळवा) म्हणून पाहणे योग्य. त्यासाठी ते स्वतः जवाबदार नाहीत... निसर्गाची लीला आहे. पण "survival of the fittest" या न्यायाने समलैंगिक लोकांनी सत्य स्विकारणे हे अतिशय महत्वाचे आहे.

समलिंगी संभोगावर एनिमा हा चांगला उपाय आहे..

मलाही योग्य निकाल दिला आहे असेच वाटते..पण त्याने परिस्थिती फारशी बदलेल असे नाही वाटत. कायदा शयनगृहात परस्पर संमतीने काय काय घडते यावर थोडीच नियंत्रण ठेवू शकणार आहे (किंवा शकला होता)?? बाकी या निर्णयाने देश खरोखरीच २१ शतकात गेला हे वाचुन अंमळ मौज वाटली.

चाहे मानसून लेट आया है पर एहसास नया ये लाया है, कानून में सुधार आया है देश में अब बदलाव आया है| लड़के को लड़की न खोजनी ना लड़की को लड़का, कोई भी मिल जाये चलेगा बस भिडे प्रेम का टांका | शायद अब किसी घर में मूंछों वाली भाभी आएँगी, कन्यायें कन्या को भी अब जीजू जीजू बुलाएंगी| उन्मुक्त गगन के नीचे केवल अब जोड़े ना रास रचाएंगे, बदला बदला होगा मंजर लड़के जब लड़का पटायेंगे| पुलिस के पास भी अब शायद छेड़छाड़ के केसेज बढ़ जायेंगे , महिला महिला को छेड़ेगी पुरुष पुरुष से छेड़े जायेंगे | हर सिक्के के पहलू दो होते कुछ सुधार तो आयेंगे, ये नए बदलाव देश को जनसँख्या विस्फोट से बचायेंगे|

१. समलैंगिक संबंध ठेवणे हे एखादी व्यक्ती का करते? ही विकृती अनुवांशिक आहे का? विज्ञानाने ह्यासंबंधी नि:संदिग्ध ग्वाही दिली आहे का? २. गे म्हणजे समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष. तर हे संबंध सिमेट्रीक आहेत का (मराठीत काय म्हणतात आठवले नाही. क्षमस्व) ? की त्या जोडप्यातला एक स्त्रैण असतो व दुसरा पुरुष असतो? तसे असले तर दोघांचे वागणे अनुवांशिक आहे का? ३. चला जरा चेंज करुन पाहू अशा वृत्तीने समलिंगी बनणारे, क्रेझ म्हणून समलिंगी बनणारे आजिबात कुणी नसतात का? ४. मला स्वतःला माझी मुले अशी निघू नयेत असे मनापासून वाटते. पण ह्या संबंधांचे वाजवीपेक्षा जास्त उदात्तीकरण केल्याने ज्या लोकांना अशा संबंधांपासून परावृत्त करता आले असते तीही असे संबंध करु लागतील अशी भीती वाटते. ह्यात काही तथ्य आहे का? ५. ह्या अनैसर्गिक संबंधांची मला खरे तर किळस वाटते. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अशी किळस बाळगण्याचा मला आहे का? की ह्या नव्या कायद्यामुळे मला ह्या लोकांना माझ्यातलेच एक म्हणून स्वीकारायचे एक अध्याहृत बंधन आहे?

In reply to by हुप्प्या

>>५. ह्या अनैसर्गिक संबंधांची मला खरे तर किळस वाटते. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अशी किळस बाळगण्याचा मला आहे का? यावर धनंजय यांचे मत जाणून घेण्यास उत्सुक.. (धनंजय यांच्या विचार मांडायच्या पध्दतीचा चाहता) शाहरूख

In reply to by शाहरुख

>>व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अशी किळस बाळगण्याचा मला आहे का -अर्थातच आहे. न्यायालयाने फक्त अशा संबंधाबद्दल शिक्षा करता येणार नाही असे सांगितले आहे. -आपल्यातलेच समजण्याचे बंधन म्हणजे नीट समजले नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी अधिकारी असाल आणि तुमच्या हाताखाली काम करणारा एखादा गे असल्याचे तुम्हाला कळले तर तुम्ही त्याला काढून टाकू शकाल का? या प्रश्नाचे उत्तर बहुधा माझ्यामते नाही असे असेल. म्हणजे वैयक्तिक आयुष्यात गे आहे हे कारण देऊन काढून टाकू शकणार नाही. तो कामाच्या ठिकाणी इतरांना अ‍ॅप्रोच वगैरे करीत असेल तर जसे भिन्नलिंगियांची सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणून कारवाई करतात तशीच कारवाई करता येईल. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by नितिन थत्ते

दुसरे उदाहरण घेऊ. माझ्या मालकीचा एक फ्लॅट आहे. तो मी भाड्याने देत असताना कुणी गे माणूस आला तर मी त्याला तो गे आहे म्हणून कायदेशीररित्या नाकारू शकेन का? मांसाहारी व्यक्तीला भाडेकरू न स्वीकारायचा नियम चालतो असे ऐकून आहे. समलैंगिकता मांसाहारासारखी व्यक्तिगत निवड आहे, त्वचेच्या वर्णासारखी जन्मजात नाही असे मला वाटते. नसल्यास विज्ञानाने ते कुठे सिद्ध केले आहे ते दाखवावे. त्यामुळे एखाद्याने जाणीवपूर्वक समलैंगिक जीवनशैली निवडली असेल तर त्या निवडीला तो वा ती जबाबदार आहे असे नाही का वाटत?

In reply to by हुप्प्या

जाणिवपूर्वक समलिंगी जीवनशैली स्वीकारली म्हणजे काय? (सिगरेट ओढायला लागल्यासारखे हे लोक 'चला एकदा समलिंगी संबंध ठेवून पाहू' असे म्हणून समलिंगी होत नाहीत). मला वाटते समलिंगी असण्याची जाणीव/आणि त्याचे अ‍ॅसर्शन हे जन्मजात होत नसले तरी ती प्रवृत्ती (इन्क्लिनेशन) जन्मजातच असावी. (गे हा प्रकार यूनक-हिजडा यापेक्षा वेगळा आहे). तसेच तो नाइलाजाने होणार्‍या (भिन्नलिंगी व्यक्तीच्या अनुपलब्धतेमुळे. उदा. हॉटेलात काम करून तेथेच राहणारे वेटर वगैरे) समलैंगिक वागणुकीपेक्षासुद्धा वेगळा आहे. ट्रान्सव्हेस्टिझम- क्रॉस ड्रेसिंगपेक्षाही वेगळे आहे. क्रॉस ड्रेसिंग करणारी व्यक्ती स्वतःला दुसर्‍या लिंगाची समजते. उलट गे ही व्यक्ती स्वतःला स्त्री समजून पुरुषाचा सहवास शोधत नसते. आपण पुरुष आहोत पण आपल्याला आकर्षण मात्र स्त्रीचे न वाटता पुरुषाचे आहे ही जाणीवही त्या व्यक्तीला असते. (अवांतर: या सर्व माझ्या समजुती असू शकतील. जाणकार असतील तर चूका दाखवून द्याव्यात). नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by नितिन थत्ते

समलिंगी व्यक्तींविषयी आकर्षण निर्माण होणे एक वेळ मानू शकतो पण त्यातून समलैंगिक संबंध झालेच पाहिजेत आणि त्याचा अधिकार दिलाच पाहिजे असे का? मुळात गे असणे हे नैसर्गिक आहे का अमेरिकेतील प्रबळ गे लॉबीने केलेला हा अपप्रचार आहे? आणि आपण त्यांचे अंधानुकरण करत आहोत? मला ह्याचे नि:संदिग्ध, नि:स्पृह उत्तर मिळालेले नाही. पुन्हा एकदा, एखादा दलित घरात जन्माला येतो वा अफ्रिकन अमेरिकन म्हणून जन्माला येतो तेव्हा ते त्याच्या हातात नसते. आणि त्या वस्तुस्थितीपासून त्याची सुटका नसते. दलित आडनाव वा कृष्ण वर्ण, कुरळे केस व अन्य लक्षणे हे त्याला जन्मापासूनच बाळगावे लागतात. ते अगदी अपरिहार्य आहे. समलिंगी लोकांचे तसे नाही. पौगंड होईपर्यंत ते बाकी मुलांसारखेच असतात. जर त्यांना पुरुष म्हणून वा स्त्री म्हणून जगता येत नसेल तर त्यांना अनैसर्गिक संभोग करणे का अपरिहार्य आहे ते मला कळत नाही.

In reply to by हुप्प्या

ज्या बाबतीत वैयक्तिक मत "ओळखही नको" असे असू शकेल त्या बाबत व्यापाराच्या बाबतीत काही प्रमाणात बंधन आणले जाऊ शकते. आता "घर भाड्याला देणे" हा व्यापार आहे की नाही, याची मला नीट कल्पना नाही. काही लोक फक्त लग्न झालेल्याच किंवा फक्त लग्न न झालेल्याच लोकांना खोल्या भाड्याने देत असत, असे वर्णन पु ल देशपांड्यांच्या एका कथेत वाचले होते. (नाव बहुधा "न पेलणारी पगडी" असे होते.) (कारण काही घरमालकांना लग्न झालेले लोक जबाबदार वाटतात, तर काही घरमालकांना संसाराचा पसारा, वाढता गोतावळा नको असतो.) तर असे दिसते की प्रत्यक्षात भारतात (एके काळी तरी) मालकाच्या आवडी-नावडीनुसार भाडेकरू नाकारता येत असे. (मग त्याचे वागणे फौजदारी कायद्याच्या दृष्टीने कायदेशीर असेनात का.) या बाबतीत अधिक रस असेल तर भारतातील कुठल्या वकिलाकडून तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल. अमेरिकेत वेगवेगळ्या राज्यांमधले कायदे वेगवेगळे आहेत.

In reply to by शाहरुख

किळस वाटते हे काही कायदा बनविणे वा न बनविणे यासाठी कारण होउ शकत नाही असे मला वाटते. कुणाला, किंवा कोणत्या गटाला एखाद्या जातीच्या लोकांची (कारण काही का असेल) किळस वाटत असेल तर त्या जातीला समान न्याय देउ नये का? आज वरील उदाहरण कालबाह्य वाटेल, पण जेव्हा अस्पृश्यता समाजात, जनमानसात होती तेव्हाची (एका, किंवा अनेक गटापुरती असलेली) किळसाची भावना व वरील वाक्यातील किळसाची भावना समांतर आहेत असंच मला वाटत. जसा समाज वैचारीक दृष्ट्या प्रगत होईल तसे या गोष्टी रुळतील. उलट अश्या कायदाच या गोष्टींबद्दल प्रबोधन करण्यास गरजेचा असतो असे मला वाटते. तुमच्या मगात तुम्ही किळस बाळगणे वेगळे, पण ती किळस उघडपणे व्यक्त करणे हे अयोग्यच (कायद्याने ही, या(३७७) कायद्याबद्दल मला माहीत नाही पण) जसे जातीयवाचक संज्ञा वापरणे तसेच हे ही.

In reply to by Nile

सर्वप्रथम मला हा खुलासा करायचाय की मला समलैंगिकांची किळस वाटते असे मला बिलकुल म्हणायचे नव्हते..जर धनंजय यांनी तसा अर्थ घेतला असेल (नसेल अशी अपेक्षा आहे) तर त्यांची माफी !! पण किळस न वाटण्याचे मुख्य कारण हे आहे की माझ्या जवळच्या लोकांपैकी कोणी समलैंगिक असल्यास मला माहित नाही..जर तसे कळाले तर कदाचित मला किळस वाटू शकेल..पण तेंव्हाही मी स्वत:ला असे समजवायचा प्रयत्न करीन की " मला किळस वाटण्यात त्याचा / तिचा दोष नसून मी असे संबंध मानण्यास तयार नाही". Nile यांनी मला काय म्हणायचे होते ते नीट मांडले.. मी जर वाटली तर तशी किळस व्यक्त करू शकतो का ?? जर समोरच्याच्या समलैंगिक भावनांची मला कदर वाटत नसेल तर कायदा माझ्यावर कदर करण्याची सक्ती करतोय का ? (जातीचे उदाहरण माझ्या डोक्यात नव्हते, पण ते इथे योग्य वाटतंय..)

In reply to by शाहरुख

इथे तुमच्या म्हणजे तुम्हाला व्यक्तीगतरीत्या नव्हतं म्हणलं मी. :) (इन जनरल तुम्ही असं म्हणालो होतो)

In reply to by Nile

अस्पृश्यता वा काळा वंश आणि त्यातून होणारा भेदभाव हा एक अगदी वेगळा विषय आहे. ह्या दोन्ही गोष्टींकरता त्या वंशात जन्माला यावे लागते. कुठे जन्मायचे हे त्या व्यक्तीच्या हातात नसल्यामुळे त्यावर आधारित भेदभाव हा अन्याय्य (अनफेअर) आहे आणि म्हणून त्याविरुद्ध कायदा करणे योग्य. पण समलैंगिकता ही अशी नाही असे मला वाटते. एखादा(दी) जाणीवपूर्वक तसे संबंध करतो(ते). त्यामुळे असे संबंध स्वीकारणे म्हणजेच प्रगती हे कसे ठरवले तुम्ही?

In reply to by हुप्प्या

पण समलैंगिकता ही अशी नाही असे मला वाटते. एखादा(दी) जाणीवपूर्वक तसे संबंध करतो(ते)
वरील बर्‍याच प्रतिसादात हे / असल्याप्रकारची वाक्ये आल्याने हे स्पष्टीकरणः समलैंगिकता ही जाणीवपूर्वक स्वीकारलेली नसते. जसे स्ट्रेट म्हणवणारे लोक आपोआप एखाद्या/अनेक भिन्नीलिंगी व्यक्ती(क्तीं)कडे शारिरिकदृष्ट्या आणि/किंवा मानसिक दृष्ट्या आकर्षित होतात तितक्यास सहजतेने, नैसर्गिकरित्या गे व्यक्ती देखील समलिंगीव्यक्तीकडे आकर्षित होतात एखादी (कंडा) मुलगी पाहून मुलाच्या तोंडून सहजतेने शिटी बाहेर पडावी ही तितकी सहज घडणारी क्रिया आहे. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

कंडा मुलगी दिसली की शिटी मारावीच ही सहज क्रिया आहे? मुलगी दिसली की शिटी मारली जाते? माफ करा मला हे नवीन आहे. तथाकथित कंडा मुलगी कुणाची मुलगी, वा बहिण असते आणि त्यांना कदाचित असला कामलोलूपपणा आवडणार नाही असे मला वाटते. आता समलैंगिक संबंधाबद्दल बोलू. वरचे उदाहरण साफ गैरलागू आहे. पण असे संबंध नैसर्गिक आहेत हे कुणी आणि कसे सिद्ध केले आहे? निसर्गाने पुनरुत्पादनाकरता जी इंद्रिये बनवली आणि पुनरुत्पादनाकरता संभोग हा एक आनंददायक अनुभव बनवला आहे. त्याकरता अनेक क्लिष्ट चेतातंतूंचे जाळे आणि अन्य अवयव बनवले आहेत. त्यातून चांगले जीव निर्माण व्हावेत आणि त्यांचे संगोपन व्हावे हा हेतु आहे. ह्यातले कुठलेही उद्दिष्ट समलैंगिक संबंधाने साध्य होत नाही. शंभरात काय लाखात एका क्रियेनेही नवीन जीवन निर्माण होत नाही. मग ह्या संबंधाना नैसर्गिक का म्हणावे? अनैसर्गिक असतील तर अन्य कृत्रीम उपायाने त्यांची तहान भागवता येणार नाही का? विविध उपकरणे बनवून त्यांना संतुष्ट करता येणार नाही का? त्याकरता विकृत संगच केला पाहिजे का?

हुप्प्यांच्या शंकांना माझ्या काही शंका... १. वैवाहिक संबंध ठेवणे हे एखादी व्यक्ती का करते? ही विकृती अनुवांशिक आहे का? विज्ञानाने ह्यासंबंधी नि:संदिग्ध ग्वाही दिली आहे का? २. विवाहित म्हणजे विवाह करणारे पुरुष आणि स्त्री. तर हे संबंध सिमेट्रीक आहेत का (मराठीत काय म्हणतात आठवले नाही. क्षमस्व) ? त्या जोडप्यातल्या एकाला चहा आणि दुसरयाला कॉफी आवड्त असेल तर? तसे असले तर दोघांचे वागणे अनुवांशिक आहे का? ३. चला जरा चेंज करुन पाहू अशा वृत्तीने लग्न करणारे, क्रेझ म्हणून विवाहित बनणारे आजिबात कुणी नसतात का? ४. मला स्वतःला माझी मुले अशी विवाहित निघू नयेत असे मनापासून वाटते. पण ह्या संबंधांचे वाजवीपेक्षा जास्त उदात्तीकरण केल्याने ज्या लोकांना अशा संबंधांपासून परावृत्त करता आले असते तीही असे संबंध करु लागतील अशी भीती वाटते. ह्यात काही तथ्य आहे का? ५. ह्या अनैसर्गिक संबंधांची मला खरे तर किळस वाटते. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अशी किळस बाळगण्याचा मला आहे का? की ह्या नव्या कायद्यामुळे मला ह्या लोकांना माझ्यातलेच एक म्हणून स्वीकारायचे एक अध्याहृत बंधन आहे? यावर हुप्प्या आणि शाहरूख यांचे मत जाणून घेण्यास उत्सुक..

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

असला बालिश, केवळ विचारलेले प्रश्न परावर्तित करायचा केविलवाणा प्रयत्न. ह्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. क्षमस्व.

please read the full judgement available on Delhi high court site or www.lawyersclubindia.com, थेन u will cum to knwo its view shown by HC but still sum litigation pending in Hnable SC so dont get excited if ur homosexual.