Skip to main content

कृष्णार्पण

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 02/07/2009 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
नामस्मरण, चिंतन, सुख वैकुंठीचे जाण चित्ती नांदे समाधान, सा-या चिंता कृष्णार्पण भावभक्ती वाळवंट, मंदिर हे अंतरंग वृत्ति वाहे चंद्रभागा, तिथे वसे पांडुरंग जड देहाचे हे भोग केले त्यालाच अर्पण तूच अनंत ब्रम्हांड, तूच धरा, तू आकाश दूर सारी जो तमाला, अंतरीचा तू प्रकाश तूच दाता, तूच त्राता, तूच कार्य, तू कारण काया, वाचा, मन देवा तुझ्या चरणी लागावे आधि- व्याधी, व्याप- ताप, माया मोह दूर व्हावे तुझे दर्शन घडावे, तनू त्यागताना प्राण
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2498
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

काया, वाचा, मन देवा तुझ्या चरणी लागावे आधि- व्याधी, व्याप- ताप, माया मोह दूर व्हावे>>> अजुन "प्रार्थना" म्हणजे काय असते.... सुहास

क्रान्ति,तुझ्यावर खरोखरंच सरस्वती प्रसन्न आहे. अतिशय सुंदर आणि प्रासादिक रचना. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

In reply to by प्रमोद देव

अगदी सहमत आहे. मुख्य म्हणजे हे मत स्वतः देवबाप्पांनी दिले आहे :) º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

सुंदर रचना !!! भावभक्ती वाळवंट, मंदिर हे अंतरंग वृत्ति वाहे चंद्रभागा, तिथे वसे पांडुरंग जड देहाचे हे भोग केले त्यालाच अर्पण ...सुरेख