Skip to main content

! पांडुरंग !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 29/06/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली बघा पंढरीची वारी भेट उराउरी पांडुरंग ! आनंद सोहळा क्षण हा विरळा सौभाग्याचा मेळा पांडुरंग ! सगुण निर्गुण दोहोंचे मिलन मन वा "नमन" पांडुरंग काय माझे नाव काय माझे गाव मला फक्त ठाव पांडुरंग ! जाहलो निशब्द थांबले भजन नाद सनातन पांडुरंग ! चाललो चाललो आता नाही येणे श्वासांचे थांबणे पांडुरंग !
लेखनविषय:

वाचने 3877
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अप्रतिम प्रासादिक रचना! सगुण निर्गुण दोहोंचे मिलन मन वा "नमन" पांडुरंग काय माझे नाव काय माझे गाव मला फक्त ठाव पांडुरंग ! वारक-यांच्या मनःस्थितीचे अत्यंत समर्पक वर्णन! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

सहजसुंदर रचना! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

आनंद सोहळा क्षण हा विरळा सौभाग्याचा मेळा पांडुरंग ! अप्रतिम.. "बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठ्ल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की, जय"... :)

सुरेख ! विठुरंगी रंगलो, अवघे विठुची जाहलो ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223

काय माझे नाव काय माझे गाव मला फक्त ठाव पांडुरंग ! व्वा. सुरेख. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

वा! सुंदर रचना... -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)