Skip to main content

पडसे

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 25/06/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
दबस्कार बित्रादो पावसाळा आला हा हबखास सर्दीचा सीझद. आता कुडाला सर्दी जाली त्याचे दाक हमखास चोद्दते.दाक असे बद्द झाले की पच्चाइत होते. सर्दी झालेल्या दाकादे काहिही बोलले तरी त्याचे कै च्या कै ऐकले जाते. बघादा आता बला जदातले बदातले असे भडायचे होते.पड ते ऐकु येतादाच विचित्र ऐकु येते. पावसातली सहल भडली की बला त्या दत्तरचे दोद तीद दिवस असेच बोलावे लागते. सगळी सादुदासीक व्यज्ज्दे अशी बदबदीत होउद जातात बग ठरवतो की बोलतदा सादुदासीक शब्द टाळूद बोलायचे बी असेच एक दिवस भरपूर पावसात कोकडात गेलो होतो. गुहागरला. चिपळूडहूद रत्दागिरी रस्त्यादे द जाता आत जायचे . बस्त वळदावळदाचा रस्ता येतो काजू फडस आब्बे हे सगळे पावसात गायब झालेले असते. रस्ता बस्त हिरवागार असतो बधुदच छाद धुके असते. धुक्याचा झीरीझीरीत पडदा काप आपड जात असतो सभोवताली दिसर्गादे हिरवीगार चादर अत्थरलेली असते. लाल बातीचा रग्ग शेवाळी लाल झालेला असतो. अशा धुक्यात गाडी थाब्बवून एखाद्या टपरीवर आल्याचा/ गवती चाह घालुद केलेला चहा.....आहाहाहा स्वर्गीय सूख असते ते तर काय भडत होतो . आभी असे जात होतो. वळडाचा रस्ता होता. सर्वत्र दिसरडे झालेले होते. अशातच आमच्या गाडीच्या ड्राव्हरला काहितरी दिसले. कोडीतरी भर पावसात रस्त्या बधोबद उभे राहूद गाडी थब्बवत होता. कर्र् कच्च ब्रेक दाबत ड्रायव्हरदे गाडी थाब्बवली. काचेआडूद दीट दिसत धवते. तरीपड ती कोडीतरी बहीला असावे असे वाटले. गाडीची काच खाली घेतली रेदकोट डोक्यावर, कादटोपी घातलेली , चेहेरा गच्च भीजलेला अशी एक लहाद मुलगी होती ती. तीला धड बोलताही येत धवते. खूप घाबरली होती ती. दुसत्या धापा टाकत होती ( क्रबशः)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4297
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मकवास लेख... ;) डोक्याची बंडई झाली वाचून ... ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

In reply to by विंजिनेर

आदरणीय विजीनेर साहेब रावसाहेबजी. तुमची प्रतिक्रीया वाचली. लेखातली भाषेची गम्मत तुम्हाला समजलेली दिसत नाही एखादी प्रतिक्रीया नेगेटीव्ह आली की पुढच्या तशाच लिहायच्या अशी सध्याची फॅशन दिसते मिपावर. असो. लेख म्हणून ते फार काही ग्रेट नाही . फक्त त्यातली भाषेचीगम्मत आपल्या आकलनापलीकडची असेल हे मी ध्यानात घेउ शकलो नाही पण एकूणच तुमची प्रतिक्रीया ही मला मुद्दा न समजून घेताच धोपटण्याचा हा प्रकार वाटतो. असो. अवांतरः आपल्या सारख्या महान आदरणीय सातत्याने आषयगर्भ प्रतीसाद लिहिणार्‍या महामहीम थोर लेखकाने कधी मिपावर किंवा इतरत्र एखादा आषयघन लेखन काव्य वगैरे कधी प्रकाशीत केले आहे?

In reply to by विजुभाऊ

तुमची प्रतिक्रीया वाचली.
धन्यवाद... अतिअवांतर : आता अवांतर प्रतिक्रिया नोंदवयाला हरकत नसावी....
आपल्या सारख्या महान आदरणीय सातत्याने आषयगर्भ प्रतीसाद लिहिणार्‍या महामहीम थोर लेखकाने
कस्चं कस्चं... मला माझं नावसुद्धा धड एका भाशेत (की भाषेत? ;) शब्द बरोबर आहे ना?) नीट लिहिता येत नाही. तेव्हा मी अडाणीच.
कधी मिपावर किंवा इतरत्र एखादा आषयघन लेखन काव्य वगैरे कधी प्रकाशीत केले आहे
हा काय जुलुमाचा राम राम आहे? एखादा लेख बकवास आहे म्ह्टले की टाक आषयघन लेखाचे सर्टिपिकीट.. असो. आपल्या प्रतिक्रिया अशाच दिलखुलास असतात कुणाला पटल्या तर घ्याव्यात नाही तर द्याव्या सोडून. ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

ए क अ क्ष र क ळ ल अ स ल त र श प थ सुहास आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे, काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर, उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे, कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे, मधे अडल्यास इश्वरास विनवायचे.. सौजन्य : जागुताई...

=)) =)) लेखाची कल्पदा बस्त. खराटा (रंग माझा वेगळा)

पडसे झाल्यावर बोलणे सानुनासिक तर टंकणे बोबडे होते, असे दिसते! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बजेदार कल्पना :) पण लहानसे स्फुट म्हणूनच ठीक..तुम्ही क्रमशः गोष्ट लिहिणार आहत काय !.. पाहू पुढच्या भागात छोटी मुलगी किती शिंकते ते :) (ह. घ्या.) पडसे म्हणजे नक्की सर्दी की खोकला? मला पडसे म्हणजे खोकला असे वाटत होते. माझा काही गोंधळ होत असावा. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

In reply to by लिखाळ

तू वाचलास का? मी नाही वाचला. सर्दी झाली आहे, वर घसाही बसला आहे, कसं वाचणार??

In reply to by लिखाळ

तू लेख वाचलास का? मी नाही वाचला. सर्दी झाली आहे, वर घसाही बसला आहे, कसं वाचणार?? (फारच सर्दी झाली आहे दिसतंय!)

थद्या थरदी धाली म्हनुन फरतिकिरया न्हंथर धेईन. --अवलिया

In reply to by अवलिया

थद्या थरदी धाली म्हनुन फरतिकिरया न्हंथर धेईन. अथेच बंन्तो!

हे काय भणायच्च भौ? आज असा का लेख लिहिलाय? तुबाला इतकी सड्दी जालीए का? अहो, बग विक्स अ‍ॅक्शन घ्या दा! (सुर्रर्रर्रर्रर्रर्र...... [गळकं नाक ओढल्याचा आवाज!] ) दे जाऊद्या, आता दुभ्ही ह्या भाषेत आख्खी लेखबाला टाकडाड का? बेलो!!!!! बी टोट्टल गड्डणाड आता :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

इजुभौ तुम्हाला पडसे झाले आहे का किबोर्ड ला ? ;) एकुणच लेखाचा प्रकार नविन आणी मजेशीर. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

लिखाळशी सहमत आहे. छोटेखानी लेख म्हणूनच ठीक आहे. क्रमशः करून आता अख्ख्या मिपाला सर्दीची लागण नका देऊ. :) पहिला पॅरा वाचेपर्यंत गंमत वाटत होती पण शेवटपर्यंत वाचताना कंटाळा आला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पूर्ण लेख तोंडाने वाचला तेव्हा जामच मजा आली