दबस्कार बित्रादो
पावसाळा आला हा हबखास सर्दीचा सीझद.
आता कुडाला सर्दी जाली त्याचे दाक हमखास चोद्दते.दाक असे बद्द झाले की पच्चाइत होते.
सर्दी झालेल्या दाकादे काहिही बोलले तरी त्याचे कै च्या कै ऐकले जाते.
बघादा आता बला जदातले बदातले असे भडायचे होते.पड ते ऐकु येतादाच विचित्र ऐकु येते.
पावसातली सहल भडली की बला त्या दत्तरचे दोद तीद दिवस असेच बोलावे लागते. सगळी सादुदासीक व्यज्ज्दे अशी बदबदीत होउद जातात
बग ठरवतो की बोलतदा सादुदासीक शब्द टाळूद बोलायचे
बी असेच एक दिवस भरपूर पावसात कोकडात गेलो होतो.
गुहागरला. चिपळूडहूद रत्दागिरी रस्त्यादे द जाता आत जायचे .
बस्त वळदावळदाचा रस्ता येतो काजू फडस आब्बे हे सगळे पावसात गायब झालेले असते. रस्ता बस्त हिरवागार असतो
बधुदच छाद धुके असते. धुक्याचा झीरीझीरीत पडदा काप आपड जात असतो सभोवताली दिसर्गादे हिरवीगार चादर अत्थरलेली असते. लाल बातीचा रग्ग शेवाळी लाल झालेला असतो. अशा धुक्यात गाडी थाब्बवून एखाद्या टपरीवर आल्याचा/ गवती चाह घालुद केलेला चहा.....आहाहाहा स्वर्गीय सूख असते ते
तर काय भडत होतो . आभी असे जात होतो.
वळडाचा रस्ता होता. सर्वत्र दिसरडे झालेले होते.
अशातच आमच्या गाडीच्या ड्राव्हरला काहितरी दिसले. कोडीतरी भर पावसात रस्त्या बधोबद उभे राहूद गाडी थब्बवत होता.
कर्र् कच्च ब्रेक दाबत ड्रायव्हरदे गाडी थाब्बवली.
काचेआडूद दीट दिसत धवते. तरीपड ती कोडीतरी बहीला असावे असे वाटले.
गाडीची काच खाली घेतली
रेदकोट डोक्यावर, कादटोपी घातलेली , चेहेरा गच्च भीजलेला अशी एक लहाद मुलगी होती ती.
तीला धड बोलताही येत धवते.
खूप घाबरली होती ती. दुसत्या धापा टाकत होती
( क्रबशः)
वाचने
4297
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँक्छी....
आदरणीय
In reply to आँक्छी.... by विंजिनेर
तुमची
In reply to आदरणीय by विजुभाऊ
ए क अ क्ष र क ळ ल अ स ल त र श प थ
लेखाची
पडसे झाल्याची लक्षणे..
बजेदार
तू वाचलास
In reply to बजेदार by लिखाळ
तू लेख
In reply to बजेदार by लिखाळ
थद्या थरदी
थहमत!
In reply to थद्या थरदी by अवलिया
च्याबारी!
इजुभौ
लिखाळशी
सर्दी