रेवं मध्ये (आमच्या येथील सुपरमार्केट) मोठ्या मोठ्या फुसिलोनी (पास्त्याचा एक प्रकार)दिसल्या म्हणून घेतल्या. त्या पाकिटावर लिहिलेली रेसिपी आणि खरं म्हणजे त्या पाककृतीचे 'अल झिंगारा' हे नाव वाचून काहीतरी झिंग्यांचा प्रकार दिसतो आहे असे वाटले. जेव्हा कृती पूर्ण वाचली तेव्हा झिंग्यांचा आणि झिंगार्याचा काही संबंध नाहीये ते समजलं पण त्यांनी लिहिल्याप्रमाणे पाककृती करायची हुक्की आली. तीच ही रेशिपी -
साहित्य : फुसिलोनी पास्ता- २५० ग्राम,१ मध्यम कांदा,३,४ लसूण पाकळ्या(३,४ लसणीच्या नव्हे), १ लाल आणि १ पिवळी सिमला मिरची, ५,६ ऑलिव्हज, १ ते १.५ चमचा मिरपूड, मीठ चवीनुसार, २ चमचे ऑलिव ऑइल, १मूठभर मटार दाणे, १ हिरवी मिरची
( ही आमची देसी अॅडिशन)
कृती : पाणी उकळत ठेवा, त्यात चमचाभर मीठ घाला. आधण आले की पास्ता त्यात घाला आणि शिजवा. शिजल्यावर चाळणीवर टाकून पाणी काढून टाका आणि निथळत ठेवा.
कांदा उभा,लांब चिरा, लाल,पिवळी सिमला मिरची लांबट चिरा, लसणीच्या पाकळ्या बारीक चिरा, मिरची बारीक चिरा.ऑलिव्हज बारीक चिरा.
एका कढईत ऑलिव ऑइल ( उपलब्ध नसेल तर गोडेतेल) गरम करा. त्यावर कांदा टाकून परता, नंतर लाल,पिवळी मिरची घालून परता, मटार,ऑलिव्हज,हिरवी मिरची ,लसूण घालून परता, भाजी शिजली की त्यात चाळणीत निथळत ठेवलेला पास्ता घाला आणि परता. मीरपूड व मीठ घाला आणि परता.
अल झिंगारा तयार आहे. गरम गरम खा!
फुसिलोनी पास्ता उपलब्ध नसेल तर पेन्नं किवा फार्फलं किवा जो उपलब्ध असेल त्या प्रकारचा पास्ता वापरुन अल झिंगारा करता येईल.

वाचने
7951
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम डिश जाहिराती साठी बनवले सारखी दिसते.
मस्तच.
मला पास्ता
झिंगाराला, झिगाराला
भारी आहे.
अगं हा
वेगळे..
In reply to अगं हा by शाल्मली
पाककृती ..
अर्रे
राप्चिक.........!!
राप्चिक.........!!
सोप्पा
मस्त
नेहमीच
वाह..
वोवोवोवोवोवो
मस्त!
धाग्याचे
स्वातीताई,
माताय!
खुपच मस्त
जिप्सी पाककृती
अरेच्या, हे भारीच आहे!
In reply to जिप्सी पाककृती by धनंजय
पास्त्यात
In reply to अरेच्या, हे भारीच आहे! by चतुरंग
धनंजय, मी
In reply to जिप्सी पाककृती by धनंजय
रोझमेरी, ओरेगनो
In reply to धनंजय, मी by भाग्यश्री
छान आहे ग पास्ता !!
सोप्पंय!!!
छान फोटो
व्हाईट सॉस घालून बेक
धन्यवाद