Skip to main content

अल झिंगारा

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 23/06/2009 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
रेवं मध्ये (आमच्या येथील सुपरमार्केट) मोठ्या मोठ्या फुसिलोनी (पास्त्याचा एक प्रकार)दिसल्या म्हणून घेतल्या. त्या पाकिटावर लिहिलेली रेसिपी आणि खरं म्हणजे त्या पाककृतीचे 'अल झिंगारा' हे नाव वाचून काहीतरी झिंग्यांचा प्रकार दिसतो आहे असे वाटले. जेव्हा कृती पूर्ण वाचली तेव्हा झिंग्यांचा आणि झिंगार्‍याचा काही संबंध नाहीये ते समजलं पण त्यांनी लिहिल्याप्रमाणे पाककृती करायची हुक्की आली. तीच ही रेशिपी - साहित्य : फुसिलोनी पास्ता- २५० ग्राम,१ मध्यम कांदा,३,४ लसूण पाकळ्या(३,४ लसणीच्या नव्हे), १ लाल आणि १ पिवळी सिमला मिरची, ५,६ ऑलिव्हज, १ ते १.५ चमचा मिरपूड, मीठ चवीनुसार, २ चमचे ऑलिव ऑइल, १मूठभर मटार दाणे, १ हिरवी मिरची ( ही आमची देसी अ‍ॅडिशन) कृती : पाणी उकळत ठेवा, त्यात चमचाभर मीठ घाला. आधण आले की पास्ता त्यात घाला आणि शिजवा. शिजल्यावर चाळणीवर टाकून पाणी काढून टाका आणि निथळत ठेवा. कांदा उभा,लांब चिरा, लाल,पिवळी सिमला मिरची लांबट चिरा, लसणीच्या पाकळ्या बारीक चिरा, मिरची बारीक चिरा.ऑलिव्हज बारीक चिरा. एका कढईत ऑलिव ऑइल ( उपलब्ध नसेल तर गोडेतेल) गरम करा. त्यावर कांदा टाकून परता, नंतर लाल,पिवळी मिरची घालून परता, मटार,ऑलिव्हज,हिरवी मिरची ,लसूण घालून परता, भाजी शिजली की त्यात चाळणीत निथळत ठेवलेला पास्ता घाला आणि परता. मीरपूड व मीठ घाला आणि परता.
अल झिंगारा तयार आहे. गरम गरम खा!
फुसिलोनी पास्ता उपलब्ध नसेल तर पेन्नं किवा फार्फलं किवा जो उपलब्ध असेल त्या प्रकारचा पास्ता वापरुन अल झिंगारा करता येईल.

वाचने 7951
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

=P~ मला पास्ता खुप आवड्तो. चुचु

तेवढे मश्रुम दिसत नाही. बाजुला चिकन/फिश, एखादा ग्लास वाईन. मस्तच की.

अगं हा पदार्थ मी नेहमी करते. अगदी असाच, फक्त गोडं तेल वापरते आणि ऑलिव्हज कधी घातले नव्हते. पण याला 'अल झिंगारा' वगैरे असं काही म्हणतात हे माहितच नव्हतं. आणि त्या पाकिटावरची कृती वाचायचे कष्टही कधी घेतले नव्हते.. (मी याला हक्का नुडल्स तसं 'हक्का पास्ता' असं नाव ठेवलं होतं ;)) मी यात थोडा चिली सॉस आणि सोया सॉसही घालते. फोटो मस्तच! --शाल्मली.

In reply to by शाल्मली

वेगवेगळ्या प्रकारच्या पास्त्याच्या वेगवेगळ्या प्रकारे न्यूडल्स बनवू शकतो. पास्ता प्रकारांवरील पाकिटावर सॉस च्या विविध कृती लिहिलेल्या असतात. हक्का न्यूडल्स सारख्या न्यूडल्स बनवायला स्पागेटी घ्यायची. त्यात सिमला मिरच्यांबरोबर गाजर,फरसबी,कोबी,मटार,मके इ. भाज्याही घालायच्या. सोया,चिली सॉस घालायचे आणि चिनी फ्लेवर द्यायचा. ह्यात ऑलिव्ह्ज, ऑलिव्ह ऑइल वापरुन इटालियन फ्लेवर येतो. स्वाती

अर्रे वा! अल झिंगारा सह्हीच! :) आपला, अल तात्या.

;) झक्कास दिसतय............!! १ नम्बर तुच आहेस.............. B)

;) झक्कास दिसतय............!! १ नम्बर तुच आहेस.............. B)

सोप्पा प्रकार आहे की! करून बघीन येत्या दिनेक दिवसात! फोटूपण छान आलाय. रेवती

फोटोवरून पाकृ जबरा दिसते आहे. खाऊन पहायला हवी. अवांतर - पास्त्याच्या वेगवेगळ्या आकारावरून त्यांना वेगवेगळी नावे ठेवणारे इटालियन रसिक खरे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नेहमीच करते मी. नाव आज समजलं. फोटो सह्ही. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटलं...!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

~!~!~!~!~!~ यप यप यप यप यप ~!~!~!~!~!~ स्वाती ताई ... जर्मणीचं टिकीट काय आहे हो ?

सुरेख पाकृ आणि फोटो. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

धाग्याचे नाव वाचले तेव्हा वाटले कि अतिरेकी संघटना बनविण्याची पाकृ आहे का काय म्हणुन. ;) असो, फोटु आणी पाकृ दोन्ही मस्तच. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सह्हीच पास्ता! नावही कसलं खतरा आहे 'अल झिंगारा'!! वा!!! :) (टुन्न)चतुरंग

एकदम रंगीत डिश आहे, पॉटलक ला नेऊन इम्प्रेशन मारायला मस्त डिश आहे. :D दिपाली :)

नाव बघून गंमत वाटली. "आल्ला ज़िंगारा" म्हणजे "जिप्सी पद्धतीने" असा अर्थ असावा. पाककृतीचे पूर्ण नाव "आंतिपास्तो आल्ला ज़िंगारा" असे असावे. पाकृ छानच. तशी सौम्य वाटते. (म्हणजे मसाले असे कुठले नाहीत. चव येणार ती कांदे-लसणीने. मिरी-मिरचीने तिखटपणा येईल पण लज्जतदार सुवास हा फारसा येणार नाही.) उत्तम प्रकारचे ऑलिव्हचे तेल वापरूनच करावी असे वाटते - म्हणजे त्याचा फुलांसारखा सुवास दरवळेल. अशा नाजूक सुवासाला सौम्यपणाच बरा. बारीक चिरलेला "ओरेगानो" टाकून पाकृ कशी लागते बघितले पाहिजे.

In reply to by धनंजय

मला गुगलोबाने हा धागा दाखवलान! पण त्यात फक्त ढब्बू मिरची, बटन मश्रूम्स, ऑलिव्स आणि केपर्स आहेत. पास्त्याचा उल्लेख दिसला नाही. (गुगली)चतुरंग

In reply to by धनंजय

धनंजय, मी जवळपास याच पद्धतीने पास्ता केला होता.. ऑलिव्ह ऑईल, ओरेगानो, रोझमेरी, बेसिल टाकून.. सही होतो तो प्रकारसुद्धा.. http://www.bhagyashree.co.cc/

मी आजच खाल्ला पास्ता ईटालिय्न रेस्टॉरंट मधे.. त्यात प्रॉन्स घातले होते.. मी एकदा घरी पण बनवुन पाहीला... हा बघ फोटो.. यात पास्ता पण होममेड आहे.. :-)

आयला, हे जमण्यासारखं आहे. फार काही शॉट नाहीये डोक्याला. ट्राय करतो. फोटो वगैरे नेहमीप्रमाणेच झक्कास. बिपिन कार्यकर्ते

फोटोवरून छान वाटतिये डिश . फोटो जबरा आला आहे. पण बाकी कॄतिवरून जरा मिळमिळीत वाटतिये डिश. त्यात चिझ आणि पास्ता सॉसच नाहिये. पास्त्यात चिझ नसेल तर असा नुस्ता मैद्याचा पास्ता मला तरी खाल्ल्या जाणार नाही.

मलाही नाही जमत पास्ता नुसताच, मी त्यात व्हाईट सॉस घालून वर किसलेले चीज पेरुन बेक करते. कॅलरीज वाढतात... महिन्यातून एकदा करायला हरकत नाही! स्वातीताई, आमच्याकडे ही डिश Zigeunerpasta अशी रेस्टॉरंटमध्ये असते. किसलेले चीज वेगळे सर्व करतात, लागल्यास मिसळून घ्यायचं.

सर्व खवय्यांना मनापासून धन्यवाद, चिझ + पास्ता आवडणार्‍यांसाठी एक स्पेशल डिश इथे पहा, :) भाग्यश्री,धनंजय, रोझमेरी,ओरेगानो आणि बेसल घालून पुढच्या वेळी करुन पाहिन, नक्कीच छान चव येत असेल. आंतिपास्तो आल्ला ज़िंगारा- आंतिपास्तो मध्ये चपटा पास्ता वापरतात ,येथे त्याला बांडन्यूडल्स म्हणतात. ह्यात फुसिलोनी वापरल्या आहेत. स्वाती