-: माझे कौलारू घर :-
खाली आहे हिरवळ हिरवी
दोन बाजूंनी डोंगर कडे
उंच बघावे आभाळ निळे
सोनेरी सुर्यकिरण त्यातून पडे ||
घाट सोपा लांब चढा
किंवा डोंगर चढा छोटा वाकडा
दिसेल खाली तलाव नितळ
आणि़क बाजूस सुबक देवूळ ||
खळखळ खळखळ वाहे झरा
वाट आपली पुढे सावध उतरा
चला पुढे चला, हे आहे चिंचबन
थकला तर थांबा थोडे, जीरेल सगळा शिण ||
ती खालची, ती मधली आळी
पाटील गाल्ली अन मोठी आळी आहे ती वर
आता आहे थोडा उतार
त्यानंतर दिसेल तुम्हां माझे कौलारू घर ||
- पाषाणभेद
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3742
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
घर आवडले...
धन्यवाद
In reply to घर आवडले... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
सुरेख घर!
क्या बात है !
माझ्या आईच्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती...
माधव ज्युलीयनांच्या कवितेची आठवण झाली.
छान