रामराम्स .. रामराम्स !! (णको .. णमस्कार्स लै बोर झालं)
काल बराच पाउस झाला नै ? लाईटही गेली .. करायला काही नव्हतं .. धम्याची धमी देखील नव्हती घरी .. त्यामुळे धम्या जाम पकला होता ... सगळी कामं हातानी करावी लागत होती .. किमान जेवणाचं तरी बाहेर होईल ह्या आशेनं त्याने कट्टा आयोजित केला .. (उसातनं आलेले) सुर्य .. मी .. आणि धम्या .. आणि जर खरडवह्या उचकण्यातून वेळ भेटला तर पर्या येणार होता ...
लाईट गेल्यामुळे आपला लॅपटॉप वर "नाईट ट्रेन" नावाचा "के व ळ अ प्र ति म" मिस्ट्रीपट पहात होतो .. सहाला धम्याचा फोन वाजला .... म्हंटलं आता निघायला हवं .. साडेसहाला निघालो .... पावसाची रिपरिप होती .. हळू हळू मजल दरमजल करत अपाचे गाठला .. आता एफ.सी. ला दोन आपाचे आहेत ... मी ज्ञानेश्वर पादूका चौकातल्या अपाचे समोर थांबुन फोन फिरवला ... धम्या मेल्या... आहेस कुठे .. बाहेर ये ". ...धम्या "#@($($(#$ , आत ये ना भो " म्हंटलं चोच्या दोन अपाचे आहेत .. कोणत्या अपाचेत ? म्हणे एफ.सी.च्या गेट समोरचं .. आता एफ.सी. ला २ गेट्स .. आणि माझ्या समोरही एक गेट होतं .. "बाहेर ये भाड्या" .. तेवढ्यात कोणी तरी खजुरछाप जाड्या फोनवर बाहेर निघाला .. म्हंतलं .. च्यामारी .. धम्यानं दोनेक महिन्यात चांगलंच वजन वाढवलंय की :) .... तो धम्या नाही हे पाहून बरं वाटलं .. "दुसर्या आपाचे लाया" अशी आज्ञा झाली .. गेलो ..
आत गेल्यावर अपाचेचं "या ढिंगचॅक ढिंग" म्यूझिक कानफाडत होतं ...
गेल्यागेल्या आधी त्यांची तोंड न पहाता माझं ध्यान इकडं गेलं !
पिणारे पिओ .. आम्ही आपले चिकनचापू
धम्या न सुर्या ला ओळखला .. पण बाकीचे दोन समान एज गृप मधलं पब्लिक कोण ? ते काही कळालं नाही ... त्यांनी त्यांची खरी नावं सांगितली .. म्हंटलं .. वक्के .. असतील हे आय.डी.ज .. काय महीत बा .. खरडींतून "मराठमोळा" ह्याणे देखील हजेरी लावण्याचा मनसुबा दाखवला होता .. धम्याला म्हंटलं आर्रे तो मराठमोळा ............... तेवढ्यात एकाने .. अर्रे मी .. मीच "मराठमोळा" ... मी जिभ चावली .. म्हंटलं लेका बरा आत्ताच बोलला .. नाय तर आख्खी रात्र तुझ्या नावाचे उपप्रकार ऐकावे लागले असते .. एकच हशा ... तिकडून स्वास(सुहास) म्हणाला .. हे "मला पण लागू होतं बरं " म्हंटलं .. च्यायला पब्लिक फारंच हुशार आहे ... प्रभु मास्तरच्या "पालकांना आवाहन"च्या झेरॉक्स काढून एरियात चिटकवायला निघालेले हेच ते धडाडीचे "मनसे कार्यकर्ते"
वा म्हंटलं .. बा .. तुम्हा दोघांचा एक कंपु ना !! साल्यानो .. डाव्यांची आणि विरोधी कंपुची बैठक .. आणि तिकडे बसलेला तो स्थितप्रज्ञ .. "सुर्य" एकदम हॉलीवूड ष्टाईल गॉगल्स बिगल्स घालून ...
सुर्य आणि मराठमोळा
सुहास आणि सुर्य
औपचारिकता केवळ काही सेकंदं होती .. मराठमोळ्याच्या लिखाणाच्या स्टायलीवरून मला तो "कलंत्री" वाटला होता .. म्हंटलं कोणी चाळीशीचा अतिशय चिकट विचारांचा खडूस माणूस असेल .. पण आपल्याबरोबरचं असून आसले दिवटे धंदे करतो मिपावर पाहून गंमत वाटली ..... सगळे बेवडाज किंगफिशर पित होते .. माझा ही घसा सुकला ...
मग राजकुमार सारखा करड्या आवाजात घसा खाचवत मी वेटर ला म्हणालो .. "वेटर्र्र ... एक थम्स अप लाना .. वो भी .. ऑन द रॉक्स .. " वेटर थोडा हँगला .. आणि निघून गेला .. समोर चिकन लॉलीपॉपची 'केवळ अप्रतिम' डिश होती .. मला थोडं हायसं वाटलं .. समोर आलेल्या चिकन ला कधी नाही म्हणू नये .. मी न विचारता प्लेट ओढली ..
पब्लिक पिण्यात .. आणि मी खाण्यात दंग :)
एकेक टॉपीक निघत होते .. आणि हशांचे फवारे उडत होते .. अत्यंत मंत्रमुग्ध असे ते वातावरण होते ते. मी तर हरवूनच गेलो होतो. एवढ्या मोठ्या विचारवंतांत मी असा बसलो होतो !! सुख सुख म्हणजे ते नक्की काय ? बाकी सगळे हरपुन दारू पिण्यात मग्न आहेत .. आणि मी ही एकटक चिकन तोडत त्यांच्या सहवासाचा आणंद घेतोय .. आहाहा .. अजुन काय हवे ? जिवनातले हे क्षण माझ्या "मनाच्या कुपीत" साठवले गेले ते अगदी अलगदंच .. ( नाही .. नाही .. घाबरू नका मिपा कट्टा निबंध नाही लिहीत .. आपल्या दादांची आठवण झाल्याचा परिणाम आहे :) सदर पॅरा दादांना अर्पण . .
लोकं एकामागुन एक बियर्स ऑर्डर करत होती ... आणि मी आपला एकामागुन एक प्लेट खाली करत होतो ..
स्वास बिचारा बियर बरोबर कांदा खाच बसला ... थोडक्यात मिपावरचे कंपुभेद विसरून सगळे एक झाले होते ...
खाता खाता आणि गप्पा झोडता झोडता साडे नऊ वाजून गेले .. कळ्ळंच नाही .. मग पर्याला फोनवन्यात आल ... धमक्या दिल्यावर येतो म्हणाला .. धम्यानेही मनिश ला बोलवून घेतला ... पर्या आल्यावर गप्पांचा वेग वाढला .. पर्या आल्या आल्या गप्प्पांचा वेग वाढला .. आधी वैयक्तिक चाललेल्या गप्पा मिसळपाव आणि मिपाकरांवर येउन सुरू झाल्या ... हो नाही हो नाही करत केवळ "जॉनी वॉकर" पिणारे पराभौ .. किंगफिशरला तोंड लावायला तयार झाले .. एक घोट घेतल्या नंतर "बाझवला तिच्यामायला " चा जयघोष सुरू झाला ... काहीही झालं की "बाझवला तिच्यामायला " ... मग पर्यानं कोणाकोणाच्या खरडवह्यांत कोण कोण गुट्टूरगु करतं त्याची पोल खोलली ... णाणा पासून "ली" आणि "नी" घराण्यापर्यंत चर्चा झाल्या... ह्याचा हा व्यासंग पाहून मी आपला गप ऐकत राहिलो .. "बाझवला तिच्यामायला " .... गप्पांचा ओघ ओसरता ओसरत नव्हता ... कोणी एक मिणीटही बोर झालं नाही ..
दारू पितांना धम्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती .. ते पहा
सात जणांचा हा मिणी कट्टा "विदाऊट गाजावाजा" साजरा झाला .... मात्र ह्या सगळ्यात आपल्या सगळ्यांचे लाडके "तात्या अभ्यंकर उर्फ मालक उर्फ विसोबा खेचर" ह्यांना फोन करण्याचा विसर झाला नाही ...
हार्ड रॉकच्या म्युझिक मधे समोरच्याचं बोलणं ऐकून येणं अवघड होतं .. इथे मी चक्क "तात्याला फोन लावला होता .. .. हे "लिसनिंग स्किल्स" च्या टेस्ट पेक्षा काही वेगळं नसावं .. तात्याशी जेवढं बोललो त्यापैकी १०% कळलं असावं "कट्ट्याचे फोटो टाक ... हे मात्र पुर्ण कळालं .. .. पण मी ही इकडून काही तरी बोलत होतो .. आणि तात्याही काहीतरी बोलत होते .. शेवटी "टाटा गुडबाय" करून तात्यांचे आशिर्वाद घेऊन कट्टा सुरू राहिला ... सुर्य साहेबाला स्टेटस कॉल आला .. त्याला क्लबाच्या बाहेर जाऊन स्टेटस देणं प्राप्त होतं .. धम्याचं ही सेमच .. मराठमोळा,स्वास्,पर्या आणि टार्या ,मणिश्,धम्या आणि सुर्य ...
एक मस्त संध्याकाळ गेली .. पिण्याचा कार्यक्रम संपल्यावर शिवाजीनगर बस स्थानकाकडे जेवणासाठी मोर्चा वळला .. सुर्य ला अधिक थांबणं शक्य नसल्याने तो घरी पळाला .. आणि आम्ही पण जेवणं करून रात्री दिड वाजता पांगलो ..
काही क्षणचित्र : बाकी क्लिक करून पिकासावर जाउन पहावीत :)
भोचक सम्राट परा
आणि पार्टी संपल्यावर .. सगळी गँग एकसाथ
परा,धम्या, टारझन,मागे मराठमोळा, मनिष,मागे सुर्य, आणि उजवीकडे सुहास
मिसळपाव झिंदाबाद
टिप : सगळ्यांनी चोचेपणा करून मला लेख लिहायला लावलाय .. त्यांनी पण ह्यात भर घालायची आहे म्हणून बर्याच जागा रिकाम्या ठेवल्यात ...
जाता जाता : डावे पक्ष मराठमोळा आणि सुहास .. ह्यांना कट्टा झाल्याने मिपावर "तुम्हाला आणि डाव्यांना सोडण्यात येणार नाही " अशी धमकीवजा सुचणा देण्यात आली आहे ;)
प्रतिक्रिया
मस्त !
शुद्धलेखन
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>सगळं
In reply to शुद्धलेखन by टारझन
कट्ट्याची क्षणचित्रे........
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तच कट्टा जमला होता.
पराचे जरा
वय नाय झाले रे पर्याचे....
In reply to पराचे जरा by बाकरवडी
हॅहॅहॅ
सगळी
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
वा! मस्त
वा कट्टा
In reply to वा! मस्त by अवलिया
अच्छा...
चूतमारिच्
बाझवला
In reply to चूतमारिच् by विसोबा खेचर
णिशेद
कट्ट्यात सहभागी सर्वांचा निषेध!
In reply to णिशेद by प्रसन्न केसकर
छान फोटोस आहे!!:)
अगं बाई...
In reply to छान फोटोस आहे!!:) by जेन
+१
In reply to अगं बाई... by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+३
In reply to +२ by श्रावण मोडक
+४
In reply to +३ by अवलिया
मह्त्वाचा खुलासा..
In reply to छान फोटोस आहे!!:) by जेन
चार थेंब...
हे उगाच
In reply to चार थेंब... by बिपिन कार्यकर्ते
मस्त
मराठमोळा
In reply to मस्त by मराठमोळा
मारा लेको..
In reply to मस्त by मराठमोळा
आणी हे काय
चांगलय.
एकंदर दंगा
कट्टा झकास
वा!
एकंदरीत
मस्त रे ....
वा वा वा
णीषेध !!!!!
अरेरेरेरे..