Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अनामिक on Wed, 05/27/2009 - 09:32
  • Log in or register to post comments
  • 23900 views

प्रतिक्रिया

Submitted by पर्नल नेने मराठे on Wed, 05/27/2009 - 09:50

Permalink

मस्तच !! मी

मस्तच !! मी पण नॉस्टॅल्जीक झाले. चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by सायली पानसे on गुरुवार, 06/18/2009 - 09:50

In reply to मस्तच !! मी by पर्नल नेने मराठे

Permalink

+१ मस्तच!

एकदम मस्त.. जुन्या आठवणि ताज्या झाल्या.... मस्तच लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by सायली पानसे on गुरुवार, 06/18/2009 - 09:54

In reply to मस्तच !! मी by पर्नल नेने मराठे

Permalink

+१

मस्तच लेख.... एकदम जुने दिवस डोळ्यासमोर आले..
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 05/28/2009 - 07:53

Permalink

सुपर्ब!!!! का

सुपर्ब!!!! काय सुरेख लिहिलं आहेस रे! पावसाळा मलाही फार फार आवडतो. :) पावसाळ्यात घोळ्क्याने दिसणारा भरपूर पाय असलेला आणि त्या घोळक्यात छोटा खडा टाकला तर भराभर इतरत्र पांगणारा तो सरपटणारा प्राणी म्हणजे पैसाकिडा.. जरा त्याच्याशी खेळलं की ताबडतोन गुंडाळी करून बसतो. पावसांत एक गोष्ट मला आवडते, घरावरच्या पत्र्याच्या पन्हाळीतून गळणारं पाणी.. ते जेव्हा थेंब थेंब गळतं तेव्हा तो थेंब इतका सुंदर दिसतो...! अनामिक लेख खूप आवडला. :) खूप खूप जुन्या आठवणींमध्ये रमले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Fri, 06/19/2009 - 23:21

In reply to सुपर्ब!!!! का by प्राजु

Permalink

असंच

असंच म्हणते..! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 05/28/2009 - 07:55

Permalink

मस्त!

पावसाच्या आठवणींचे बारकावे खूपच आवडले. आणि हे तर अगदी खासच! फुलपाखरांमागे धावता धावता दिवसही कसे भुर्र्कन उडून गेले ते कळलंच नाही. पहिला पाऊस, मातीचा सुगंध, रिमझीम पावसात प्यायलेला वाफाळता चहा किंवा खाल्लेली गरम गरम भजी, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवे हिरवे गार गालिचे तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे. पण एखादा दिवस असा येतो की बाहेर जमलेल्या काळ्या ढगांसारखं, मनातही आभाळ दाटून येतं आणि आठवणींचा पाऊस डोळ्यातून बरसू लागतो. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on गुरुवार, 05/28/2009 - 08:20

Permalink

आवडले

मस्त आहे पाऊस. माझ्या मनातही दाटल्या आठवणी. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on गुरुवार, 05/28/2009 - 09:31

Permalink

सुंदर

सुंदर लिहीले आहे. या दिवसांत या आठवणी येतातच. तो पेट्रोल चा रंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला. बेडकाची ती विशीष्ट आठवण माझीही आठवली :)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 05/28/2009 - 09:51

Permalink

मस्त मस्त मस्त ...

अनामिकराव, लेखाची भट्टी अगदी मस्त जमली आहे. लेख वाचताना वळवाच्या हळुवार पावसात ( उपमा चुकली असल्यास सोडुन द्या, उगीच व्याकरणरुपी शब्दढगांचा गडगडाट करु नका ) फिरल्यासारखे वाटले. लेख आवडला, असेच अजुन येऊद्यात ... ------ ( पावसातला ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 05/28/2009 - 12:45

Permalink

मस्त

पाऊस अजुन आला नाही पण तुमच्या लेखाने ओले केले काही क्षण. :) छानच लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on गुरुवार, 05/28/2009 - 12:52

Permalink

खूपच

छान लिहिले आहे.
पण ह्या दिवसात आम्ही कॉलनीतले मित्र अजून एक खेळ खेळायचो... "खुपसणी"
आम्ही त्याला 'सळी रुपी' म्हणायचो. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 06/18/2009 - 09:00

Permalink

सुंदर लेखन

अनामिक, शाळेय जीवनातील पावसाळ्यांचे मस्त वर्णन केले आहेस. :) पावसाळ्यात शाळेत जाताना वार्‍यामुळे कित्येकदा माझी ही छत्री उलटी झाली आहे तेव्हा खुप राग यायचा पण आता आठवले की हसु येते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 06/18/2009 - 18:52

In reply to सुंदर लेखन by शितल

Permalink

शितलशी

शितलशी सहमत. आणि छत्री उलटी झाल्यावर ती पटकन सरळही होत नाही. तोपर्यंत भिजायला होते......फार राग येतो.;) अनामिक, आपण आम्हालाही नॉस्टॅल्जीक केलेत. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on गुरुवार, 06/18/2009 - 18:10

Permalink

लेख आवडला!!

लेख आवडला!! :) सुरेख आणी जुन्या आठवणी जागवणारा. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 06/18/2009 - 22:04

Permalink

मेल्या

मेल्या अनामिका .. (अनामिका तै नाही बरं ) एवढं भारी लिवतोस ... तर काबरं हाताच्या रेषा मिटवण्यात वेळ घालवतोय .. अजुन लेख येउन देत यार ... लै मजा आला वाचून ... लै लै भारी लेका .. पहिला पाउस एक णंबर्स .. आणि तुझ्या आठवणींतल्या भावणा पोचल्या रं भो
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Fri, 06/19/2009 - 01:14

Permalink

जहबरा...

खुप आठवणी जाग्या झाल्या.... धो धो पावसात मित्रांबरोबर दुचाकीवर भरपुर फिरलो.. ते अनुभव शब्दात नाही देता येणार.. आता इथे पाउस कधिही येतो आणी जातो .. पण काही फरक नाही पडत.. --नॉस्टॅल्जीक टुकुल.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 06/19/2009 - 04:02

Permalink

वा! लई भारी.

वा! लई भारी. आजही पाउस म्हणलं की भिजणे हा नियम मी अजुनही पाळतो. :) पुर्वी एक जाहीरात यायची त्यामध्ये तो "नायक" सगळ विसरुन असाच पावसातं भिजतो, बिनधास्त! तेव्हा तो म्हणजे मीच असं मला वाटायचं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 06/19/2009 - 04:23

Permalink

पावसाच्या आठवणी छानच

पावसाच्या आठवणी छानच लिहिल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चटोरी वैशू on Fri, 06/19/2009 - 12:07

Permalink

निबंध ...

एक ठरलेला निबंध असायचा... पावसाळ्यातील एक दिवस..... : )
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Fri, 06/19/2009 - 19:33

Permalink

हा लेख

हा लेख लिहिल्यानंतर एवढ्या दिवसांनी बर्‍याच प्रतिक्रिया आल्यात हे बघून छान वाटलं. सगळ्यांना मनापासून धन्यवाद! -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 06/19/2009 - 23:27

Permalink

अनामिक, अरे तुझा हा लेख वाचायचा राहून गेला होता!

किती साधं सोपं छान लिहिलं आहेस! मस्तच. आज इथेही पाऊस आहे, तसा काल रात्रीपासूनच झड लावून आहे त्यामुळे तर हे वाचताना काही वेगळंच वाटत होतं. ट्रकमधून लिक झालेल्या ऑइल/पेट्रोलमुळे साचलेल्या पाण्यात तयार होणार्‍या चमकत्या सप्तरंगात स्वतःला हरवून टाकावं वाटायचं! क्या बात है! हे तर मला अजूनही वाटतं. रस्त्यात थांबून थांबून जागोजागची डबकी शोधत जायचो मी लहानपणी की कुठे दिसतंय का असं ऑईल. (मराठी शब्द ट्रेल = माग) (गोगलगाय)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Sat, 06/20/2009 - 12:28

Permalink

लेख खुपच

लेख खुपच आवडला. मागच्या आठवणींत घेउन गेला. तुमच्या सारखाच अ‍ॅन्टीनाचा प्रकार आमचाही होता. आता त्याजागी हलवायला न लागणारी टाटा स्काय ची डिश आली आहे. आमच्या घरातही कधी कधी साप यायचे. मग आजुबाजूच्या लोकांना बोलावुन त्यांना मारायचे किंवा बाहेर हकलवायचे. पण एवढी भिती नव्हती वाटत तेंव्हा कारण ह्या सापांनी कधी कोणाला दगा दिला नव्हता. पंखांच्या मुंग्याही यायच्या त्यांच्यासाठी आई पातेल्यात, परातित पाणि ठेवायची आणि बल्प,ट्युबखाली ते ठेवायची मग बल्पच्या प्रतिबिंबाला फसुन ह्या मुंग्या पाण्यात पडायच्या. मच्छरांसाठी घमेलात आम्ही धुरी करायचो ओल गवत वर टाकुन. खुप खुप आठवणी आहेत. लिहाव्या तेवढ्या कमिच.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 06/20/2009 - 12:37

Permalink

खूप आवडला

खूप आवडला लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by बेधुन्द मनाची लहर on Sat, 06/20/2009 - 14:46

Permalink

अप्रतिम

अप्रतिम लेखन.... बालपण आठवले.....
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 06/20/2009 - 18:34

Permalink

वा!

सुंदर लिखाण.. काय टायमिंग आहे.. आजच मुंबईत जोरदार पाऊस आला आहे.. सकाळपासून तीनदा भिजून आलो आहे..:) अगदी लहानमुलांबरोबर होड्या सोडून, उगाचच नदीचं पाणी बघून (हो दहिसरला एरवी न दिसणारी नदी पावसाळ्यात चक्क वाहते), शेजारी टपरीवर गरम भज्या चापून, चहा मारून देखील आलो :) टुक टुक ;) अजून येऊ दे असंच मस्त लिखाण ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on Sat, 06/20/2009 - 20:47

Permalink

अतिशय सुरेख!

लेख वाचून डोळ्यांसमोर एक सुरेख चित्र तयार झाले.. वाटले.. की आपणही परत लहान होऊन ते दिवस जगावेत...(अजूनही जास्त मोठा झालो नाहीये :-P)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com