आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला!
आज एकंदरीत सूर्य वेगळाच दिसत होता.. म्हणजे प्रचंड ढग दाटून आले होते.. आणि सनसेटच्या वेळेस तर चक्क उलटा सनराईज दिसला..! म्हणजे वर ढगांची चादर, आणि खाली सूर्याची कोर! पण गाडी भरधाव चालल्याने आणि तित्काच फास्ट सूर्य पळल्यामुळे ती मोमेंट काही टिपता नाही आली.. :(
सूर्य पटकन डोंगरांमागे लपला आणि मला असा फोटो मिळाला.. आधी तो डोंगरही ढगांचा पट्टा वाटला होता.. :)
(हे वरचे तीन फोटो मी आयुष्यात प्रथमच मॅन्युअली (पक्षी: काय वाट्टेल ती ) सेटींग्स लावून काढली आहेत.. डोळ्याला बरी वाटली म्हणून देतेय.. हीच सेटींग्स का ती का नको.. म्या अजाणाला नाही समजत! :( )
बरं... सूर्य गेला.. आणि ढगांनी चादर अंथरली.. अशक्य हवा होती आज! ढग शक्य तितके खाली उतरलेले.. प्रचंड वारं असल्याने तेही पळत होते.. सूर्यही पळालाच.. उकाडाही एकदम गायब.. आणि थंडी अचानक वाढली .. समुद्र देखील ढगांच्या प्रतिबिंबामुळे वेगळाच दिसत होता.. माहौलच वेगळा!
किती उच्च कॅमेर्याने फोटो काढले की तो निसर्ग कॅमेर्यामधे आणणे आणि जसे डोळे कॅप्चर करतात तसंच फोटो मधे येणे कधी जमेल??
(Flickr Link)

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4808
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर फोटू
सगळीच
भारी,,
सुरेख
फोटो आणि
लपाछपी
बेष्ट!!
अहाहा !
सुरेख फोटो
सगळी
धन्यवाद
मस्तंच
सगळेच
सुरेख !
छान
वा फोटो
मस्त!
सगळेच फोटू
मस्त फोटो ...
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
शेवटून तिसरा विशेष आवडला
देखणी
मस्त!!!
थँक्स