Skip to main content

पिंपळपान.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 18/06/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रे नमस्कार ! सकाळी एक छान ईमेल आले , त्यात एक सुंदरसे पिंपळपान होते, ते पाहून सहज काहीतरी(च ?) सुचले ते खरडले आहे.बघा आवडते का ..... पिंपळपान..... तारुण्याचे पिंपळपान त्यावर लिहुनी प्रीतीगान अर्पण करते तुला मुकुंदा, देशील का रे हृदयी स्थान? शीतल वारा अन् जलधारा अशा झोंबती कांतीला, कवेत घेवून मला सख्या रे विसावू दे बाहूवर मान ! विरह तुझा मज मुळी खपेना तुजविण पळभरही करमेना , भरकटते मी तुला शोधण्या मनी मानसी तुझेच ध्यान ! मत्सर वाटे वेणूचा त्या अधरांवर तव विराजमान सांग मला तू , मदनमोहना, कशी सावरू? , मी बेभान ! चित्तचोरटा गवळी रे तू , धेनू पण बघ खुळावल्या मी तर अजुनी यौवनात या, कसे रहावे मज अवधान? कोमल नाजुक भाव मनींचे असे उमटले त्याच्या गाली, मुक्त विहरणारे ते झाले लाजून चूर्.....पिंपळपान !
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1825
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

खूप खूप आवडली. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

केवळ अप्रतिम..... खास करुन शेवट सुंदरच.... कोमल नाजुक भाव मनींचे असे उमटले त्याच्या गाली, मुक्त विहरणारे ते झाले लाजून चूर्.....पिंपळपान !